Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Chronicles 28 >> 

1दावीदाने इस्राएलातील सर्व अधिकारी, घराण्यांचे प्रमुख, पाळीपाळीने राजाचे काम करणारे सरदार, हजारांचे सरदार व शंभरांचे सरदार, राजाच्या व त्याच्या मुलांच्या सर्व संपत्तीवरील व धनावरील अधिकारी, अंमलदार, शूर वीर आणि लढवय्ये यांना यरुशलेमेत एकत्र बोलावले.

2नंतर राजा दावीद त्यांच्यापुढे उभा राहून म्हणाला, माझ्या बांधवांनो आणि लोकांनो, माझे ऐका परमेश्वराचा कराराचा कोश ठेवण्यासाठी आणि देवाच्या पादासनासाठी एक विसाव्याचे घर बांधावे असा माझा मानस होता. त्याच्या बांधकामासाठी मी तयारी ही केली होती.

3पण देव मला म्हणाला, तू माझ्या नावासाठी घर बांधायचे नाही. कारण तू एक लढवय्या आहेस आणि रक्त पाडले आहेस.

4इस्राएलाचा देव परमेश्वर याने मला सर्वकाळ इस्राएलाचा राजा होण्यासाठी माझ्या बापाच्या सर्व घराण्यातून निवडून घेतले. कारण त्याने यहूदाला आणि यहूदाच्या वंशातून माझ्या बापाच्या सर्व घराण्याला अधिकारी होण्यासाठी निवडले. आणि मला सर्व इस्राएलावर राजा व्हावे म्हणून त्याने माझ्या बापाच्या मुलांतून माझी निवड केली.

5देवाने मला भरपूर पुत्रसंतती दिली आहे. या मुलांमधून इस्त्राएलावर परमेश्वराच्या राज्याच्या राजासनावर बसायला माझा मुलगा शलमोनाला निवडले आहे.

6त्याने मला म्हटले तुझा मुलगा माझे शलमोन हाच माझे घर आणि माझी अंगणे बांधील. कारण मी त्याला माझा पुत्र म्हणून निवड केली आहे आणि मी त्याचा पिता होईल.

7माझ्या आज्ञा आणि नियम यांचे पालन आजच्याप्रमाणे त्याने कसोशीने केले तर त्याच्या राज्याला मी सर्वकाळ स्थैर्य देईन.

8तर आता सर्व इस्राएल बांधवांनो, परमेश्वरासमोर आणि तुमच्यासमोर मी सांगतो की आपला देव परमेश्वर याच्या सर्व आज्ञा काटेकोरपणे पाळा. यासाठी की तुम्ही हा चांगला देश वतन करून घ्यावा आणि आपल्यानंतर तो आपल्या वंशजास सर्वकालचे वतन म्हणून द्यावा.

9“आणि शलमोना, माझ्या मुला, आपल्या वडीलांच्या देवाला जाणून घे. पूर्ण अंतःकरणाने व आत्मनिग्रहाने त्याची सेवा कर. तू हे कर कारण परमेश्वर सर्व अंत:करण शोधून पाहतो आणि आपल्या प्रत्येकाच्या विचाराच्या सर्व प्रेरणा त्याला कळतात. जर तू त्याचा शोध करशील तर तो तुला सापडेल, पण जर तू त्याला सोडशील, तर तो तुझा कायमचा त्याग करील.

10परमेश्वराने त्याचे पवित्रस्थानासाठी घर बांधण्यासाठी तुझी निवड केली आहे हे लक्षात ठेव. बलवान हो आणि हे कर.”

11दावीदाने आपला मुलगा शलमोन याला मंदिराचे व्दारमंडप, त्याची घरे, त्यातील इमारती, कोठाराच्या खोल्या, वरच्या मजल्यावरची आणि आतल्या बाजूची दालने, दयासनाचे स्थान यांचा आराखडा दिला.

12त्याला आत्म्याच्या योगे जे काही प्राप्त झाले त्याचा आराखडा म्हणजे परमेश्वराच्या घराच्या अंगणाचा आणि चोहोकडच्या खोल्यांचा आणि देवाच्या घराच्या भांडारांचा व पवित्र वस्तूंच्या भांडारांचा,

13याजक आणि लेवी यांच्या गटांची माहिती व परमेश्वराच्या घराच्या सेवेच्या सर्व कामाचा आणि परमेश्वराच्या घरातील सर्व वापरावयची उपकरणे याबद्दलची जबाबदारी त्यांना नेमून दिली.

14सोन्याच्या पात्रांसाठी, सर्व प्रकारच्या सेवेच्या सर्व पात्रांसाठी सोन्याचे वजन दिले. रुप्याच्या सर्व पात्रांसाठी सर्व प्रकारच्या सेवेच्या पात्रांसाठी रुप्याचे वजन दिले.

15सोन्याच्या दिपस्तंभासाठी व त्याच्या दिव्यासाठी, एकेक दिपस्तंभ व त्याच्या दिव्यासाठी सोन्याचे वजन दिले आणि रुप्याच्या दिपस्तंभासाठी एकेका दिपस्तंभाच्या कामाप्रमाणे एकेका दिपस्तंभासाठी व तिच्या दिव्यासाठी रुप्याचे वजन दिले.

16आणि समक्षतेच्या भाकरीच्या मेजासाठी एकेका मेजासाठी सोन्याचे आणि रुप्याच्या मेजासाठी रुप्याचे वजन दिले.

17काटे, बहुगुणे, वाट्या यांसाठी आणि सोन्याच्या वाट्यांसाठी एकेका वाटीसाठी लागणारे शुध्द सोने आणि रुप्याच्या वाट्यासाठी लागणारे रुपे, एकेका वाटीसाठी लागणारे रुपे यांचे वजन दिले.

18धूपवेदीसाठी शुध्द केलेल्या सोन्याचे आणि जे करुब आपले पंख पसरून परमेश्वराचा कोश झाकीत होते त्यांच्या रथाच्या नमुन्याप्रमाणे सोन्याचे वजन दिले.

19दावीद म्हणाला, “हे सर्व कामे मी परमेश्वराच्या मार्गदर्शनाप्रमाणे अणि त्या सर्व रुपरेषा त्याने मला समजावून सांगितलेल्या आहेत त्या मी लिहून ठेवल्या आहेत.”

20दावीद शलमोनाला पुढे म्हणाला “बलवान हो आणि धैर्य धर. काम कर. कारण परमेश्वर देव म्हणजे माझा देव तुझ्यासोबत आहे, तेव्हा घाबरु नको. परमेश्वराच्या घराचे सर्व काम पुरे़ होईपर्यंत तो तुला सोडणार नाही व टाकणार नाही.

21देवाच्या मंदिराच्या सेवेच्या कामाला याजक आणि लेवी यांचे वर्ग नेमले आहेत. सर्व प्रकारच्या कामांत कोणत्याही प्रकारच्या सेवेसाठी स्वखुशीने व निपुण कारागिर कामात मदत करण्यास तुझ्याबरोबर आहेत. अधिकारी आणि सर्व लोक तुझ्या आज्ञा मानण्यास तयार असतील.”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Chronicles 28 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran