Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Samuel 16 >> 

1मग देवाने शमुवेलाला सांगितले कि मी इस्राएलावर राज्य करण्यापासून शौलाला नाकारले आहे तर तू किती काळ त्यासाठी शोक करशील? आपल्या शिंगात तेल भरून चल ईशाय बेथलेहेमी याच्याकडे मी तुला पाठवितो. कारण त्याच्या एका मूलाला माझ्यासाठी राजा निवडला आहे.

2तेव्हा शमुवेल म्हणाला मी कसा जाऊ? जर शौल ऐकेल तर मला जीवे मारील मग परमेश्वर म्हणाला. एक कालवड आपल्याबरोबर घे आणि मी देवाकडे यज्ञ कार्यास आलो आहे असे म्हण.

3त्या यज्ञास इशायला बोलाव नंतर काय करायचे ते मी तुला कळवीन आणि जो मी तुला सांगेन त्याला माझ्यासाठी अभिषेक कर.

4तेव्हा शमुवेलाने जे परमेश्वराने जे सांगितले ते केले मग बेथलेहेमास पोहचून नगराचे वडील भीतभीत त्याला भेटायास आले व त्यांना त्याला विचारले तू शांतीनेच आला आहेस न?

5मग त्याने म्हटले शांतीने मी परमेश्वराजवळ यज्ञ करायास आलो आहे तुम्ही शुद्धा व्हा मग मजबरोबर यज्ञास या. तेव्हा त्याने ईशाय व त्याचे पुत्र शुद्ध केल्यावर त्यास यज्ञास बोलाविले.

6आणि असे झाले कि त्याने अलीयाबास पाहून म्हटले परमेश्वरा समोर त्याचा अभिषिक्त निःसंशय हाच आहे.

7परंतु देवाने शमुवेलाला म्हटले कि त्याच्या स्वरूपाकडे व त्याच्या देहाच्या उंचीकडे पाहू नको कारण कि मी त्याला नाकारीले आहे जसे मनुष्य पाहतो तसे देव पाहत नाही कारण कि मनुष्य बाहेरील स्वरुप पाहतो परंतु देव हृदय पाहतो.

8मग ईशायाने आबीदानाला बोलाविले आणि त्याला शामुवेलापुढे चालविले परंतु त्याने म्हटले यातून कोणालाही देवाने निवडले नाही

9मग ईशायने शाम्मास पुढे चालविले परंतु त्याने म्हटले ह्यालाही परमेश्वराने निवडले नाही.

10तसे ईशायाने आपल्या सात पुत्रास शमुवेलापुढे चालविले परंतु शमुवेलाने इशायला म्हटले यांना देवाने निवडले नाही.

11तेव्हा शमुवेलाने ईशायला म्हटले तुझे सर्व पुत्र आले कि अजून कोणी येण्याच्या मार्गात आहे? मग तो म्हणाला आणखी धाकटा तो राहिला आहे पहा तो मेढंरे राखीत आहे. तेव्हा शमुवेलाने त्याला म्हंटले. त्याला येथे बोलावून आण त्याच्या येण्यापूर्वी आम्ही जेवायला बसणार नाही.

12मग त्याने त्याला बोलावून आणिले तो तांबूस रंगाचा सुंदर डोळे व त्याचे रुप मनोहर होते. तेव्हा देवाने त्याला म्हटले उठून ह्याला अभिषेक कर कारण हाच तो आहे.

13मग शमूवेलाने तेलाचे शींग घेऊन त्याच्या भावांच्यामध्ये त्याला अभिषेक केले आणि त्या दिवसापासून देवाचा आत्मा दाविदावर येऊन राहिला त्यानंतर शमुवेल उठून रामा येथे गेला.

14मग देवाच्या आत्म्याने शौलास सोडिले आणि देवापासून एक दुष्ट आत्मा त्याला त्रास करू लागला.

15तेव्हा शौलाचे चाकर त्याला म्हणाले आता पहा देवाकडून एक दुष्ट आत्मा तुला त्रास देतो.

16विणा वाजविणारा निपुण एक माणूस शोधा. अशी अाज्ञा आमचा धनी आपल्यासमोर जे चाकर त्यास करो मग जेव्हा दुष्ट आत्मा तुला त्रास देऊ लागेल तेव्हा तो आपल्या हाताने वाजवील आणि तू बरा होशील.

17मग शौलाने आपल्या चाकरास म्हंटले कि जा चांगला वाजविणारा माणूस माझ्याकडे शोधून मजपाशी आणा.

18मग चाकरातून एकाने असे उत्तर दिले कि पहा निपुण वाजविणारा व पराक्रमी लढाऊ माणूस व वक्ता व सुंदर व ज्याला परमेश्वर अनुकूल आहे असा पुरुष मी पहिला आहे तो ईशाय बेथेलहेमी ह्याचा पुत्र आहे.

19मग शौलाने ईशायजवळ दूत पाठवून म्हटले कि तुझा पुत्र दावीद जो मेढंरे राखीत असतो त्याला मजपाशी पाठवावे.

20तेव्हा इशायने एका भाकरीने लादलेले गाढव व द्राक्षरसाचा बूधला व एक करडू यांस घेऊन आपला पुत्र दावीद याच्या हाताने शौलाकडे पाठवले.

21आणि दावीद शौलाजवळ येऊन त्यासमोर उभा राहिला तेव्हा त्याने त्याच्यावर फार प्रीती केली आणि तो त्याचा शस्त्र वाहक झाला.

22मग शौलाने इशायजवळ निरोप पाठवून सांगितले मि तुला विनंती करतो कारण आता दावीदाला माझ्या जवळ राहू दे कारण त्याच्यावर माझी कृपाद्दष्टी झाली आहे.

23आणि असे झाले कि देवापासून दुष्ट आत्मा शौलावर आला असता दावीदाने विणा घेऊन आपल्या हाताने वाजवी तेव्हा शौल शांत होऊन तो बरा होई व तो दुष्ट आत्म्या त्याला सोडून जाई.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Samuel 16 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran