Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Chronicles 26 >> 

1द्वारपालांचे गट: हे पहारेकरी कोरहाच्या वंशजातील होते. त्यांची नावे अशी: आसाफाच्या वंशातील कोरहाचा मुलगा मेशेलेम्या.

2मेशेलेम्या याला मुलगे होते. जखऱ्या हा त्यांतला मोठा. यदिएल दुसरा, जबद्या तिसरा, यथनिएल चौथा

3अलाम पाचवा, यहोहानान सहावा, एल्योवेनय सातवा.

4ओबेद-अदोम, याची मुले. शामाया थोरला, अहोजाबाद दुसरा, यवाह तिसरा, साखार चौथा, नथनेल पाचवा,

5अम्मीएल सहावा, इस्साखार सातवा, पउलथय आठवा. देवाची ओबेद-अदोमवर खरोखच कृपादृष्टी होती.

6शमाया हा ओबेद-अदोमचा मुलगा. त्यालाही पुत्रसंतती होती. हे मुलगे सामर्थ्यवान असल्यामुळे त्यांची आपल्या घराण्यावर सत्ता होती.

7अथनी, रफाएल, ओबेद एलजाबाद, अलीहू आणि समख्या हे शमायाचे पुत्र. एलजाबादचे भाउबंद सर्व प्रकारच्या कामात कुशल होते.

8हे सर्व ओबेद-अदोमचे वंशज त्याची मुले, पुरुष नातेवाईक असे सर्वच निवासमंडपाच्या कामात कार्यक्षम होते. ओबेद अदोमाचे एकंदर बासष्ट वंशज होते.

9मेशेलेम्याचे पुत्र आणि भाऊबंद मिळून अठराजण होते. ते सर्व पराक्रमी होते.

10मरारीच्या वंशातला होसा. शिम्रीला ज्येष्ठपद दिले होते. हा जन्माने ज्येष्ठ नव्हता, पण त्याच्या वडीलांनी त्याला मुख्य केले होते.

11हिल्कीया दुसरा. टबल्या तिसरा. जखऱ्या चौथा. होसाला मुलगे आणि भाऊबंद मिळून तेराजण होते.

12यांना द्वारपालांच्या गटांवर प्रमुख नेमलेले होते. आपल्या इतर भाऊबंदाप्रमाणेच द्वारपालांनाही परमेश्वराच्या मंदिरातील सेवेचे काम नेमून दिलेले होते.

13एकेका दरवाजाच्या रक्षणाची जबाबदारी एकेका घराण्याकडे दिलेली होती. एकेका दारासाठी चिठ्ठी टाकून हे काम सोपवले गेले. त्यात वयाने लहान मोठा असा भेदभाव नव्हता.

14शेलेम्याच्या वाटणीला पूर्वेकडचे दार आले. त्याचा मुलगा जखऱ्या याच्यासाठी नंतर चिठ्ठी टाकण्यात आली. हा सूज्ञ मंत्री होता. उत्तरेच्या द्वारासाठी त्याची निवड झाली.

15ओबेद-अदोमाच्या वाटणीला दक्षिण दरवाजा आला. मौल्यवान चीजवस्तू ठेवलेल्या भांडाराचे रक्षण करण्याचे काम ओबेद-अदोमाच्या मुलांकडे आले.

16शुप्पीम आणि होसा यांची निवड पश्र्चिम दरवाजासाठी आणि शल्लेकेथाची चढणीच्या वाटेवरील दरवाजासाठी झाली. प्रत्येक घराण्यासाठी पहारेकरी स्थापित केले होते.

17पूर्वेला सहा लेवी, उत्तरेला प्रतिदिनी चार, दक्षिणेला प्रतिदिनी चार आणि भांडाराच्या रक्षणासाठी दोन जोड्या होत्या.

18पश्चिमेकडील शिवारावर चारजण पहारा देत, चारजण त्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर आणि दोन शिवारात असत.

19हे व्दारपालांचे वर्ग होते. कोरहाचे वंशज आणि मरारीरीचे वंशज यांनी ते भरले होते.

20देवाच्या मंदिरातील भांडारावर आणि समर्पित वस्तूंच्या भांडारावर लेव्यातला अहीया हा प्रमुख होता.

21लादान हा गेर्षोनाच्या वंशातील. यहीएली हा लादानच्या घराण्यातील प्रमुखांपैकी एक होता.

22जेथाम आणि त्याचा भाऊ योएल हे यहीएलीचे मुलगे होते. परमेश्वराच्या मंदिरातील भांडारावर देखरेख ठेवणारे होते.

23अम्रामी, इसहारी, हेब्रोनी आणि उज्जियेली यांच्या कुळांतूनसुध्दा आणखी काही प्रमुखांची नेमणूक करण्यात आली.

24मोशेचा मुलगा गेर्षोम, याचा मुलगा शबुएल हा भांडारावर देखरेख करणारा होता.

25अलीयेजार कडून त्याचे भाऊबंद: अलीयेजाचा मुलगा हा रहब्या होता. रहब्याचा मुलगा यशया. यशयाचा मुलगा योराम. योरामचा मुलगा जिख्री. आणि जिख्रीचा मुलगा शलोमोथ.

26दावीद राजा व वडीलांच्या प्रमुखांनी व हजारांचे व शंभरांचे सेनापती आणि सैन्याचे सरदार यांनी मंदिरासाठी समर्पित केलेल्या वस्तूच्या भांडारावर शलोमोथ आणि त्याचे भाऊबंद देखरेख करत होते.

27युध्दात मिळालेल्या काही लूटीपैकी त्यांनी परमेश्वराच्या मंदिराच्या दुरुस्तीसाठी समर्पित केली.

28शमुवेल संदेष्टा, कीशचा मुलगा शौल आणि नेरचा मुलगा अबनेर, सरुवेचा मुलगा यवाब यांनी परमेश्वराला समर्पित केलेल्या प्रत्येक पवित्र वस्तूंचे रक्षणही शलोमोथ आणि त्याचे भाऊबंद करत असत.

29इसहाराच्या वंशजापैकी कनन्या व त्याची मुले इस्राएलांच्या सुरक्षा व्यवस्थेचे प्रमुख होते. ते अधिकारी व न्यायधीश होते.

30हेब्रोनी वंशातला, हशब्या व त्याचे भाऊबंद, एक हजार सातशे शूर वीर, यार्देनेच्या अलिकडे पश्चिमेस, परमेश्वराच्या व राजाच्या कार्याचे प्रमुख होते.

31हेब्रोनी यांच्या वंशातला यरीया हा त्यांच्या वंशाचा प्रमुख होता, त्याच्या घराण्यावरुन त्याची मोजणी केली. दावीदाच्या राज्याच्या चाळीसाव्या वर्षी त्यांचा तपास केला आणि त्यांना गिलाद मधल्या याजेर नगरात कर्तबगार अशी माणसे आढळली.

32आपापल्या घराण्यांचे प्रमुख आणि पराक्रमी असे दोन हजार सातशे नातलग यरीयाला होते. परमेश्वराच्या प्रत्येक कार्यासाठी आणि राज्याचे कामकाज यांसाठी, रऊबेनी, गादी आणि मनश्शेचा अर्धा वंश यांच्यावर देखरेख करणारे असे हे दोन हजार सातशे जण दावीदाने नेमले.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Chronicles 26 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran