Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Samuel 15 >> 

1आणि शमुवेल शौलाला म्हणाला देवाने आपले लोक इस्त्राएल यांच्यावर तू राजा व्हावे म्हणून तुला अभिषिक्त करायला मला पाठवले तर आता तू परमेश्ररची वचने ऐक.

2सैन्यांचा देव असे म्हणतो इस्त्राएल मिसरातून वर येत असता अमालेकाने त्याला काय केले म्हणजे तो वाटेवर त्याच्याविरुध्द कसा उभा राहिला हे मी पाहिले आहे.

3आता तू जाऊन अमालेकाला मार आणि त्यांचे जे आहे त्या सर्वांचा नाश कर त्यांना सोडू नको तर पुरुष व स्त्रीया मुले व बालके व गायबैल, मेंढरे व उंट व गाढव यांना जिवे मार.

4मग शौलाने लोकांना बोलावून तलाईमात त्यांची मोजणी केली; ते दोन लक्ष पायदळ होते व यहूदातील माणसे दहा हजार होती.

5मग शौल अमालेकाच्या नगराजवळ जाऊन एका खोऱ्यात दबा धरून राहिला.

6तेव्हा शौलाने केनी यांना म्हटले अमालेक्याबरोबर तुम्हांस मारू नये म्हणून तुम्ही त्याच्यांमधून निघून जा. तेव्हा केनी अमालेक्यामधून निघून गेले.

7मग शौलाने हवीला पासून मिसरासमोरील शूरापर्यत अमालेक्यांना मार दिला.

8आणि त्याने अमालेक्यांचा राजा अगाग याला जिवंत धरले आणि त्या सर्व लोकांस तरवारीच्या धारेखाली जिवे मारले.

9तथापि शौलाने व लोकांनी अगागला जिवंत ठेवले त्यांचा अगदीच नाश केला नाही; परंतु जे काही चांगले ते राखून ठेवले त्यांचा अगदीच नाश केला नाही; परंतु जे टाकाऊ आणि निरूपयोगी होते त्या सर्वांचा त्यांनी सपुंर्ण नाश केला.

10तेव्हा देवाचे वचन शमुवेलाकडे आले ते म्हणाले

11मी शौलाला राजा केले याचा मला दुु:ख होत आहे कारण तो मला स्विकारण्याचे सोडून मागे वळला आहे आणि त्याने माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत. मग शमुवेलाला राग आला आणि त्याने सारी रात्र देवाचा धावा केला.

12आणि शमुवेल शौलाला भेटण्यासाठी पहाटेच उठला तेव्हा कोणी शमुलेलाला सांगितले की शौल कर्मेलास आला होता आणि पाहा आपणासाठी स्मारक उभारून परतला व खाली गिलगालास गेला आहे.

13मग शमुवेल शौलाकडे आला आणि शौलाने त्याला म्हणाला परमेश्वर तुला आशीर्वादित करो मी परमेश्वराची आज्ञा पूर्णपणे पाळली आहे.

14तेव्हा शमुवेल म्हणाला तर मेढरांचे ओरडणे माझ्या कानी पडते व गायबैलांचे हंबरणे मी ऐकतो ते काय आहे?

15मग शौल म्हणाला लोकांनी ती अमालेक्यांपासून आणली कारण त्यांनी मेंढरे व गुरे यातील उत्तम ती परमेश्वर तुझा देव याला यज्ञ अर्पण करण्यासाठी राखून ठेवली आहेत; पण आम्ही बाकीचा पूर्णपणे नाश केला.

16तेव्हा शमुवेलाने शौलाला म्हटले तू थांब म्हणजे ह्या गेल्या रात्री देवाने मला काय सांगितले ते मी तुला सांगतो. आणि शौल त्याला म्हणाला सांग.

17मग शमुवेल म्हणाला तू आपल्या दृष्टीने लहान होतास तेव्हा तुला इस्त्राएलाच्या वंशाचा मुख्य करण्यात आले नाही काय?

18आणि देवाने तुझ्या मार्गावर पाठवून सांगितले की जा त्या पापिष्ट अमालेक्यांचा नाश कर ते नाहीसे होईपर्यत त्याच्यांशी लढाई कर.

19तर मग तू परमेश्र्वराचे वचन का मानले नाही? तू तर लुट पकडून परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते का केले?

20तेव्हा शौल शमुवेलाला म्हणाला मी परमेश्वराचे वचन मानले व ज्या मार्गावर परमेश्वराने मला पाठवले त्यात मी चाललो आणि अमालेक्यांचा नाश करून अमालेकाचा राजा अगाग याला मी घेऊन आलो आहे.

21परंतु ज्यांचा नाश करायचा होता अशी जी लुटीची मेंढरे व गुरे त्यातली उत्तम ती लोकांनी परमेश्वर तुझा देव याला गिलगालात यज्ञ करण्यासाठी घेतली.

22शमुवेल म्हणाला परमेश्र्वराला आपले वचन पाळण्याने जितका आनंद होतो तितका आनंद परमेश्वराला होमार्पणांनी व यज्ञांनी होतो काय? पाहा यज्ञापेक्षा आज्ञा पालन करणे आणि मेंढराच्या मादया पेक्षा वचन ऐकणे अधिक चांगले आहे.

23कारण बंडखोरी जादुगिरीच्या पापासारखी आहे आणि हट्ट हा मूर्तिपूजा व मूर्ति करणे यासारखा आहे; तूं परमेश्र्वराचे वचन नाकारले यामुळे राजा म्हणून त्याने तुला नाकारले आहे.

24मग शौल शमुवेलाला म्हणाला मी पाप केले आहे कारण मी परमेश्र्वराची आज्ञा व तुझी वचने मोडली आहेत; ते यामुळे की लोकांचे भय धरून मी त्यांचे ऐकले.

25तर मी तुला विनंती करतो माझ्या पापीची क्षमा कर; आणि मी देवाचे भजनपूजन करावें म्हणून माझ्याबरोबर परत ये.

26आणि शमुवेल शौलाला म्हणाला मी तुझ्याबरोबर परत जाणार नाही कारण तू देवाचे वचन धिक्कारले आणि देवाने तुला इस्त्राएलावर राज्य करण्यविषयी धिक्कारले आहे.

27आणि शमुवेल जायला वळला तेव्हा शौलाने त्याच्या झग्याचा काठ धरला व तो फाटला.

28तेव्हा शमुवेलाने तुला म्हटले देवाने आज इस्त्राएलाचे राज्य तुझ्यापासून फाडून घेऊन तुझा शएजारी जो तुझ्यापेक्षां बरा त्याला दिले आहे.

29आणि इस्त्राएलाचा विजय तो तर लबाडी करणार नाही किंवा अनुतापणार नाही कारण अनुतापायला तो मनुष्य नव्हे.

30तेव्हा शोल म्हणाला मी पाप केले आहे तरी आतां मी तुला विनंती करतो माझ्या लोकांच्या वडिलांसमोर व इस्त्राएलासमोर तू माझा सन्मान कर आणि यहोवा तुझा देव याचे भजनपूजन मी करावे म्हणून माझ्याबरोबर परत ये.

31मग शमुवेल वळून शौलाच्या मागे आला आणि शौलाने देवाचे भजनपूजन केले.

32मग शमुवेल म्हणाला अमालेक्याचा राजा अगाग याला माझ्याकडे आणा. तेव्हा अगाग डौलाने त्याच्याकडे आला आणि अगागाने म्हटले खचित मरणाचे कडूपण निघून गेले आहे.

33तेव्हा शमुवेल म्हणाला जसे तुझ्या तरवारीने बायकांना बालकाविरहित केले आहे तशी बायकांमध्ये तुझी आई बालकाविरहित होईल. मग शमुवेलाने गिलगालात यहोवाच्या समोर अगागाचे तुकडे तुकडे केले.

34त्यानंतर शमुवेल रामा येथे गेला आणि शौल आपल्या घरी शौलाच्या गिब्यास गेला.

35आणि शमुवेल आपल्या मरणाच्या दिवसापर्यत शौलाला भेटायला आणखी गेला नाही; तरी शमुवेलाने शौलासाठी शोक केला; आणि आपण शौलाला इस्त्राएलांवर राजा केले म्हणून यहोवा अनुतापला.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Samuel 15 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran