Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Samuel 14 >> 

1आणि एके दिवशी असे झाले की शौलाचा मुलगा योनाथान आपल्या शस्त्रवाहक तरुणाला म्हणाला चल आपण पलिष्यांचे ठाणे जे पलीकडे आहे त्याकडे जाऊ. परंतु त्याने आपल्या बापाला हे सांगितले नाही.

2आणि शौल गिब्याच्या शेवटल्या भागी मिग्रोनांत डाळिंबाच्या झाडाखाली राहत होता त्याच्याजवळचे लोक सुमारे सहाशे होते;

3आणि एलीचा मुलगा फिनहास याचा मुलगा इखाबोद याचा आऊ एहीटूब याचा मुलगा अहीया शिलोत एफोद घातलेला यहोवाचा याजक हाहि होता. तेव्हा योनाथान गेला हे लोकांना माहित नव्हते.

4आणि योनाथान ज्या घाटांनी पलिष्ट्याच्या ठाण्यावर जाण्यास पाहत होता त्याच्या एका बाजूला खडकाळ शिखर व दुसऱ्या बाजूला खडकाळ शिखर होते; त्यांतल्या एकांचे नांव बोसेस व दुसऱ्याचे नांव सेने असे होते;

5एक शिखर उत्तरेकडे मिखमाशासमोर उठलेले व दुसरे दक्षिणेकडे गिब्यासमोर उठलेले होते.

6आणि योनाथान आपल्या तरुण शस्त्रवाहकाला म्हणाला चल आपण त्या बेसुनत्यांच्या ठाण्यावर जाऊ कदाचित परमेश्र्वर आमच्यासाठी कार्य करील; कारण बहुतांनी किंवा थोडक्यांनी सोडायला परमेश्र्वाराला काही अडचण नाही.

7आणि त्याचा शस्त्रवाहक त्याला म्हणाला जे तुझ्या ह्रदयांत आहे ते सगळे कर. तूं पुढे जा; पाहा मी तुझ्या तुझ्याबरोबर आहें तुझ्या आज्ञा पालन करण्यास.

8तेव्हां योनाथान म्हणाला पाहा आपण त्या माणसाकडे जाऊन त्यास प्रगट होऊ.

9जर ते आम्हास म्हणताल आम्ही तुम्हांकडे येऊ तोपर्यत थांबा तर आम्ही आपल्या ठिकाणी उभे राहूं वर त्याच्याकडे जाणार नाही.

10परंतु जर ते म्हणतील की वर आम्हांकडे या तर आम्ही वर जाऊं कारण परमेश्र्वराने त्यांना आमच्या हाती दिले आहे; हेच आम्हांला चिन्ह होईल.

11मग त्या दोघांनी आपणांला पलिष्ट्यांच्या ठाण्यातील माणसांना प्रगट केले आणि पलिष्ट्यांनी म्हटले पाहा ज्या गुहांमध्यें इब्री लपले होते त्यांतून ते निघून येत आहेत.

12आणि ठाण्याच्या माणसांनी योनाथान व त्याचा शस्त्रवाहक यांना उत्तर देऊन म्हटले वर आम्हांकडे या म्हणजे आम्ही तुम्हांला काही गोष्टी दाखवू. तेव्हां योनाथान आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला माझ्यामागे वर ये कारण परमेश्र्वराने त्यांना इस्त्राएलाच्या हाती दिले आहे.

13मग योनाथान आपल्या हातांनी व आपल्या पायांनी चढून गेला आणि त्याचा शस्त्रवाहक त्याच्यामागोमाग चढून गेला. तेव्हा ते योनाथानासमोर पडले व त्याच्यामागून त्याचा शस्त्रवाहक त्यांना मारीत गेला.

14आणि जो पहिला वध योनाथानाने केला त्यात एक बिघा भूमीवर सुमारे वीस माणसे पडली.

15आणि छावणीत शेतात व सर्व लोकांमध्ये कंप झाला; ते ठाणे व छापे मारणारेहि कांपले व भूमि कापली; तेथे तर फार घबराट होती.

16तेव्हां बन्यामीनातील गिब्यांतल्या शौलाच्या पहारेकऱ्यांनी पाहिले की पलिष्ट्यी सैन्याचा जमाव पांगत आहे आणि ते इकडे तिकडे चालले होते.

17मग शौल आपल्याबरोबरच्या लोकांना म्हणाला आमच्यामधून कोण गेला आहे? मोजून पाहा. मग त्यांनी मोजून पाहिले तर योनाथान व त्याचा शस्त्रवाहक तेथे नव्हते.

18आणि शौलाने अहीयाला म्हटले देवाचा कोश इकडे आण कारण त्या समयी देवाचा कोश इस्त्राएल लोकांच्यामध्ये होता.

19आण असे झाले की शौल याजकाशी बोलत असता पलिष्याच्या छावणातला गलबला वाढत वाढत मोठा झाला तेव्हा शौलाने याजकाला म्हटले आपला हात काढून घे.

20तेव्हा शौल व त्याच्याजवळते सर्व लोक जमून लढाईला गेले; आणि पाहा प्रत्येक माणसाची तरवार आपल्या सोबत्याच्या विरुध्द झाली म्हणून फार मोठी दाणादाण झाली.

21तेव्हां जे इब्री पूर्वी पलिष्ट्याच्यामध्ये राहिले होते जे चहूकडून त्याच्याबरोबर छावणीत गेले होते तेहि शौल व योनाथान याच्याबरोबर जे इस्त्राएल होते त्याच्याशी मिळाले.

22आणि जी इस्त्राएली माणसे एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशांत लपली होती ती सर्व पलिष्टी पळत आहेत हे ऐकून लढाईत त्याच्या पाठीस लागली.

23असे परमेश्र्वराने त्यादिवशी इस्त्राएलास सोडवले आणि लढाई बेथ-आवेनाकडे गेली.

24त्या दिवशी इस्त्राएली पुरुष निराष झाले कारण शौलाने लोकांना शपथ घालून सांगितले होते संध्याकाळपर्यत मी आपल्या शत्रूचा सूड घेईपर्यत जो माणूस कांही खाईल त्याला शाप लागो. याकरितां लोकांतल्या कोणी कांही खाल्ले नाही.

25आणि देशातले सर्व लोक वनांत आले आणि भूमीवर मध होता;

26आणि वनांत लोक आले तेव्हा पाहा मधाचा ओघ वाहत होता; परंतु कोणी आपला हात आपल्या तोंडाला लावला नाही कारण लोक शपथेला भीत होते.

27परंतु जेव्हां आपल्या बापाने लोकांस शपथ घातली तेव्हां योनाथानाने ती ऐकली नव्हती म्हणून त्याने आपल्या हाती जी काठी होती तिचे टोक पुढे करून मधाच्या मोहळात घालून आपल्या तोंडास लावले; मग त्याचे डोळे टवटवीत झाले.

28तेव्हां लोकांतील एकाने उत्तर करून म्हटले तुझ्या बापाने लोकांना शपथ घालून निक्षून सांगितले की जो कोणी आज कांही अन्न् खाऊल त्याला शाप लागो. लोक तर थकले होते.

29तेव्हा योनाथान म्हणाला माझ्या बापाने देशास दुखित करून सोडला आहे; मी हा थोडा मध चाखला आणि पाहा माझे डोळे कसे टवटवीत झाले आहेत?

30जर लोकांनी आपल्या शत्रूंच्या मिळालेल्या लुटीतून आज इच्छेप्रमाणे खाल्ले असते तर कितीतरी बरे होते! कारण आतां पलिष्टांचा आधिक मोठा घात झाला नसता काय?

31आणि त्या दिवशी ते मिखामाशापासून अयालोनापर्यत पलिष्ट्यांना मारीत गेले मग लोक फार थकलेले होते.

32तेव्हां लोक लुटीवर तुटून पडले आणि मेंढरे व गुरे व वासरे घेऊन भूमीवर कापून रक्तासुध्दां लोक खाऊं लागले.

33तेव्हां कोणी शौलास सांगितले की पाहा लोक रक्तासुध्दा खाऊन परमेश्र्वराच्या विरुध्द पाप करत आहात. त्याने म्हटले तुम्ही अविश्र्वासूपणे कृत्ये करत आहात; मोठा दगड लोटून आज माझ्या कडे आणा.

34आणि शौलाने म्हटले लोकांमध्ये धावत जाऊन त्यांना सांगा की प्रत्येक माणसाने आपला बैल व प्रत्येक माणसाने आपली मेढरें माझ्यापाशी आणून येथे कापावी मग खावे; रक्तसुध्दां खाऊन परमेश्र्वराच्याविरुध्द पाप करू नका. तेव्हां सर्व लोकांनी प्रत्येक माणसाने आपापले बैल आपल्या हाताने त्या रात्री आणून तेथे कापले.

35मग शौलाने यहोवाला अर्पणे अर्पिण्यासाठी वेदी बांधली; जी पहिली वेदी त्याने परमेश्र्वराला अर्पणे अर्पिण्यासाठी बांधली ती हीच होती.

36मग शौल बोलला आपण रात्री पलिष्ट्यांच्यामागे खाली जाऊन उद्यां उजाडेपर्यत त्याच्यांतली लूट घेऊ आणि आपण त्याच्यांतील एकहि माणूस उरू देऊ नये. ते म्हणाले जे तुला बरे वाटेल ते कर. मग याजकाने म्हटले आपण येथे देवाजवळ येऊ.

37मग शौलाने विचारले की मी पलिष्ट्यांत्यामागे खाली जाऊ काय तूं त्यांना इस्त्राएलांच्या हाती देशील काय? परंतु त्या दिवशीं त्याने कांही उत्तर दिले नाही.

38मग शौल म्हणाला अहो लोकांच्या सर्व पुढाऱ्यांनो इकडे या आणि हे पाप कशाने घडलें आहे तें शोध करून पाहा;

39कारण परमेश्र्वर जो इस्त्राएलाचे रक्षण करतो तो जिवंत आहे; म्हणून हे पाप माझा मुलगा योनाथान याने जरी केले तरी तो खचित मरेल. पण सर्व लोकांतील कोणीहि त्याला उत्तर दिले नाही.

40मग त्याने सर्व इस्त्राएलांस म्हटले तुम्ही एका बाजूला व्हा आणि मी व माझा मुलगा योनाथान दुसऱ्या बाजूला होऊं. लोक तर शौलाला म्हणाले तुला बरे वाटेल ते कर.

41मग शौल यहोवा इस्त्राएलाचा देव त्याला म्हणाला खरे ते दाखीव. तेव्हां योनाथान व शौल धरले गेले आणि लोक सुटले.

42मग शौलाने म्हटले माझ्यामध्ये व योनाथान माझा मुलगा याच्यामध्ये पण चिठ्या टाका. तेव्हा योनाथान धरला गेला.

43मग शौल योनाथानाला म्हणाला तूं काय केले आहे ते सांग योनाथान त्याला म्हणाला मी आपल्या हातांतल्या काठीच्या टोकाने थोडा मध चाखला खरा आणि पाहा मला मेले पाहिजे.

44तेव्हा शौल म्हणाला देव तसे व त्यापेक्षां अधिकहि करो; योनाथाना तुला तर खचित मेले पाहिजे.

45मग लोक शौलाला म्हणाले ज्याने इस्त्राएलाचे हे मोठे तारण केले तो योनाथान मरावा काय? ते तर दूरच असो! परमेश्र्वर जिवंत आहे याच्या डोक्याचा एक केसही भूमीवर पडणार नाही कारण याने देवाच्यासंगती काम केले आहे. या प्रकारे लोकांनी योनाथानाला सोडवले म्हणून तो मेला नाही.

46मग शौल पलिष्ट्यांचा पाठलाग करण्याचे सोडून वर गेला; पलिष्टीहि आपल्या ठिकाणी गेले.

47शौलाने तर इस्त्राएलावर राज्य करण्याचे हाती घेतले; त्याने चहूकडे आपल्या सर्व शत्रूशी म्हणजे मवाबी यांच्याशी व अम्मोनाच्या संतानाशी व अदोमी यांच्याशी व सोबाच्या राजांशी व पलिष्ट्यांशी लढाई केली आणि जेथे कोठे तो गेला तेथे त्याने त्यांना त्रासून सोडले.

48आणि त्याने पराक्रम करून अमालेकाला मार दिला आणि इस्त्राएलांना त्यांच्या लुटणाऱ्यांच्या हातांतून सोडवले.

49आणि योनाथान व इश्र्वी व मलकीशुवा हे शौलाचे मुलगे होते व त्याच्या दोघी मुलींची नांवे ही होती; प्रथम जन्मलेली मेरब व धाकटीचे नांव मीखल.

50आणि शौलाच्या बायकोचे नाव अहीनवाम ती अहीमासाची मुलगी होती आणि शौलाचा काका नेर याचा मुलगा अबनेर त्याचा सेनापति होता.

51आणि शौलाचा बाप कीश व अबनेराचा बाप हे अबियेलाचे मुलगे होते.

52आणि शौलाच्या सर्व दिवसात पलिष्ट्यांशी कठीण लढाई चालू होती; आणि शौल कोणी बलवान किंवा कोणी शूर पाही तेव्हां तो त्याला आपल्याजवळ ठेवून घेई.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Samuel 14 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran