Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Samuel 6 >> 

1आता देवाचा कोश पलिष्ट्यांच्या देशात सात महिने राहिला.

2आण पलिष्ट्यांनी याजकांना व दैवी प्रश्न पाहणाऱ्यांना बोलावून त्याने म्हटले यहोवाच्या कोशाचे आम्ही काय करावे? तो त्याच्या ठिकाणी कसा पाठवावा हे आम्हास सांगा.

3ते बोलले तुम्ही इस्त्राएलाच्या देवाचा कोश माघारी पाठवाल तर तो दानाशिवाय पाठवू नका तर त्याबरोबर दोषार्पण अवश्य पाठवावे म्हणजे तुम्ही निरोगी व्हाल; आणि त्याचा हात तुम्हावरून का दूर होत नाही हे तुम्हास समजेल.

4तेव्हां ते म्हणाले जे दोषार्पण त्याबरोबर आम्ही पाठवावे ते काय असावे? आणि ते म्हणाले पलिष्ट्यांचा सरदारांच्या संख्येप्रमाणे पाच सोन्याच्या गाठी व पांच सोन्याचे उंदीर; कारण तुम्हा सर्वावर व तुमच्या अधिकाऱ्यांवर एकच पीडा आली होती.

5म्हणून तुम्ही तुमच्या गाठीच्या आकाराची व तुमचे जे उंदीर शेताचा नाश करतात त्याच्या प्रतिकृती तयार करा आणि तुम्ही इस्त्राएलाच्या देवाचा गौरव करा कदाचित तो आपला हात तुम्हावरून व तुमच्या देवावरून व तुमच्या शेतावरून काढेल.

6तर मिसरी व फारो यांनी जशी आपली ह्रदये कठीण केली तशी तुम्ही आपली ह्रदये कश्याला कठीण करता? जेव्हा तो त्यांच्याशी कठोरपणे वागल्यावर आणि त्याने त्यांना जाऊ देण्याची परवानगी दिली नाही परंतु नंतर ते निघून गेले नाहीत काय?

7तर ताे एक नवी गाडी घेऊन तयार करा आणि ज्यावर जू कधी ठेवले नाही अशा दोन दुभत्या गायी घेऊन गाडीला जुपा व त्यांची वासरे त्याच्यापासून वेगळी करून घरी आणा.

8मग देवाचा कोश घेऊन आणि गाडीवर ठेवा. आणि जे तुम्ही दोषार्पण म्हणून सोन्याच्या प्रतीकृती डब्यात घालून त्याच्या एकाबाजूला ठेवून परत पाठवून द्या आणि तिच्या मार्गाने तिला जाऊ द्या.

9आणि पाहा बेथ- शेमेशाकडे त्याच्या सीमेच्या मार्गाने तो गेला तर त्याने आम्हाला हे मोठे अरिष्ट लावले आहे जर गेला नाही तर त्याच्या हाताने आम्हाला मारले नाही जे आम्हाला घडले ते देवाने घडले असे आम्ही समजू

10मग त्या माणसांनी तसे केले म्हणजे त्यांनी दोन दुभत्या गायी घेऊन गाडीला जुंपल्या आणि त्यांची वासरे घरी बांधून ठेवली.

11मग त्यांनी परमेश्वराचा कोश आणि त्याच्याबरोबर तो डब्बा सोन्याचे उंदीर व त्यांच्या गाठीच्या प्रतिकृती गाडीत ठेवले.

12मग गायी नीट वाट धरून बेथ-शेमेशाच्या रस्त्याने गेल्या; त्या मोठ्या मार्गाने जाताना हंबरत चाल ल्या उजवीकडे किंवा डावीकडे फिरल्या नाहीत; आणि पलिष्ट्यांचे अधिकारी बेथ-शेमेशाच्या सीमेपर्यत त्यांच्यामागे गेले.

13तेव्हां बेथ-शेमेशाचे शेतकरी खोऱ्यात आपल्या गव्हाची कापणी करीत होते; आणि त्यांनी आपली दृष्टी वर करून कोश पाहिला तेव्हां तो पाहून ते आनंद पावले.

14मग गाडी यहोशवा बेथ-शेमेशाकर याच्या शेतात येऊन जेथे एक मोठा दगड होता तेथे उभी राहिली; आणि त्यांनी गाडीची लाकडे तोडून गायी परमेश्वराला होमार्पण अशा अर्पण केल्या.

15आणि लेव्यांनी देवाचा कोश व त्याबरोबर ज्यात सोन्याचे दागिने होते तो डबा हे उतरून त्या मोठ्या दगडावर ठेवले आणि बेथ-शेमेशाच्या माणसांनी त्या दिवशी परमेश्वराला होमार्पणे व यज्ञ अर्पण केले.

16आणि हे पाहिल्यानंतर पलिष्ट्यांचे पांच सरदार त्याच दिवशी एक्रोनास परत गेले.

17आणि जे सोन्याच्या गाठीची पलिष्ट्यांनी परमेश्र्वराला दोषार्पण म्हणून पाठवले ते हे:अश्दोदकरिता एक गज्जकरिता एक अश्कलोनाकरिता एक गथाकरिता एक एक्रोनाकरिता एक

18आणि आबेलाचा मोठा दगड ज्यावर त्यांनी परमेश्र्वराचा कोश ठेवला तेथपर्यत पलिष्ट्यांची जी नगरे म्हणजे तटबंदीची नगरे व खेडीपाडीहि त्या पांच सरदांराची होती त्यांच्या संख्येच्याप्रमाणाने ते सोन्याचे उंदीर होते; तो दगड आजपर्यत यहोशवा बेथ-शएमेशकर यांच्या शेतात आहे.

19मग त्याने बेथ-शेमेशाच्या मनुष्यांना मारले कारण त्यांनी परमेश्र्वाराच्या कोशाच्या आंत पाहिले होते; त्याने लोकांतील पन्नास हजार आणि सत्तर जण मारले आणि परमेश्र्वाराने लोकांना फार मोठा तडाखा दिला यामुळे लोकांनी शोक केला.

20तेव्हा बेथ-शेमेशाची माणसे बोलली हा पवित्र देव परमेश्र्वर याच्यासमोर कोणाच्याने उभे राहवेल? त्याने आम्हांपासून वरती कोणाकडे जावे?

21मग त्यांनी किर्याथ-यारीमाच्या रहिवाशांकडे दूत पाठवून म्हटले की पलिष्यांनी यहोवाचा कोश माघारा आणला आहे तुम्ही खाली येऊन तो आपणांकडे वरती न्या.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Samuel 6 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran