Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Chronicles 25 >> 

1दावीद आणि निवासमंडपाच्या अधिकाऱ्यांनी मिळून आसाफाच्या मुलांना एका खास कामासाठी निवडले. हेमान व यदूथून ही ती मुले. वीणा, सतारी आणि झांजा ही वाद्ये, वाजवून देवाचा संदेश देणे असे त्यांच्या कामाचे स्वरुप होते. हे काम करणाऱ्या लोकांची यादी:

2आसाफाच्या वंशातले: जक्कूर, योसेफ, नथन्या आणि अशेराला, हे आसाफाचे मुले राज्याच्या देखरेखीखाली आसाफाच्या मार्गदर्शनाखाली संदेश देत होते.

3यदूथूनाचे वंशज: गदल्या, सारी, यशया, हशब्या व मत्तिथ्या हे सहाजण, आपला पिता यदूथून याच्या मार्गदर्शनाखाली वीणा वाजवून परमेश्वराचे उपकारस्मरण आणि स्तवन करत असे.

4हेमानाचे वंशज: बुक्कीया, मत्तन्या, उज्जियेल, शबएल, यरीमोथ, हनन्या, हनानी, अलियाथा, गिद्दल्ती, रोममती एजेर, याश्बकाशा, मल्लोथी, होथीर आणि महजियोथ.

5हेमान हा राजाचा संदेष्टा होता, हे सर्व हेमानाचे मुलगे. देवाने हेमानाला चौदा मुलगे आणि तीन मुली देऊन सन्मानीत केले.

6हे सर्व आपल्या बापाच्या मार्गदर्शनाखाली परमेश्वराच्या घरात ही मुले झांजा, सतारी आणि वीणा वाजवून गीते गाण्यासाठी आणि देवाच्या घरातील सेवेसाठी होते. आसाफ, यदूथून व हेमान हे राजाच्या देखरेखीखाली होती.

7ते आणि त्यांचे नातेवाईक गायनकलेत पारंगत व परमेश्वरासाठी गाण्याचे प्रशिक्षण घेतलेले दोनशे अठ्याऐशीजण होते.

8त्यांनी लहान थोर, गुरु-शिष्य सर्वानी आपल्या कामासाठी सारख्याच चिठ्ठया टाकल्या.

9तेव्हा आसाफाच्या मुलांच्या संबंधीत: पहिली चिठ्ठी योसेफाची निघाली; दुसरी गादल्याची त्याची मुले आणि भाऊबंद यांच्यातून बाराजणांना घेतले.

10तिसरी चिठ्ठी जक्कूरचे मुलगे आणि भाऊबंद यांच्यामधून, बाराजणांना घेतले.

11चवथी चिठ्ठी इस्त्रीची, त्याचे मुलगे आणि आप्त यांच्यामधून बाराजणांना घेतले.

12पाचवी नथन्याची त्याच्या मुलगे व नातलगामधून बाराजण.

13सहावी चिठ्ठी बुक्कीयाची. त्याचे मुलगे आणि भाऊबंद यांमधून बाराजण.

14सातवी यशरेलाची. त्याचे मुलगे आणि भाऊबंद यांमधून बाराजण.

15यशयाची आठवी. या चिठ्ठीनुसार मुलगे आणि भाऊबंद यांमधून बाराजण.

16नववी मत्तन्याची. त्याचे मुलगे आणि नातलगांमधून बाराजण.

17दहावी शिमोची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बाराजण.

18अकरावी अजरेलाची. त्याचे मुलगे आणि नातलाग यांमधून बाराजण.

19बारावी हशब्याची. त्याचे मुलगे आणि त्याचे नातलग यांमधून बाराजण.

20तेरावी शूबाएलाची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बाराजण.

21चौदावी मतिथ्याची. त्याचे मुलगे आणि नातलगामधून बाराजण.

22पंधरावी यरेमोथची. त्याचे मुलगे आणि नातेवाईक यांमधून बारा.

23सोळावी हनन्याची. त्याचे मुलगे आणि भाऊबंद यांमधून बाराजण.

24सतरावी याश्बाकाशाची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बाराजण.

25अठरावी हनानीची. त्याचे मुलगे आणि नातलगामधून बाराजण.

26एकुणिसावी मल्लोथीची. त्याचे मुलगे आणि आप्त यांमधून बाराजण.

27विसावी अलीयाथची. त्याचे मुलगे आणि नातलगामधून बाराजण.

28एकविसावी होथीरची. त्याचे मुलगे आणि नातलगामधून बाराजण.

29बाविसाठी गिद्दल्तीची. त्याचे मुलगे आणि नातलगामधून बाराजण.

30तेविसावी महजियाथची. त्याचे मुलगे आणि भाऊबंद यांमधून बाराजण.

31चोविसावी रोममती एजेरची. त्याचे मुलगे आणि नातलगामधून बाराजण.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Chronicles 25 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran