Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Samuel 12 >> 

1शमुवेल सर्व इस्त्राएलास म्हणाला पाहा जे तुम्ही मला म्हणाला ती प्रत्येकगोष्ट ऐकून मी तुम्हांवर एक राजा नेमला आहे.

2तर आतां पाहा राजा तुम्हांपुढे चालत आहे आणि मी म्हातारा होऊन केस पिकलेला झालो आहे आणि पाहा माझे मुलगे तुम्हाजवळ आहेत व मी आपल्या तरुणपणासून आजपर्यत तुम्हापुढे चाललो आहे.

3मी येथे आहे; परमेश्र्वराच्यासमोर व त्याच्या अभिषिक्तासमोर माझ्याविरूध्द साक्ष द्या; मी कोणाचा बैल घेतला काय? मी कोणाचे गाढव घेतले काय? मी कोणाला लबाडीने लुबाडले आहे काय? मी कोणावर जुलूम केला आहे काय? मी डोळे बंद करून कोणाकडून लाच घेतली काय? माझ्याविरूध्द साक्ष द्या आणि मी त्याची भरपाई करीन.

4ते म्हणाले तू आम्हाला फसवले नाही आमच्यावर जुलूम केला नाही किंवा कोणा मनुष्याच्या हातून काकीकी चोरल नाही.

5मग तो त्यांना म्हणाला माझ्या हाती तुम्हास काही सापडले नाही याविषयी आज परमेश्र्वर तुमच्यासंबंधाने साक्षी आहे आणि त्याचा अभिषिक्त साक्षी आहे. आणि ते म्हणाले परमेश्र्वर साक्षी आहे.

6शमुवेल लोकांना म्हणाला ज्याने मोशेला व अहरोनाला नेमले आणि ज्याने तुमच्या वडिलांना मिसर देशातून काढून वर आणले तो तर परमेश्वरच आहे.

7तर आता स्थिर उभे राहा म्हणजे परमेश्वराने न्यायीपणाची जी सर्व कृत्ये तुम्हांसाठी व तुमच्या वडिलांसाठी केली त्याविषयी मी परमेश्वरासमोर विनंती करतो

8याकोब मिसरात गेल्यावर तुमच्या वडिलांनी परमेश्वराकडे आरोळी केली तेव्हा परमेश्र्वराने मोशेला व अहरोनाला पाठवले त्यांनी तुमच्या वडिलांना मिसरातून काढून आणले आणि याठिकाणी वसवले.

9पण परमेश्र्वर त्यांचा देव याला ते विसरले तेव्हा त्याने त्यांना हासोराचा सेनापति सीसरा याच्या हाती व पलिष्ट्यांच्या हाती व मवाबाचा राजा याच्या हाती त्यांना विकले आणि हे त्याच्याशी लढले.

10तेव्हां ते परमेश्र्वराला हाक मारून म्हणाले आम्ही पाप केले आहे कारण आम्ही परमेश्वराला सोडून बाल देव आणि अष्टारोथ यांची सेवा केली आहे परंतु आता तू आमच्या शत्रूच्या हातातून आम्हास सोडीव म्हणजे आम्ही तुझी सेवा करू.

11मग परमेश्र्वराने यरुब्बाल बदान व इफताह व शमुवेल यांना पाठवून तुम्हाला तुमच्या चहूकडल्या शत्रूच्या हातातून सोडवले आणि तुम्ही स्वस्थ राहिला.

12परंतु अम्मोनाच्या संतानाचा राजा नाहाश तुम्हावर आला असे तुम्ही पाहिले तेव्हा तुम्ही मला म्हटले की असे नको तर आम्हावर राजा राज्य करो; तेव्हां परमेश्र्वर तुमचा देव तुमचा राजा होता.

13तर आता जो राजा तुम्ही निवडला ज्याला तुम्ही मागितले तो पाहा; आणि पाहा परमेश्र्वराने तुम्हावर राजा नेमला आहे.

14जर तुम्ही परमेश्र्वराचे भय धरून त्याची सेवा कराल व त्याची वाणी ऐकाल आणि परमेश्र्वराच्या आज्ञेविरुध्द बंड करणार नाही आणि जर तुम्ही व तुम्हावर राज्य करणारा तुमचा राजाहि परमेश्र्वर तुमचा देव याला मानीत जाल तर बरे.

15परंतु तुम्ही परमेश्र्वराची वाणी न ऐकून त्याच्या आज्ञेच्याविरुध्द बंड कराल तर परमेश्र्वराचा हात जसा तुमच्या वडिलांविरुध्द होता तसा तो तुमच्याविरुध्द होईल.

16तर आता तुम्ही उपस्थित राहा आणि जी मोठी गोष्ट परमेश्र्वर तुमच्या डोळ्यांपुढे करणार आहे ती पाहा.

17आज गव्हाची कापणी आहे की नाही? परमेश्र्वराला मी हाक मारीन अशासाठी की त्याने मेघांच्या गडगडाटसह पाऊस पाठवावा मग तुम्ही जाणाल व पाहाल की तुम्ही आपणासाठी राजा मागून परमेश्र्वराच्या दृष्टीने किती मोठे दुष्टपण केले.

18तेव्हां शमुवेलाने परमेश्र्वराला हाक मारली आणि त्याच दिवशी परमेश्र्वराने मेघगर्जनासह पाऊस पाठवला म्हणून सर्व लोकांना परमेश्र्वराचे व शमुवेलाचे फार भय वाटले.

19तेव्हा अवघे लोक शमुवेलाला म्हणाले आम्ही मरू नये म्हणून परमेश्र्वर तुझा देव याच्यापाशी तूं आपल्या सेवंकासाठी प्रार्थना कर कारण आम्ही राजा मागून आपल्या सर्व पापांत आणखी ह्या दुष्कर्माची भर टाकली आहे.

20मग शमुवेल लोकांना म्हणाला भिऊ नका तुम्ही हे सर्व दुष्कर्म केले आहे खरे तथापि परमेश्र्वराला अनुसरण्याचे सोडून भलतीकडे फिरू नका तर आपल्या संपूर्ण ह्रदयाने परमेश्र्वराची सेवा करा.

21आणि तुम्ही भलत्या गोष्टीकडे वळू नका कारण जे लाभदायक नाहीत व ज्यांच्याने रक्षण करवत नाही कारण त्या निरोपयोगी आहेत.

22कारण आपल्या महान नावाकरिता परमेश्र्वर आपल्या लोकांना नाकारणार नाही. कारण परमेश्र्वराने तुम्हाला आपले स्वत:चे लोक असे केले.

23आणि मी तुम्हांसाठी प्रार्थना करायची सोडून देण्याने मी परमेश्र्वराच्या विरूध्द पाप करावे हे माझ्यापासून दूरच असो परंतु चांगला व सरळ मार्ग मी तुम्हांस शिकवीन

24केवळ परमेश्र्वराला भ्या आणि खरेपणात वागून आपल्या संपूर्ण ह्रदयाने तुम्ही त्याची सेवा करा काऱण त्याने तुम्हासाठी केवढी महान कृत्ये केली आहेत हे तुम्ही लक्षात घ्या.

25परंतु जर तुम्ही वाईट करण्याचे चालूच ठेवाल तर तुम्ही आणि तुमचा राजा दोघे नष्ट व्हाल.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Samuel 12 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran