Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Samuel 27 >> 

1आणि दावीद आपल्या मनात म्हणाला कधीतरी मी शौलाच्या हातून नाश पावेन; तर पलिष्ट्यांच्या मुलखात मी पळून जावे यापेक्षा मला दुसरे काही बरे दिसत नाही; मग शौल इस्त्राएलाच्या अवघ्या प्रांतात आणखी माझा शोध करण्याविषयी निराश होईल आणि मी त्याच्या हातातून सुटेन.

2मग दावीद उठला आणि तो व त्याच्याबरोबर असलेली सहाशे माणसे अशी ती माआेखाचा मुलगा अखीश गथाचा राजा याच्याकडे गेली

3तेव्हा दावीद व त्याची सर्व माणसे एकेक आपल्या कूटूंबासहीत गथात आखीशाजवळ राहिली; दावीदाबरोबर त्याच्या दोघी बायका ईज्रलीण अहीनवाम व पूर्वी नाबालाची बायको होती ती कर्मेलीण अबीगईल ह्या होत्या.

4आणि दावीद गथास पळून गेला असे कोणी शौलाला सांगितले मग त्याने त्याचा शोध आणखी केला नाही.

5आणि दावीद आखीशाला म्हणाला तुझी कृपादृष्टी माझ्यावर झाली तर या मुलखातील कोणाएका नगरात मी तेथे राहावे म्हणून मला जागा दे; तुझ्या दासाने राजधानीत तुझ्याजवळ का राहावे?

6तेव्हा आखीशाने त्याला सिकलाग दिले. यामुळे सिकलाग आजपर्यत यहूदाच्या राजांकडे आहे.

7आणि दावीद पलिष्ट्ंयाच्या मुलखात राहीला ते दिवस एक पूर्ण वर्ष व चार महिने इतके होते.

8आणि दावीद व त्याची माणसे यांनी वर जाऊन गशूरी व गिजरी व अमालेकी यांच्यांवर घाला घातला कारण ते लोक पूर्वीपासून तू शूरास व मिसर देशास जात असतोस त्या वाटेवरल्या प्रांतात राहणारे होते.

9आणि दावीदाने त्या प्रांताला मारले आणि पुरुष किंवा स्त्री जिवंत ठेवले नाही; मग मेंढरे गुरे व गाढवे उंट व वस्त्रे ही घेऊन तो आखीशाकडे परत आला.

10तेव्हा आखीश म्हणाला आज तू कोणावर घाला घातलास? दावीद म्हणाला यहूदाच्या दक्षिण प्रदेशावर व यरहमेली यांच्या दक्षिण प्रदेशावर व केनी यांच्या दक्षिण प्रदेशावर.

11आणि दावीदाने गथाकडे वर्तमान आणायला पुरुष किंवा स्त्री जीवंत ठेवली नाही. त्याने म्हटले त्यांना जिंवत ठेवले तर ते आम्हाविषयी सांगतील व म्हणतील की दाविदाने असे असे केले आहे आणि तो पलिष्ट्यांच्या मुलखांत राहिला तेव्हापासून त्याची चाल अशीच होती.

12आणि आखीशाने दावीदावर भरवसा ठेवून म्हटंले त्याने आपल्या इस्त्राएली लोकांकडून आपणाला अगदी तुच्छ मानवून घेतले आहे म्हणून तो सर्वकाळ माझा दास होईल.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Samuel 27 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran