Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Samuel 8 >> 

1जेव्हां शमुवेल म्हातारा झाला तेव्हां त्याने आपले मुलगे इस्त्राएलावर न्यायाधीश नेमले.

2त्याच्या प्रथम जन्मलेल्या मुलाचे नाव योएल व दुसऱ्याचे नाव अबीया असे होते; बेरशेबा येथे ते न्यायाधीश होते.

3परंतु त्याचे मुलगे त्याच्या मार्गाने चालत नसत तर अप्रामाणिकपणे लाभाचा पाठलाग करत. ते लांच घेऊन आणि विकृत न्याय करीत असत.

4मग इस्त्राएलाचे सर्व वडील जमून रामा येथे शमुवेलाकडे आले.

5आणि ते त्याला म्हणाले पाहा तूं म्हातारा झाला आहे आणि तुझे मुलगे तुझ्या मार्गाने चालत नाहीत; आतां सर्व राष्ट्रांप्रमाणे आमचा न्याय करायला आम्हावर राजा नेम.

6परंतु आमचा न्याय करायला आम्हांला राजा दे असे जे त्यांनी म्हटले त्याबद्दल शमुवेलाला वाईट वाटले. मग शमुवेलाने परमेश्र्वराकडे प्रार्थना केली.

7तेव्हा परमेश्वराने शमुवेलास म्हणाला लोक सांगतात त्या सर्वाचा तूं शब्द ऐक कारण त्यांनी मला नाकारले आहे.

8मी त्यांना मिसरातून वर आणले त्या दिवसापासून आजपर्यत जी सर्व कामे त्यांनी केली त्याप्रमाणे त्यांनी हे केले आहे आणि मला सोडून अन्य देवाची सेवा त्यांनी केली; तसेच त्यांनी तुझ्याशी केले आहे

9तर आतां त्यांची वाणी एक तथापि तूं त्याच्याशी खडसावून बोल व जो राजा त्याच्यावर राज्य करील त्याची रीत त्यांना समजावून सांग.

10मग शमुवेलाने आपणाशी ज्या लोकांनी राजा मागितला होता त्यांना यहोवाची सर्व वचने सांगितली.

11आणि त्याने म्हटले जो राजा तुम्हावर राज्य करील त्याची रीत अशी होईल; तो तुमचे मुलगे घेऊन आपल्या रथांसाठी व आपले स्वार होण्यासाठीं ठेवील आणि त्याच्या रथांपुढे ते धावतील.

12आणि तो त्याना आपले हजारांचे सरदार नेमून ठेवील आणि जमीन नांगरायला व आपली पिके कापायला व आपली लढाईची शस्त्रे व आपली रथांची शस्त्रे करायला ठेवील.

13आणि तो तुमच्या मुली सुगंधी द्रव्ये व स्वयंपाकिणी व पोळ्या करणाऱ्या होण्यास घेईल.

14आणि तुमची शेते व तुमचे द्राक्षमळे व तुमचे जैतुनाचे मळे जे उत्तम ते घेऊन तो चाकरांना देईल.

15आणि तुमची पकें व तुमचे द्राक्षमळे यांचा दशमांश घेऊन तो आपल्या कारभाऱ्यांना देईल

16आणि तुमचे दास तुमच्या दासी व तुमचे चांगले तरुण व तुमचे गाढव घेऊन तो आपल्या कामाला लावील.

17तुमच्या मेंढरांचा दशमांश तो घेईल व तुम्ही त्याचे दास व्हाल.

18आणि त्या दिवसात तुम्ही आपणांसाठी निवडलेल्या राजामुळे ओरडाल परंतु परमेश्र्वर त्या दिवसात तुम्हास उत्तर देणार नाही.

19पण लोक शमुवेलाचा शब्द ऐकायला नाकारून म्हणाले असे नाही तर आम्हांवर राजा पाहिजेच;

20म्हणजे आम्ही दुसऱ्या सर्व राष्ट्रासारखे होऊ; आमचा राजा आमचा न्याय करील व आम्हांपुढे चालून आमच्या लढाया लढेल

21आणि शमुवेलाने लोकांचे सर्व ऐकून देवाच्या कानात सांगितले

22मग देव शमुवेलाशी बोलला तू त्यांचा शब्द ऐकून त्याच्यांवर राज्य करायला राजा नेमून ठेव तेव्हा शमुवेल इस्त्रएलाच्या मनुष्यांना म्हणाला तुम्ही प्रत्येक आपापल्या नगरास जा.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Samuel 8 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran