Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Samuel 26 >> 

1आणि जीफी लोक शौलाकडे गिबा येथे येऊन म्हणाले यशीमोनासमोर हकीला डोंगरात दावीद लपला आहे की नाही?

2तेव्हा शौल उठला व आपल्याबरोबर इस्त्राएलाच्या तीन हजार निवडलेल्या माणसांना घेऊन दावीदाचा शोध करायला जीफ रानात गेला.

3आणि शौलाने यशीमोनासमोरील मार्गाजवळ हकीला डोंगरावर तळ दिला; तेव्हा दावीद रानात राहत होता आणि त्याने पाहिले की आपला पाठलाग करायला शौल रानात आला आहे.

4म्हणून दावीदाने हेर पाठवले आणि शौल खचित आला आहे असे त्याला समजले.

5मग दावीद उठून शौलाने तळ दिला होता त्या ठिकाणावर आला आणि जेथे शौल व त्याचा सेनापती नेराचा मुलगा अबनेर हे निजले होते ते ठिकाण दावीदाने पाहिले; शौल तर छावणीत निजला होता व त्याच्यासभोवती लोकांनी तळ दिला होता.

6तेव्हा अहीमलेख हित्ती व सरूवेचा मुलगा अबीशय यवाबाचा भाऊ यांना दावीदाने उत्तर देऊन म्हटले छावणीत शौलाकडे खाली माझ्याबरोबर कोण येईल? तेव्हा अबीशय म्हणाला मी तुझ्याबरोबर खाली येईन.

7मग दावीद व अबीशय रात्री लोकांजवळ गेले आणि पाहा शौल छावणीत निजला आहे व त्याचा भाला त्याच्या उशाजवळ भूमीत रोवलेला व त्याच्यासभोवती अबनेर व लोक निजलेले आहेत.

8तेव्हा अबीशय दावीदाला म्हणाला आज देवाने तुझा शत्रु तुझ्या हाती दिला आहे तर आता मी तुला विनंती करतो मला भाल्याने एकदाच घाव मारून त्याला भूमीवर ठार करून दे मी त्याला दुसऱ्याने मारणार नाही.

9पण दावीद अबीशयाला म्हणाला त्यांचा वध करू नकोस कारण कोण आपला हात यहोवाच्या अभिषिक्तावर टाकिल आणि निर्दोष राहील?

10आणि दावीद म्हणाला देव जिवंत आहे; देव त्याला मारील किंवा त्याचा मरण्याचा दिवस येईल किंवा तो खाली लढाईत जाऊन नष्ट होईल.

11मी आपला हात यहोवाच्या अभिषिक्तावर टाकावा असे देवाने माझ्याकडून घडू देऊ नये; परंतु आता मी तुला विनंती करतो की तू त्याच्या उशाजवळ भाला व पाण्याचा चंबू घे; मग आपण जाऊ.

12तेव्हा शौलाच्या उशाजवळून भाला व पाण्याचा लोटा हे दावीदाने घेतले मग कोणाला न दिसता कोणाला न कळता कोणी जागा न होता हे निघून गेले कारण ते सर्व झोपेत होते; कारण देवाकडून त्याच्यांवर गाढ झोप पडली होती.

13नंतर दावीद पलीकडे डोंगराच्या शिखरावर जाऊन दूर ऊभा राहिला आणि त्याच्यांमध्ये मोठे अंतर होते;

14तेव्हा दावीदाने लोकांना व नेराचा मुलगा अबनेर याला हाक मारली तो म्हणाला अबनेरा तू उत्तर करीत नाहीस काय? तेव्हा अबनेराने उत्तर देऊन म्हटले राजाला हाक मारणारा असा तू कोण आहेस?

15मग दावीद अबनेराला म्हणाला तू वीर पुरुष नाहीस काय आणि इस्त्राएलात तुझ्यासारखा कोण आहे? तर तू आपला प्रभु राजा याच्यावर पहारा का केला नाही? कारण लोकातला कोणीएक तुझा प्रभु राजा याचा घात करायला आला होता.

16ही जी गोष्ट तू केली ती बरी नाही; यहोवा देव जिवंत आहे तुम्ही आपला प्रभु यहोवाचा अभिषिक्त याला राखले नाही म्हणून तुम्ही मरायला योग्य आहा. तर आता पाहा राजाचा भाला व पाण्याचा चंबू त्याच्या उशापाशी होता तो कोठे आहे?

17तेव्हा शौल दावीदाची वाणी ओळखून म्हणाला माझ्या मुला दावीदा ही तुझी वाणी आहे काय? दावीद म्हणाला माझ्या प्रभू राजा ही माझी वाणी आहे.

18आणि तो म्हणाला माझा प्रभु आपल्या दासाच्या पाठीस का लागला आहे? मी तर काय केले आहे? माझ्या हाती काय वाईट आहे?

19तर आता मी तुला विनंती करतों माझ्या प्रभु राजाने आपल्या दासाचे बोलणे ऐकावे: देवाने तुला माझ्यावर चेतवले असले तर त्याने अर्पण मान्य करावे परंतु मनुष्याच्या संतानांनी चेतवले असले तर ती देवाच्यासमोर शापित होवोत; कारण आज मला देवाच्या वतनात वाटा मिळू नये म्हणून त्यांनी मला बाहेर लावून म्हटले की जा अन्य देवांची सेवा कर.

20तर आता माझे रक्त देवाच्या समक्षतेपासून दूर भूमीवर पडू नये; कारण जसा कोणी डोंगरावर तितराची शिकार करतो तसा एक पिसवेचा शोध करण्यास इस्त्राएलाचा राजा निघून आला आहे.

21तेव्हा शौल म्हणाला मी पाप केले आहे; माझ्या मुला दावीदा माघारा ये; माझा जीव आज तुझ्या दृष्टीने मोलवान होता म्हणून मी यापुढे तुझे वाईट करणार नाही; पाहा मी मूर्खपणाने वागून फार अपराध केला आहे.

22मग दावीदाने असे उत्तर केले की हे राजा पाहा हा भाला तरुणातील एकाने इकडे येऊन तो घ्यावा.

23आणि देव प्रत्येक माणसाला त्याचा न्याय व त्याचे विश्वासूपण याप्रमाणे परत करो. कारण आज देवाने तुला माझ्या हाती दिले असता मी आपला हात देवाच्या अभिषिक्तावर टाकला नाही.

24आणि पाहा जसा तुझा जीव माझ्या दृष्टीने मोलवान होता तसा माझा जीव यहोवाच्या दृष्टीने मोलवान होवो; आणि तो सर्व संकटातून सोडवो.

25तेव्हा शौल दावीदाला म्हणाला माझ्या मुला दावीदा तू आशीर्वादित हो; तू मोठी कार्ये करशील व प्रबल होशील. मग दावीद आपल्या वाटेने गेला शौलही आपल्या ठिकाणी परत गेला.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Samuel 26 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran