Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Chronicles 27 >> 

1ही इस्त्राएल वंशजांच्या घराण्यातील प्रमुखांची यादी म्हणजे हजारांचे व शंभरांचे सरदार, त्याचप्रमाणे सैन्याचे अधिकारी, हे राजाची सेवा अनेक मार्गाने करत. प्रत्येक सैन्याचा गट हे वर्षाच्या सर्व महिन्यात सेवा करत असे. प्रत्येक गटात चोवीस हजार माणसे होती.

2पहिल्या महिन्याच्या पहिल्या गटाचा प्रमुख याशबाम हा होता. याशबाम जब्दीएलचा मुलगा. याशबामच्या गटात चोवीस हजार जण होते.

3तो पेरेसच्या वंशातला होता. पहिल्या महिन्याच्या सर्व सेनाधिकाऱ्यांचा याशबाम प्रमुख होता.

4अहोह इथला दोदय दुसऱ्या महिन्याच्या सैन्याचा मुख्य असून त्याच्या गटात चोवीस हजार माणसे होती.

5तिसऱ्या महिन्याचा तिसरा सेेनापती बनाया. हा यहोयादाया मुलगा. यहोयादा हा मुख्य याजक होता. बनायाच्या अधिपत्याखाली चोवीस हजार माणसे होती.

6हाच तो बनाया जो तीसांतला शूर व तिसांवर प्रमुख होता. त्याचा पुत्र अम्मीजाबाद बनायाच्याच गटात होता.

7चवथ्या महिन्याचा चवथा सेनापती यवाबाचा भाऊ असाएल. त्याच्यानंतर त्याचा मुलगा जबद्या हा पुढे आपल्या सेनापती झाला. त्याच्या तुकडीत चोवीस हजार पुरुष होते.

8शम्हूथ हा पाचवा सेनापती. पाचव्या महिन्याचा हा सेनापती इज्राही होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार पुरुष होते.

9इरा हा सहाव्या महिन्याचा सहावा सेनापती. हा इक्केशचा मुलगा असून तको नगरातला होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार लोक होते.

10सातव्या महिन्याचा सातवा सेनापती हेलेस पलोनी हा होता. हा एफ्राइमच्या वंशातला होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार लोक होते.

11आठव्या महिन्याचा आठवा सरदार जेरह वंशातला सिब्बखय हुशाथी हा होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार जण होते.

12नवव्या महिन्याचा नववा सरदार बन्यामिनी वंशातला अबियेजेर अनाथोथी हा होता. त्याच्या गटात चोवीस हजार सैनिक होते.

13दहाव्या महिन्याचा दहावा सेनापती महरय. हा जेरह कुळातला असून नटोफा इथला होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार पुरुष होते.

14अकराव्या महिन्याचा अकरावा सेनापती बनाया. हा पिराथोनचा असून एफ्राइमच्या वंशातला होता. त्याच्या गटात चोवीस हजार पुरुष होते.

15बाराव्या महिन्याचा बारावा प्रमुख हेल्दय. या अथनिएल कुळातला आणि नटोफा इथला होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार लोक होते.

16इस्राएलाच्या घराण्यांचे प्रमुख असे:रऊबेन जिख्रिचा मुलगा अलीयेजर. शिमोन: माकाचा मुलगा शफट्या.

17लेवी कमुवेलचा मुलगा हशब्या. अहरोन: सादोक.

18यहूदा अलीहू. हा दावीदाचा एक भाऊ, इस्साखार: मीखाएलचा मुलगा अम्री.

19जबुलून ओबद्याचा मुलगा इश्माया. नफताली: अज्रिएलचा मुलगा यरीमोथ.

20एफ्राईम अजऱ्याचा मुलगा होशेथ. पश्र्चिम मनश्शे: पदायाचा मुलगा योएल.

21पूर्व मनश्शे जखऱ्याचा मुलगा हद्दो. बन्यामीन: अबनेरचा मुलगा यासिएल.

22दान यरोहामचा मुलगा अजरेल. हे झाले इस्राएलांच्या घराण्यांचे प्रमुख,

23दावीदाने इस्राएलमधील पुरुषांची मोजदाद करायचे ठरवले. इस्राएलाची लोकसंख्या आकाशातील ताऱ्यांएवढी करीन असे देवाने आश्वासन दिलेले असल्यामुळे इस्राएलमध्ये लोकासंख्या वाढली होती. तेव्हा दावीदाने वीस वर्षाचे आणि त्याहून कमी वयाचे पुरुष यांची मोजणी केली नाही.

24सरुवेचा मुलगा यवाब याने मोजदाद करायला सुरुवात केली पण तो ते काम पूर्ण करु शकला नाही. देवाचा इस्राएलाच्या लोकांवर कोप झाला. त्यामुळे ही मोजणी दावीद राजाच्या बखरीत नोंदलेली नाही.

25राजाच्या मालमत्तेची जपणूक करणारे आधिकारी पुढीलप्रमाणे:अदीएलचा मुलगा अज्मावेथ हा राजाच्या भांडारांचा प्रमुख होता. उज्जीयाचा मुलगा योनाथान शेतातल्या, नगरातल्या, गावातल्या आणि किल्लातल्या भांडारांचा प्रमुख होता.

26कलूबचा मुलगा एज्री हा शेतात राबणाऱ्यांवरचा प्रमुख होता.

27रामा येथील शीमी हा द्राक्षींच्या मळ्यांच्या उत्पन्नावर व द्राक्षारसाच्या कोठ्यांवर जब्दी शिफमी हा होता.

28गेदेरचा बाल-हानान हा जैतूनाची झाडे आणि पश्चिमेकडच्या डोंगराळ भागातली उंबराची झाडे याचा प्रमुख होता. योवाश जैतूनच्या तेलाच्या कोठाराचा प्रमुख होता.

29आणि शित्रय शारोनी हा शारोनात चरणाऱ्या गुरांचा मुख्य होता. अदलयचा मुलगा शाफाट हा दऱ्याखोऱ्यातील गुरांवरचा मुख्य होता.

30ओबील इश्माएली हा उंटांवरचा प्रमुख होता. येहद्या मेरोनोथी गाढवांवर मुख्य होता.

31याजीज हाग्री मेंढरांवर मुख्य होता. दावीद राजाच्या मालमत्तेचे हे सर्व अधिकारी होते.

32दावीदाचा काका योनाथान हा सूज्ञ मंत्री आणि लेखनिक होता. हखमोनी याचा मुलगा यहीएल याच्यावर राजपुत्रांच्या लालनपालनाची जबाबदारी होती.

33अहीथोफेल राजाचा मंत्री आणि हूशय राजाचा मित्र होता. हा अकर लोकांपैकी होता.

34अहीथोफेलाची जागा पुढे यहोयादा आणि अब्याथार यांनी घेतली. यहोयादा हा बनायाचा मुलगा. यवाब हा राजाचा सेनापती होता.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Chronicles 27 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran