Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Samuel 11 >> 

1मग नाहाश अम्मोनी याने जाऊन याबेश- गिलादास वेढा घातला. तेव्हां याबेशांतल्या सर्व माणसांनी नाहाशाला म्हटले आम्हाशी करार कर म्हणजे आम्ही तुझी सेवाकरू.

2तेव्हा नाहाश अम्मोनी त्यांना म्हणाला मी तुम्हाशी अशा अटीवर तो करार करीन की मी तुम्हातील प्रत्येकाचा उजवा डोळा फोडून सर्व इस्त्राएलाची मानहानी करीन.

3तेव्हां याबेशाच्या वडिलांनी त्याला म्हटले आम्हांला सात दिवसांचा अवकाश दे; म्हणजे इस्त्राएलाच्या सर्व प्रातांत आम्ही दूत पाठवू; मग जर आम्हाला सोडवायला कोणी येत नसला तर आम्ही बाहेर तुझ्याकडे येऊ.

4आणि त्या दूतांनी शौलाच्या गिब्याकडे य़ेऊन या गोष्टी लोकांच्या कानावर घातल्या तेव्हां सर्व लोक मोठ्याने आवाज काढून रडू लागले.

5आणि पाहा शौल शेतातून गाईबैलांच्यामागून चालत येत असता. शौल म्हणाला लोकांना काय झाले म्हणून ते रडत आहेत? तेव्हां त्यांनी त्याला याबेशातील माणसे काय म्हणाली ते सांगितले.

6तेव्हां शौलाने ह्या गोष्टी ऐकल्यावर देवाचा आत्मा जोराने त्याच्यावर आला आणि त्याचा राग फारच भडकला.

7मग बैलांची जोडी घेऊन त्याने त्यांचे तुकडे तुकडे केले आणि दूतांच्या हातून ते इस्त्राएलाच्या सर्व प्रांतात पाठवून सांगितले की जो कोणी शौलाच्यामागे व शमुवेलाच्यामागे येत नाही त्याच्या बैलांना असे करण्यात येईल. तेव्हां परमेश्र्वराचे भय लोकांवर पडले व ते एक मनाचे माणसे होऊन एकत्र येऊन निघून गेले.

8मग त्याने बेजेकात त्यांची नोद केली आणि इस्त्राएलाची संताने तीन लाख होती व यहूद्यांची माणसे तीस हजार होती.

9तेव्हां जे दूत आले होते त्यांना त्यांनी म्हटले याबेश -गिलादाच्या माणसांस असे सांगा की उद्यां सूर्य तापेल तेव्हां तुमचे सुटका होईल. मग दूतांनी जाऊन याबेशाच्या मनुष्यांना तसे सांगितले; तेव्हां ते आनंदित झाले.

10मग याबेशांतील माणसे म्हणाली उद्यां आम्ही बाहेर तुम्हाकडे येऊ तेव्हा तुम्हाला बरे दिसेल तसे आमचे करा.

11मग सकाळी असे झाले की शौलाने लोकांच्या तीन टोळ्या केल्या आणि त्यांनी पहाटेच्या प्रहरी छावणीमध्ये येऊन दिवस तापेपर्यत अम्मोन्यांवर हल्ला केला आणि त्यांचा पराभव केला; आणि असे झाले की जे उरले त्यांतले दोन देखील एका ठिकाणी मिळाले नाहीत जे वाचले त्यांची पांगापांग झाली.

12मग लोक शमुवेलाला म्हणाले शौल आम्हावर राज्य करील काय असे जो बोलला तो कोण आहे? ती माणसे काढून दे म्हणजे आम्ही त्याना जिवे मारू.

13तेव्हा शौल बोलला आज कोणा माणसालाहि जिवे मारायचे नाही कारण आज परमेश्र्वराने इस्त्राएलास सोडवले आहे.

14तेव्हां शमुवेलाने लोकांस म्हटले चला आपण गिलगालास जाऊन तेथे नव्याने राज्य स्थापन करू.

15मग सर्व लोक गिलगालास गेले आणि गिलगालात त्यांनी परमेश्र्वराच्यासमोर शौलाला राजा केले आणि तेथे परमेश्र्वराच्यासमोर त्यांनी शांत्यर्पणांचे यज्ञ अर्पण केले; तेव्हां तेथे शौल व इस्त्राएलाची सर्व माणसे यांना फार आनंद झाला.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Samuel 11 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran