Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Chronicles 18 >> 

1यानंतर असे झाले की, दावीदाने पलिष्ट्यांवर स्वारी केली आणि त्यांचा पराभव केला. त्याने पलिष्ट्याच्या हातातून गथ आणि त्यांची गावे घेतली.

2मग त्याने मवाबाचा पराभव केला आणि मवाबी लोक दावीदाचे सेवक झाले आणि त्याला कर देऊ लागले.

3मग सोबाचा राजा हदरेजर आपल्या राज्याची सीमा फरात नदीपर्यंत स्थिर करण्यास जात असता दावीदाने हामाथाजवळ त्याचा पराभव केला.

4दावीदाने त्याच्याकडून एक हजार रथ, सात हजार सारथी, आणि वीस हजार पायदळ एवढे घेतले. दावीदाने रथांच्या जवळपास सर्व घोड्यांच्या शिरा तोडल्या पण त्यातून शंभर रथांचे घोडे मात्र त्याने शाबूत ठेवले.

5जेव्हा दिमिष्क नगरातील अरामी लोक सोबाचा राजा हदरेजर याच्या मदतीला आले, त्यांच्यापैकी बावीस हजार लोकांनाही दावीदाने जिवे मारले.

6नंतर अराममधील दिमिष्कात दावीदाने ठाणी बसवली. अरामी लोक दावीदाचे सेवक होऊन त्याला कर देऊ लागले. अशाप्रकारे दावीद जेथे जेथे जात असे परमेश्वराने त्याला तेथे तेथे विजयी केले.

7हदरेजराच्या सेवकांच्या सोन्याच्या ढाली दावीदाने काढून घेतल्या आणि त्या यरुशलेमेला आणल्या.

8हदरेजराची नगरे टिमथ आणि कून यातून दावीदाने पुष्कळ पितळही हस्तगत केले. हे पितळ वापरुन नंतर शलमोनाने पितळी समुद्र, गंगाळ व स्तंभ आणि पितळी भांडी बनवली.

9जेव्हा दावीदाने सोबाचा राजा हदरेजर याच्या सर्व सैन्याचा पराभव केल्याची बातमी तोवू हमाथ नगराचा राजा याने ऐकली.

10तेव्हा त्याने हदोराम या आपल्या मुलाला दावीद राजाला आशीर्वाद देण्यासाठी आणि त्याचे अभिनंदन करण्यासाठी त्याच्याकडे पाठवले, कारण दावीद हदरेजराविरुध्द लढला व त्याचा पराभव केला, तोवू आणि हदरेजर यांच्यात लढाया होतच असत. हदोरामने आपल्याबरोबर सोने, रुपे, पितळ याची भांडी आणली.

11जे सोने रुपे त्याने सर्व राष्ट्रांपासून, अदोम, मवाब, अम्मोनी, पलिष्टी आणि अमालेकी यांच्यापासून घेतले होते त्यासुध्दा ती भांडी दावीद राजाने परमेश्वराला अर्पिली.

12सरुवेचा मुलगा अबीशाय याने क्षार खोऱ्यात अठरा हजार अदोमी लोकांना मारले.

13अदोमामध्ये अबीशयने मजबूत ठाणी बसवली आणि सर्व अदोमी दावीदाचे सेवक झाले. परमेश्वराने दावीदाला जेथे कोठे तो गेला तेथे त्याला जय मिळवून दिला.

14दावीदाने सर्व इस्राएलावर राज्य केले आणि त्याने त्याच्या सर्व लोकांचा योग्य न्याय करत असे व नीतिने वागत असे.

15सरुवेचा मुलगा यवाब हा दावीदाच्या सैन्याचा मुख्य अधिकारी होता. अहीलुदाचा मुलगा यहोशाफाट नोंद ठेवणारा अधिकारी होता.

16अहीटूबचा मुलगा सादोक आणि अब्याथारचा मुलगा अबीमलेख याजक होते. शवूशा हा नियमशास्त्र शिक्षक होता.

17यहोयादाचा मुलगा बनाया हा करेथी व पलेथी लोकांवरील जबाबदार अधिकारी होता. दावीदाचे मुले राजाचे मुख्य सल्लागार होते.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Chronicles 18 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran