Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Chronicles 24 >> 

1अहरोनाच्या वंशजांची वर्गवारी नादाब, अबीहू एलजार व इथामार.

2पण नादाब आणि अबीहू हे दोघे आपल्या वडीलांच्या आधीच मेले. त्यांना मुलेही नव्हती. तेव्हा एलाजार आणि इथामार हेच याजक झाले.

3दावीद व एलाजाराच्या वंशातला सादोक आणि इथामार यांच्या वंशातला अहीमलेख यांनी त्यांच्या नेमणुकीप्रमाणे त्यांच्या सेवेसाठी त्यांची वाटणी केली.

4इथामारापेक्षा एलाजारच्या वंशजात वडीलधारी प्रमुख मंडळी अधिक निघाली. एलाजारच्या वंशजात सोळा जण तर इथामारच्या वंशजात आठ जण प्रमुख होते.

5दोन्ही वंशजातील पुरुषांची निवड चिठ्ठ्या टाकून केली गेली. काहीजणांना पवित्रस्थानाच्या देखभालीचे अधिकारी आणि देवाकडचे अधिकारी हे सर्वजण एलाजार आणि इथामार यांच्या वंशजातलेच होते.

6आणि लेव्यांतला लेखक, नथनेलाचा मुलगा शमाया याने राजा व अधिकारी, सादोक याजक, अब्याथारचा मुलगा अहीमलेख, याजक आणि लेवी यांच्या घराण्यातील प्रमुख ह्याच्यासमोर त्यांची नावे लिहिली. चिठ्ठ्या टाकून एलाजाराच्या कुळाच्या वंशातून निवड करण्यात येई आणि पुढच्या वेळेला इथामार यांच्या कुळातील वंशातून निवड करण्यात येई.

7पहिली चिठी यहोयारीबाची निघाली. दुसरी यदायाची,

8तिसरी हारीमाची, चौथी सोरीमाची,

9पाचवी मलकीयाची, सहावी मयामिनाची,

10सातवी हक्कोसाची, आठवी अबीयाची.

11नववी येशूवाची, दहावी शकन्याची,

12अकरावी एल्याशिबाची, बारावी याकीमाची

13तेरावी हुप्पाची, चवदावी येशेबाबाची,

14पंधरावी बिल्गाची, सोळावी इम्मेराची,

15सतरावी हेजीराची, अठरावी हप्पिसेसाची,

16एकोणिसावी पथह्याची, विसावी यहेजकेलाची,

17एकविसावी याखीनची, बाविसावी गामूलची,

18तेविसावी दलायाची आणि चोविसावी माज्याची.

19परमेश्वराच्या मंदिरात सेवा करण्यासाठी या सर्वांची क्रमाने नेमणूक करण्यात आली. इस्राएलचा परमेश्वर देव याने अहरोनला जे नियम घालून दिले त्याच नियमांचे पालन त्यांनी मंदिराच्या सेवेसाठी केले.

20लेवीच्या इतर वंशजांची नावे खालीलप्रमाणे: अम्रामच्या वंशातील शूबाएल; शूबाएलचे वंशज: यहदाया.

21रहब्याचे वंशज: रहब्याच्या वंशात इशिया मुख्य.

22इसहार वंशजापैकी: शलोमोथ. शलोमोथाच्या वंशजातून: यहथ.

23हेब्रोनचा मोठा मुलगा यरीया, हेब्रोनचा दुसरा मुलगा अमऱ्या, यहजियेल तिसरा आणि चौथा यकमाम.

24उज्जियेलाच्या वंशातला मीखा. मीखाच्या वंशातला शामीर.

25मीखाचा भाऊ इश्शिया, इश्शियाचा मुलगा जखऱ्या.

26मरारीचे वंशज: महली आणि मूशी. याजीयाचा वंशज बनो.

27मरारीचे वंशज: याजीयापासून बनो व शोहम व जक्कूर व इब्री.

28महलीपासून: एलजार हा महलीचा मुलगा. याला मुले नव्हते.

29कीशाचे वंशज: यरहमेल.

30महली, एदर आणि यरीमोथ हे मूशीचे मुलगे. हे लेवी होते, त्यांच्या घराण्याप्रमाणे त्यांची यादी करण्यात आली.

31राजा दावीदा, अहीमलेख आणि याजक व लेवी घराण्यातील प्रमुख यांच्यासमोर त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. घराण्यातील श्रेष्ठ मुलाने कनिष्ठाबरोबर चिठ्या टाकल्या. त्यांनी अहरोन याच्या वंशजाप्रमाणेच चिठ्ठ्या टाकल्या.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Chronicles 24 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran