Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Chronicles 19 >> 

1आणि यानंतर असे झाले की, अम्मोन्याचा नाहाश राजा याच्या मृत्यू झाला व त्याच्याजागी त्याचा मुलगा राजा झाला.

2दावीदाने म्हणाला, नाहशाचा मुलगा हानून याच्यावर मी दया करीन. कारण त्याच्या बापाने माझ्यावर दया केली होती. असे म्हणून दावीदाने हानूनच्या सांत्वनासाठी आपले दूत पाठवले. दावीदाचे हे सेवक हानूनाकडे त्याचे सांत्वन करायला आले.

3तेव्हा अम्मोन्यांचे सरदार हानूनाला म्हणाले तुझे सांत्वन करणे किंवा तुझ्या मृत वडीलांचा मान केला असे तुला वाटते का? त्याने या लोकांना तुझा प्रदेश पाहण्यास आणि हेरगिरी करायला पाठवले आहे. त्याला तुझा प्रांत उद्ध्वस्त करायचा आहे.

4हे ऐकून हानूनाने दावीदाच्या दूतांना अटक केली आणि त्यांचे मुंडन केले. त्यांची कमरेपर्यंतची वस्त्रेही फाडली आणि त्यांना वाटेला लावले.

5मग कोणी जाऊन दावीदाला ही बातमी सांगितली, तेव्हा त्याने भेटण्यास माणसे पाठवली, कारण त्या माणसांना मोठी लाज वाटली आणि राजाने त्यांना निरोप पाठवला तुमच्या दाढ्या वाढेपर्यंत तुम्ही यरीहो येथे रहा मग इकडे या.

6जेव्हा अम्मोन्यांनी पाहिले की, दावीदाला आम्ही दुर्गंध असे झाले आहोत, तेव्हा हानून आणि अम्मोनी लोकांनी मेसोपटेम्या व अराममाका व सोबा येथून रथ आणि सारथी मोलाने आणण्यासाठी एक हजार किक्कार चांदी पाठवली.

7अम्मोन्यांनी बत्तीस हजार रथ व माकाच्या राजा व त्याचे लोक मोलाने ठेवले; तेव्हा त्यांनी येऊन मेदबा नगराजवळ तळ दिला. अम्मोनी आपल्या नगरातून एकत्र होऊन व लढायला आले.

8दावीदाने हे ऐकले तेव्हा त्याने यवाबाला आणि त्याच्या सर्व सैन्यासकट पाठवले.

9अम्मोनी लोक बाहेर पडले व लढाईसाठी त्यांनी वेशीजवळ मांडणी केली. आलेले राजे मैदानात एकीकडे उभे होते.

10सैन्याच्या दोन तुकड्या आपल्याविरुध्द उभ्या ठाकलेल्या असून त्यातली एक आपल्या मागे व एक पुढे आहे हे यवाबाने पाहिले. तेव्हा त्याने इस्राएलातील चांगल्या लढवय्यांना निवडले आणि अरामी सैन्याविरुध्द त्यांची व्यवस्थित मांडणी केली.

11उरलेल्या इस्राएली सैन्याला आपला भाऊ अबीशयाच्या हाती सोपवले आणि त्याने ह्या सैन्याची अम्मोन्याविरुध्द लढण्यास मांडणी केली.

12यवाब म्हणाला, अरामाचे सैन्य जर माझ्यापेक्षा बलवान ठरले तर अबीशय तू मला सोडव. पण अम्मोनी सैन्य तुझ्यापेक्षा बलवान ठरले तर मी तुला सोडवीन.

13बलवान हो, व आपल्या लोकांसाठी आणि देवाच्या या नगरांसाठी लढताना आपण सामर्थ्य दाखवू, मग परमेश्वराचे जे काय चांगले उद्देश आहेत तसे तो करो.

14मग यवाब व त्याच्या सैन्यातील शिपाई अरामी सैन्याविरुध्द लढाई करण्यास चालून गेले, तेव्हा इस्त्राएलाच्या सैन्यापुढून पळाले.

15अरामचे सैन्य माघार घेऊन पळून जात आहे हे पाहताच अम्मोन्यांनीही पलायन केले. अबीशय आणि त्याचे सैन्य यांच्याकडे त्यांनी पाठ फिरवली. अम्मोनी आपल्या नगरात परतले आणि यवाब यरुशलेमेला परत आला.

16आणि इस्राएलपुढे आपला पराभव झाला आहे हे अरामी सरदारांनी पाहिले तेव्हा त्यांनी जासूद पाठवून फरात नदीपलीकडील आपल्या लोकांना बोलवून घेतले. शोफख हा हदरेजरच्या अरामी फौजेचा सेनापती होता.

17अरामी लढाईची जमवाजमव करत आहेत हे दावीदाने ऐकले तेव्हा त्याने सर्व इस्राएल लोकांना एकत्र जमवले आणि यार्देन नदीपलीकडे जाऊन अराम्यांच्या समोर व्यूह रचला व ते त्याच्याशी लढले.

18इस्राएल लोकांसमोरुन अराम्यांनी पळ काढला. दावीदाने व त्याच्या सैन्याने सात हजार अरामी सारथी आणि चाळीस हजार अरामी सैन्य यांना ठार केले. अरामी सैन्याचा नेता शोफख यालाही त्यांनी मारुन टाकले.

19आणि इस्राएलाने आपला पाडाव केला आहे हे जेव्हा हदरेजराच्या सर्व सेवक राजांनी पाहिले तेव्हा त्यांनी दावीदाशी तह केला व ते त्याचे चाकर झाले. म्हणून अरामी पुन्हा अम्मोनी लोकांना मदत करण्यास घाबरले. अशा रीतीने अरामी लोक अम्मोनीना मदत करण्यास तयार नव्हते.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Chronicles 19 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran