Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Samuel 10 >> 

1तेव्हा शमुवेलाने तेलाची कुपी घेऊन शौलाच्या डोक्यावर ओतली आणि त्याचे चुंबन घेईन म्हटले परमेश्वराने तुला आपल्या वतनावर अधिकारी होण्यास अभिषेक केला म्हणून हे झाले की नाही?

2आज तूं माझ्यापासून गेल्यावर राहेलीच्या कबरेजवळ बन्यामीनाच्या प्रांतात सेल्सह येथे तुला दोन माणसे भेटतील ती तुला म्हणतील की ज्या गाढवांचा शोध करायला तूं गेला होतास ती सांपडली आहेत आणि पाहा तुझा बाप गाढवांची काळजी सोडून तुझी चिंता करीत आहे तो म्हणतो मी आपल्या मुलासाठी काय करू?

3मग तेथून तूं पुढे जाऊन ताबोराच्या एलोनाजवळ पोहचशील तेव्हां तेथे तीन करडू नेणारा एक व तीन भाकरी नेणारा एक व द्राक्षारसाची बुधली नेणारा एक अशी तीन माणसे देवाजवळ बेथेलाकडे जात असता तुला भेटतील.

4आणि ती तुला अभिवादन करून तुला दोन भाकरी देतील त्या तू त्यांच्या हातांतून घेशील.

5त्यानंतर देवाच्या टेकडीला म्हणजे जेथे पलिष्ट्यांची चौकी आहे तेथे जाशील; आणि तूं तेथे नगरास पोहचल्यावर भविष्यवाद्यांचा थवा व त्याच्यापुढे सतार व संबळ व सनई व वीणा वाजवणारे उंचस्थानावरून उतरत असता तू त्यांना भेटशील व ते भविष्यवाणी करशील.

6आणि देवाचा आत्मा जोराने तुझ्यावर येईल आणि त्याच्याबरोबर तूं भविष्यवाणी करशील व बदलून निराळा माणूस होशील.

7आणि ह्या सर्व चिन्ह तुला प्राप्त होतील तेव्हां असे होवो की तुला प्रसंग मिळेल तसे तू कर कारण देव तुझ्याबरोबर आहे.

8तेव्हा तू माझ्या अगोदर खाली गिलगालास जा आणि पाहा होमार्पणे अर्पण करायला व शांत्यर्पणाचे यज्ञ करायला मी खाली तुझ्याकडे येईन; मी तुझ्याकडे येऊन जे तुला करायचे आहे ते तुला कळवीन तोपर्यत सात दिवस तूं माझी वाट पाहा.

9आणि असे झाले की शमुवेलापासून जायला त्याने आपली पाठ फिरवल्यावर देवाने त्याला दुसरे ह्रदय दिले; आणि त्या सर्व चिन्ह त्याच दिवशी त्याला प्राप्त झाले.

10आणि डोंगराजवळ ते आले तेव्हां पाहा भविष्यवाद्यांचा थवा त्याला भेटला आणि देवाचा आत्मा जोराने त्याच्यावर आला व त्याच्यामध्ये तो भविष्यवाणी करू लागला.

11तेव्हा असे झाले की ज्यांना पूर्वी त्याची ओळख होती त्या सर्वानी पाहिले की तो कीशाच्या मुलाला हे काय झाले? शौल भविष्यवाद्यांमध्ये आहे काय?

12तेव्हा त्या ठिकाणाचा कोणी एक उत्तर करून बोलला त्यांचा बाप कोण आहे? यावरून अशी म्हण पडली की शौलहि भविष्यवाद्यांमध्ये आहे काय?

13भविष्यवाणी करणे समाप्त केल्यावर तो उंचस्थानाकडे आला.

14आणि शौलाचा काका त्याला व त्याच्या चाकराला म्हणाला तुम्ही कोठे गेला होता? तो बोलले आम्ही गाढवांचा शोध करीत गेलो ती नाहीत असे पाहून आम्ही शमुवेलाकडे गेलो.

15मग शौलाचा काका म्हणाला मी तुम्हाला विनंती करतो शमुवेल तुम्हाशी काय बोलला ते मला सांग.

16तेव्हा शौल आपल्या म्हणाला काकाला म्हणाला गाढवे सापडली असे त्याने आम्हाला उघड सांगितले. परंतु राज्याविषयीची जी गोष्ट शमुवेल बोलला ती त्याने त्याला सांगितली नाही.

17मग शमुवेलाने लोकांना मिस्पा येथे परमेश्र्वराजवळ बोलावले.

18तेव्हा तो इस्त्राएलाच्या संतानाना म्हणाला परमेश्र्वर इस्त्राएलाचा देव असे म्हणतो मी मिसरातून इस्त्राएलास वर आणले आणि मिसऱ्याच्या हातातून व तुम्हास पिडणारी जी राज्ये त्या सर्वाच्या हातातून तुम्हास सोडवले.

19आणि तुमचा देव जो स्वत:तुमच्या सर्व शत्रूपासून व तुमच्या संकटातून तुम्हास सोडवतो त्याला तुम्ही आज नाकारले आणि आम्हांवर राजा करून ठेव असे त्याला म्हटले; तर आता आपल्या वंशाप्रमाणे व आपल्या हजारांप्रमाणे परमेश्र्वराच्या समोर उभे राहा.

20शमुवेलाने इस्त्राएलाचे सर्व वंश जवळ आणले तेव्हां बन्यामीनाचा वंश घेण्यात आला.

21मग त्याने बन्यामीनाचा वंश त्यातील घराण्याप्रमाणे जवळ आणला आणि मात्रीचे घराणे आणि कीशाचा मुलगा शौल घेण्यात आला; पण त्यांनी त्याचा शोध केला तेव्हा तो सापडला नाही.

22मग त्यांनी परमेश्र्वराला आणखी विचारले की तो माणूस इकडे फिरून येईल काय? तेव्हा परमेश्र्वराने उत्तर दिले पाहा तो सामानामध्ये लपला आहे.

23मग त्यांनी धांवून त्याला तेथून आणले आणि तो लोकांमध्ये उभा राहिला. तेव्हा सर्व लोक त्याच्या खांद्यास लागत इतका तो उंच होता.

24तेव्हां शमुवेल सर्व लोकांना म्हणाला ज्याला परमेश्र्वराने निवडले त्याला तुम्ही पाहता काय? त्याच्यासारखा सर्व लोकांत कोणी नाही! सर्व लोक ओरडून म्हणाले राजा दिर्घ आयुष्यी होवो.

25तेव्हां शमुवेलाने राज्याची रीत लोकांना सांगितली आणि ती एका पुस्तकात लिहून परमेश्र्वराच्या समोर ठेवली. मग शमुवेलाने सर्व लोक एकेक आपापल्या घरी लावून दिले.

26शौलहि आपल्या घरी गिबा येथे गेला आणि ज्यांच्या ह्रदयाला देवाने स्पर्श केला अशा काही बलवान माणसे त्यांच्याबरोबर गेले.

27परंतु कित्येक नालायक माणसे होती म्हणाली हा आम्हाला कसा सोडवील? आणि त्यांनी त्याचा अनादर केला व त्याला काही भेट आणली नाही तरी पण शौल शांतच राहिला.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Samuel 10 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran