Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Samuel 13 >> 

1शौल राज्य करू लागला तेव्हा तो चाळीस वर्षाचा होता आणि दोन वर्षे इस्त्राएलावर राज्य केल्यानंतर

2शौलाने इस्त्राएलांतून तीन हजार पुरुष निवडून घेतले; त्यांतले दोन हजार त्याच्याबरोबर मिखमाशांत व बेथेलाच्या डोंगरात होते आणि योनाथोनाबरोबर बन्यामीनाच्या गिब्यात एक हजार होते; आणि बाकीच्या लोकांना त्याने त्यांच्या घराकडे पाठवले प्रत्येकजण त्याच्या तंबूकडे गेला.

3आणि गिब्यात पलिष्ट्यांच्या सैन्यांना योनाथानाने पराजित केले आणि पलिष्ट्यांनी त्याविषयी ऐकले. तेव्हा शौलाने सर्व मुलखात शिंग वाजवून म्हटले इब्र्यांना ऐकू द्या.

4आणि शौलाने पलिष्ट्यांच्या सैन्याला पराजित केले आणि पलिष्ट्यांनी इस्त्रएलास तुच्छ मानले असे सर्व इस्त्राएलांनी ऐकले; आणि लोक शौलाजवळ गिलगालात एकत्र जमले.

5मग तीन हजार रथ व सहा हजार रथ चालवणारे व समुद्राच्या वाळूसारखे असंख्य लोक घेऊन पलिष्टी इस्त्राएलाशी लढाई करायला जमले आणि त्यांनी मिखमाशात येऊन बेथ- आवेनासमोर तळ दिला.

6जेव्हा आपण अडचणीत आहो इस्त्राएलांनी पाहिले. कारण लोक निराश झाले होते तेव्हां लोक गुहा व झुडपात विहरीत व खड्यात लपले.

7आणि कित्येक इब्री यार्देनेच्या पलीकडे गाद व गिलाद या प्रांतात गेले; पण शौल गिलगालात तसाच राहिला आणि सर्व लोक त्याच्यामागे थरथर कापत गेले.

8शमुवेलाने नेमलेल्या वेळेप्रमाणे तो सात दिवस थांबला परंतु शमुवेल गिलगालास आला नाही आणि लोक त्याच्यापासून विखरून जाऊ लागले.

9तेव्हां शौलाने म्हटले होमार्पणे व शांत्यर्पणे इकडे माझ्यापाशी आणा. मग त्याने होमार्पण अर्पिले.

10त्याने जसे होमार्पण अर्पिण्याची समाप्ति केली तितक्यात पाहा शमुवेलाच आगमन झाल. शौल त्याला भेटण्यास आणि अभिवादन करायला बाहेर गेला

11तेव्हा शमुवेल म्हणाला तू हे काय केले आहे? शौलाने म्हटले कारण मी पाहिले की लोक माझ्यापासून निघून जाऊ लागले आणि नेमलेल्या दिवसाच्या आत तू आला नाहीस आणि पलिष्टी मिखमाश येथे जमले आहेत.

12म्हणून मी म्हणालो पलिष्टी खाली गिलगालास माझ्याविरूध्द येत आहेत आणि मी परमेश्वराची मर्जी अद्याप मिळवली नाही म्हणून मी स्वत:च्या मजबुरीने भाग पडून होमार्पण अर्पिले.

13नंतर शमुवेल शौलाला म्हणाला तू मूर्खपणाचे कृत्य केले. परमेश्वर तुझा देव याने जी अाज्ञा तुला आज्ञापिली ती तू मानली नाही; मानली असती तर आता परमेश्वराने इस्त्राएलावर तुझे राज्य निरंतर स्थापले असते.

14परंतु आतां तुझे राज्य चालू राहणार नाही; परमेश्र्वराने आपल्या मनासारखा मनुष्य शोधून त्याला आपल्या लोकांचा राजपुत्र होण्यास नेमले आहे; कारण परमेश्र्वराने जे तुला आज्ञापिले ते तूं पाळले नाही.

15मग शमुवेल उठून गिलगालाहून बन्यामीनातील गिबा येथे गेला; आणि शौलाने आपणाजवळ जे लोक होते त्यांची गणना केली; ते सुमारे सहाशे होते.

16शौल व त्याचा मुलगा योनाथान व त्याच्याबरोबरचे लोक बन्यामीनांतील गिब्यात राहिले आणि पलिष्ट्यांनी मिखमाशात छावणी केली.

17आणि पलिष्ट्यांच्या छावणीतून छापा मारणाऱे तीन टोळ्या करून निघाले; एक टोळी एफ्राच्या वाटेने शुवालाच्या प्रांताकडे गेली

18आणि दुसरी टोळी बेथ- होरोनाच्या वाटेने गेली आणि आणखी एक टोळी जो प्रांत सबोईम खोऱ्याकडला आहे त्याच्या वाटेने रानाकडे वळली.

19तेव्हां इस्त्राएलाच्या सर्व देशात कोणी लोहार मिळेना कारण पलिष्ट्यांनी म्हटले होते कदाचित इब्री आपणांसाठी तरवारी किंवा भाले करून घेतील.

20परंतु सर्व इस्त्राएली एकएक आपला नांगराचा फाळ व आपली कुदळ व आपली कुऱ्हाड विळ्यांना धार देण्यासाठी खाली पलिष्ट्यांकडे जात.

21नांगराचा फाळ आणि कुदळ यांना धार लावण्याचे शुल्क दोन तृतीयांश शेकेल आणि एक तृतीयांश कुऱ्हाडीला धार देण्यासाठी आणि पराणी सरळ करण्यासाठी.

22आणि लढाईच्या दिवशी असे झाले की जे लोक शौल व योनाथान यांच्याजवळ होते त्यांच्यांतल्या कोणाच्याहि हाती तरवार व भाला नव्हता; पण शौल व त्याचा मुलगा योनाथान यांच्याजवळ होत.

23आणि पलिष्ट्याचे सैन्य निघून मिखमाशाच्या उताराकडे गेले.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Samuel 13 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran