Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Samuel 9 >> 

1आणि बन्यामीनांतील एक माणूस होता त्याचे नांव कीश; तो अबीयएलाचा मुलगा तो सरोराचा मुलगा तो बखोराचा मुलगा तो अफियाचा मुलगा; तो बन्यामीनी माणूस मोठा पराक्रमी होता.

2आणि त्याचा शौल नावाचा मुलगा तरुण व सुंदर होता व इस्त्राएलाच्या संतानामध्ये त्याच्याहून कोणी सुंदर नव्हता; सर्व लोक त्याच्या खांद्यास लागत इतका तो उंच होता

3आणि शौलाचा बाप कीश याची गाढवे हरवली तेव्हा कीश आपला मुलगा शौल याला म्हणाला आता तूं ऊठ व चाकरांपैकी एकाला आपणाबरोबर घे जा गाढवांचा शोध कर

4मग तो एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातून जाऊन शलीशा प्रांतातून गेला परंतु ती सापडली नाहीत. मग ते शालीम प्रातांतून गेले येथे ती नव्हती आणि ते बन्यामीन्यांच्या प्रांतातून गेले परंतु त्यांना ती सापडली नाहीत.

5ते सूफ प्रांतातून आल्यावर शौल आपल्या बरोबरच्या चाकराला म्हणाला चला आपण माघारे जाऊं नाहीतर माझा बाप गाढवांची काळजी सोडून आमची काळजी करील.

6तेव्हा तो त्याला म्हणाला आतां पाहा या नगरात देवाचा माणूस आहे तो माणूस सन्मान्य आहे; जे तो सांगेल ते सर्व पूर्ण होईलच; आतां आपण तेथे जाऊ म्हणजे आपण काय घेऊन जावे हे कदाचित तो आम्हांस सांगेल.

7मग शौल आपल्या चाकराला म्हणाला पण पाहा आपण जाऊं तर त्या माणसाला आपण काय घेऊन जावे? कारण आमच्या भांड्यातल्या भाकरी संपल्या आणि देवाच्या माणसाला भेट देण्यासाठी काही राहिले नाही; आम्हांजवळ काय आहे?

8तेव्हा चाकराने शौलाला आणखी उत्तर देऊन म्हटले पाहा माझ्या हातात पाव शेकेल रुपे आहे; ते मी देवाच्या माणसाला देईन म्हणजे तो आमची वाट आम्हाला सांगेल.

9पूर्वी इस्त्राएलांत कोणी देवाजवळ विचारण्याला जात असतां असे म्हणे चला आपण पाहणाऱ्याकडे जाऊं कारण ज्याला आतां भविष्यवादी म्हणतात त्याला पूर्वी तेव्हां पाहणारा म्हणत.

10मग शौल चाकराला म्हणाला तुझे बोलणे ठीक आहे चल आपण जाऊ. तेव्हां ज्या नगरात देवाचा माणूस होता तेथे ते गेले

11ते टेकडीवर नगराकडल्या चढणीवर जात होते तेव्हां मुली पाणी भरायला बाहेर जात असतां त्यांना भेटल्या आणि ते त्यांना म्हणाले पाहणारा येथे आहे काय?

12आणि त्यांनी त्यांना उत्तर देऊन म्हटले तो आहे पाहा तुझ्यापुढेच तो आहे. आता घाई करा कारण तो नगरात आला आहे कारण आज उंचस्थानात लोकांना यज्ञ करायचा आहे.

13तुम्ही नगरात जातानाच तो जेवायला उंचस्थानी चढून जाण्याच्या आधी त्याची भेट होईल कारण तो येण्याच्या अगोदर लोक जेवणार नाहीत कारण तो यज्ञ ला आशीर्वाद देतो मग बोलावलेले जेवतात; तर आतां तुम्ही वर जा कारण या वेळेस त्याची भेट होईल.

14मग ते नगराकडे चढून गेले आणि ते नगरात जाऊन पोहचतात तो पाहा शमुवेल उंचस्थानी चढून जायला निघताना त्याच्याकडे आला.

15शौलाच्या येण्यापूर्वी एक दिवस अगोदर परमेश्र्वराने शमुवेलाला प्रगट करून म्हणाला

16उद्या सुमारे या वेळेस बन्यामीनी प्रांतातून एक माणूस मी तुझ्याकडे पाठवीन आणि माझे लोक इस्त्राएल यांचा अधिकारी होण्यास त्याला तूं अभिषेक कर आणि तो पलिष्ट्यांच्या हातातून माझ्या लोकांना सोडवील; कारण मी आपल्या लोकांकडे पाहिले आहे आणि त्यांची आरोळी माझ्याकडे आलीआहे.

17आणि शमुवेल शौलाला पाहत असतां परमेश्र्वर त्याला म्हणाला पाहा ज्या माणसाविषयी मी तुला सांगितले तो हाच आहे; हा माझ्या लोकांवर अधिकार करील.

18मग शौल शमुवेलाजवळ वेशीत येऊन म्हणाला मी तुला विनंती करतो पाहणाऱ्याचे घर कोठे आहे ते मला सांग.

19तेव्हा शमुवेलाने शौलाला उत्तर देऊन म्हटले पाहणारा मीच आहे; माझ्या पुढे उंचस्थानी वर चला म्हणजे आज तुम्ही माझ्याबरोबर जेवाल आणि तुझ्या ह्रदयात जे आहे ते सर्व सांगून सकाळी मी तुला जाऊं देईन.

20आणि तुझी गाढवे तीन दिवसांमागें हरवली त्यावर तूं आपले चित्त ठेवूं नको कारण ती सांपडली आहेत; आणि इस्त्राएलाची सर्व इच्छा कोणाकडे आहे? तुझ्याकडे व तुझ्या बापाच्या सर्व घराण्याकढे ती आहे की नाही?

21तेव्हा शौलाने उत्तर देऊन म्हटले मी बन्यामीनी इस्त्राएलाच्या वंशामध्ये सर्वाहून धाकट्या वंशातला नाही काय? आणि बन्यामीनीच्या वंशांमध्ये सर्व घराण्यांपेक्षां माझे घराणे लहान आहे की नाही? तर तूं माझ्याशी असे कशाला बोलतोस?

22मग शमुवेलाने शौलाला व त्याच्या चाकराला बरोबर घेऊन भोजनशाळेत आणले आणि बोलावलेल्यांमध्ये त्यांना मुख्य ठिकाणी बसवले; बोलावलेले ते सुमारे तीसजण होते.

23तेव्हा शमुवेल स्वयंपाक्याशी बोलला वाटा मी तुला दिला होता व ज्याविषयी मी तुला म्हटले होते की हा तू आपल्याजवळ ठेव तो आण.

24तेव्हा स्वयंपाक्याने फरा व त्यावर जे होते ते घेऊन शौलापुढे ठेवले; मग तो बोलला पाहा जे राखून ठेवले ते आपणापुढे ठेवून खा कारण नेमलेल्या वेळे पर्यत ते तुझ्यासाठी राखून ठेवलेले आहे; कारण मी म्हटलें होते की मी लोकांना बोलावले आहे. असा त्या दिवशी शौल शमुवेलाबरोबर जेवला.

25आणि ते उंचस्थानावरून खाली नगरात आल्यावर त्याने घराच्या धाब्यावर शौलाशी संभाषण केले.

26आणि ते पहाटेस उठले व उजाडण्याच्या वेळेस असे झाले की शमुवेलाने शौलाला घराच्या धाब्यावर बोलावून म्हटले मी तुला पाठवून द्यावे म्हणून ऊठ. तेव्हां शौल ऊठला मग तो व शमुवेल असे दोघेजण बाहेर गेले.

27ते खाली नगराच्या शेवटास जात असता शमुवेल शौलाला म्हणाला चाकराने आम्हांपुढे चालावे म्हणून त्याला सांग परंतु मी तुला देवाचे वचन ऐकावावे म्हणून तू आधी थांब. आणि चाकर पुढे चालला.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Samuel 9 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran