Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Samuel 7 >> 

1मग किर्याथ-यारीमाची माणसे आली आणि त्यांनी यहोवाचा कोश नेला व तो टेकडीवर अबीनादाबाच्या घरात आणून ठेवला आणि त्यांनी त्याचा मुलगा एलाजार याला यहोवाचा कोश राखायला पवित्र केले.

2आणि असे झाले की कोश किर्याथ-यारीमात राहिला त्या दिवसापासून बहुत काळ लोटला म्हणजे वीस वर्षे झाली आणि इस्त्राएलाच्या सर्व घराण्याने शोक केला आणि परमेश्र्वराकडे वळू शकले.

3शमुवेल इस्त्राएलाच्या सर्व घराण्याशी बोलला तो म्हणाला जर तुम्ही आपल्या सर्व ह्रदयाने परमेश्र्वराकडे परत वळता तर आपणापासून परके देव व एष्टारोथ दूर करा आणि तुम्ही आपली ह्रदये परमेश्वराकडे लावून केवळ त्याचीच सेवा करा म्हणजे तो तुम्हांस पलिष्य्ट्यांच्या हातून सोडवील

4मग इस्त्राएली लोकांनी बाल व अष्टरोथ काढून टाकले केवळ परमेश्र्वराचीच आराधना करू लागले.

5आणि शमुवेल बोलला सर्व इस्त्राएलांस मिस्पा येथे एकवट करा म्हणजे मी तुम्हासाठी परमेश्र्वराला विनंती करीन.

6मग ते मिस्पात जमले आणि त्यांनी पाणी काढून परमेश्र्वराच्या समोर ओतले व त्या दिवशी उपास करून तेथे म्हटले आम्ही परमेश्र्वराच्या विरूध्द पाप केले आहे. तेव्हां शमुवेलाने मिस्पात इस्त्राएली लोकांचे वादविवाद मिटवण्याचे ठरवले आणि लोकांच मार्गदर्शन केल.

7आणि इस्त्राएलाची लोक मिस्पांत जमली आहेत असे पलिष्यांनी ऐकले तेव्हा पलिष्टयांचे अधिकारी इस्त्राएलावर चढाई करून आले. तेव्हां इस्त्राएली लोक हे ऐकून पलिष्ट्यांना घाबरली.

8नंतर इस्त्राएली लोक शमुवेलाला म्हणाली परमेश्र्वर आमचा देव याकडे आम्हासाठी धावा करण्याचे थांबवू नका. तो आम्हाला पलिष्ट्यांच्या हातून सोडवेल.

9मग शमुवेलाने एक दूध पिणारे कोकरू घेऊन त्याचे संपूर्ण होमार्पण परमेश्र्वराला केले; आणि शमुवेलाने इस्त्रएलासाठी परमेश्र्वराचा धावा केला आणि तेव्हा परमेश्र्वराने त्याला उत्तर दिले.

10आणि शमुवेल होमार्पण अर्पण करत होता तेव्हा पलिष्टी इस्त्राएलाशी लढायला जवळ आले; परंतु त्यादिवशी परमेश्र्वराने पलिष्ट्याविरूध्द मोठ्या आवाजात गडगडाट करून त्यांस घाबरे केले व गोंधळात टाकले आणि इस्त्राएलापुढे त्यांचा पराभव झाला.

11तेव्हा इस्त्राएलाची माणसे मिस्पातून निघून पलिष्ट्यांच्या पाठीस लागली आणि बेथ-कारापर्यत त्यांना मारीत गेली.

12मग शमुवेलाने एक दगड घेतला आणि मिस्पा व शेन याच्यामध्ये तो उभा केला आणि त्याला एबन -एजर असे नाव देऊन म्हटले येथपर्यत परमेश्र्वराने आमचे साहाय्य केले आहे.

13असे पलिष्टी पराभूत झाले आणि ते इस्त्राएलाच्या सीमेत आणखी आले नाहीत. आणि शमुवेलाच्या सर्व दिवसात परमेश्र्वराचा हात पलिष्ट्यांच्या विरूध्द होता.

14आणि एक्रोनापासून गथापर्यत जी नगरे पलिष्ट्यांनी इस्त्राएलापासून घेतली होती ती इस्त्राएलास परत मिळाली; आणि त्यांचा प्रदेश इस्त्राएलाने पलिष्ट्यांच्या हातातून घेतला; आणि इस्त्राएल व अमोरी यांच्यामध्ये शांतता होती.

15आणि शमुवेलाने आपल्या आयुष्याच्या सर्व दिवसातंत इस्त्राएलाचा न्याय केला.

16तो प्रत्येक वर्षी बेथलास व गिलगालास व मिस्पात अनुक्रमाने जाई आणि त्या सर्व ठिकाणी इस्त्राएलाचा न्याय करी.

17आणि रामा येथे तो परत माघारी येत असे कारण तेथे त्याचे घर होते आणि तेथे सुध्दा त्याने इस्त्राएलाचे वादविवाद मिटवण्याचे ठरवले आणि तेथे त्याने परमेश्र्वराला अर्पणे अर्पायला वेदी बांधली.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Samuel 7 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran