Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Samuel 25 >> 

1आणि शमुवेल मरण पावला तेव्हा सर्व इस्त्राएल लोकांनी एकत्र जमून त्याच्यासाठी शोक केला आणि त्यांनी त्याला रामा येथे त्याच्या घरात पुरले. आणि दावीद उठून खाली पारान नावाच्या रानात गेला.

2आणि मावोनात एक माणूस होता त्याची मालमत्ता पर्मेल येथे होती; तो माणूस फार मोठा होता; त्याची तीन हजार मेंढरे व एक हजार बकरी होती; आणि तो आपली मेंढरे कर्मेलांत कातरीत होता.

3त्या पुरुषाचे नाव नाबाल व त्याच्या बायकोचे नाव अबीगईल होते; बायको तर बुध्दीने चांगली व सुंदर रूपवती होती परंतु पुरूष कठोर व वाईट चालीचा होता; तो कालेबाच्या कुळातला होता.

4आणि नाबाल आपली मेंढरे कातरीत आहे असे दावीदाने रानात ऐकले.

5मग दावीदाने दहा तरुणास पाठवले आणि दावीद त्या तरुणास म्हणाला कर्मेल येथे जा व नाबालाकडे जाऊन माझ्या नावाने त्याला सलाम करा.

6आणि त्या सुखी जिवाला असे म्हणा तुला शांती असो. व तुझ्या घराला शांति असो आणि जे काही तुझे आहे त्या अवघ्याला शांति असो.

7तुझ्याकडे कातरणारे आहेत असे मी आता ऐकले. आताच तुझे मेंढपाळ आम्हाजवळ होते त्यांना आम्ही उपद्रव केला नाही आणि जितके दिवस ते कर्मेलात होते तितके दिवस त्यांचे काही हरवले नाही.

8तू आपल्या तरुणास विचार म्हणजे ते तुला सांगतिल; तर या तरुणावर तुझी कृपादृष्टी व्हावी कारण आम्ही चांगल्या दिवशी आलो;

9मी तुला विनंती करतो जे काही तुझ्या हाताशी येईल ते तू तुझ्या दासांना व तुझा मुलगा दावीद याला दे. मग दावीदाचे तरुण येऊन या सर्व शब्दांप्रमाणे दावीदाच्या नावाने नाबालाशी बोलून शांत राहिले.

10तेव्हा नाबालाच्या चाकरांना उत्तर देऊन म्हटले दावीद कोण आहे? इशायाचा मुलगा कोण? जे एकेक आपआपल्या धन्याला सोडून पळतात असे पुष्कळ चाकर या दिवसात आहेत.

11माझी भाकर व माझे पाणी व माझ्या मारलेल्या पशूंचे मांस जे मी आपल्या मेंढरे कातरणाऱ्यासाठी तयार केले ते घेऊन जी माणसे कोठून आली आहेत हे माला माहित नाही अशांना मी द्यावे काय?

12मग दावीदाचे तरुण आपल्या वाटेने परत गेले आणि माघारे येऊन त्यांनी हे सर्व शब्द त्याला जसेच्या तसे त्याला सांगीतले.

13तेव्हा दावीद आपल्या माणसांना म्हणाला तुम्ही आपापली तरवार कंबरेस बांधा. मग प्रत्येकाने आप आपली तरवार कंबरेस बांधली दावीदानेही आपली तरवार कंबरेस बांधली आणि दावीदाच्यामागे सुमारे चारशे मनुष्ये वर गेली आणि दोनशे मनुष्ये सामानाजवळ राहिली.

14आणि नाबालाची बायको अबीगईल हिला चाकरातील एकाने सांगितले पाहा दावीदाने रानातून आमच्या धन्याला सलाम सांगायला दूत पाठवले परंतु तो त्यांच्या अंगावर गेला.

15पण ती मनुष्ये आम्हांशी फार चांगली वागली; त्यांनी आम्हाला काही उपद्रव केला नाही; जितके दिवस आम्ही रानात त्यांच्याबरोबर वागलो तितके दिवस आमची काही हानी झाली नाही.

16आम्ही त्याच्याजवळ मेंढरे राखीत होतो तितके दिवस ती आम्हांला रात्रदिवस तटबंदीसारखी होती.

17तर आता तू काय करणार हे समजून विचार कर कारण आमच्या धन्यावर व त्याच्या सर्व घरावर वाईट येण्याचे ठरले आहे; कारण त्याच्याशी कोणाच्याने बोलवत नाही एवढा तो वाईट आहे.

18आणि अबीगईलेने घाई करून दोनशे भाकरी व द्राक्षारसाचे दोन घड बुधले व पाच तयार केलेली मेंढरे व पाच मापे हुरडा व खिसमिसाचे शंभर घड व अंजिराच्या दोनशे ढेपा ही घेतली व गाढवावर घातली.

19आणि तिने आपल्या चाकरांना म्हटले माझ्यापुढे चला पाहा मी तुमच्यामागून येते परंतु तिने आपला नवरा नाबाल याला काही सांगितले नाही.

20आणि असे झाले की ती आपल्या गाढवावर बसून डोंगराच्या कडेने जात असता पाहा दावीद व त्याची माणसे तिच्याकडे येत होती आणि त्यांना ती भेटली.

21आणि दावीदाने म्हटले होते की रानात त्यांचे जे होते त्या सर्वातले हरवले नाही असे मी त्यांचे राखले ते व्यर्थ गेले; आणि माझ्याशी बऱ्याचे वाईट परत केले आहे.

22जे काही त्याचे आहे त्या सर्वातून एकहि मुलगा जर मी सकाळ उजाडेपर्यत राहू दिला तर तसे व त्यापेक्षा अधिक देव दावीदाला करो.

23आणि अबीगईलेने दावीदाला पाहिले तेव्हा ती लवकर गाढवा वरून उतरली आणि दावीदापुढे उपडे पडून तिने भूमीकडे नमन केले

24आणि तिने त्याच्या पाया पडून म्हटले माझ्या प्रभू अन्याय माझ्याकडे माझ्याकडेच असावा आणि मी तुला विनंती करते तुझ्या दासीला तुझ्या कानी बोलू दे आणि तू आपल्या दासीचे शब्द ऐक.

25मी तुला विनंती करते माझ्या प्रभूने या वाईट माणसाला नाबालाला मारू नये कारण जसे त्याचे नाव तसाच आहे त्याचे नाव नाबाल (म्हणजे मूर्ख) असे आहे आणि त्याच्याठायी मूर्खपण आहे; परंतु माझ्या प्रभूचे तरुण मनुष्य जे तू पाठवले त्यांना मी तुझ्या दासीने पाहिले नाही.

26तर आता माझ्या प्रभू देव जिवंत आहे आणि तुझा जीव जिवंत आहे आणि रक्त पाडण्याच्या दोषापासून व आपल्या हाताने सूड घेण्यापासून देवाने तुला आवरले आहे. तर आता जे तुझे शत्रू व जे माझ्या प्रभूचे वाईट करायला पाहतात ते नाबालासारखे होवोत.

27आणि आता ही जी भेट तुझ्या दासीने माझ्या प्रभूकडे आणली आहे ती माझ्या प्रभूच्यामागून चालणाऱ्या तरुण मनुष्यांना द्यावी.

28मी तुला विनंती करते तू आपल्या दासीच्या अपराधाची क्षमा कर; कारण माझा प्रभु देवाच्या लढाया लढतो आणि तुझ्याठाई तुझ्या सर्व दिवसात वाईट सापडणार नाही; म्हणून यहोवा देव माझ्या प्रभूचे घर खरोखर स्थिर करील.

29आणि जरी मनुष्य उठून तुझ्या पाठीस लागला व तुझा जीव घ्यायला पाहत असला तरी माझ्या प्रभूचा जीव परमेश्वर तुझा देव याच्याजवळ जिवाच्या गाठोड्यात बांधलेला राहील आणि जसे गोफणीच्या खोलग्यातून फेकतात तसे तुझ्या शत्रूंचे जीव तो गोफणीतून फेकून देईल.

30आणि असे होईल की यहोवाने तुझ्याविषयी जे चांगले सांगितले आहे ते सर्व तो माझ्या प्रभूचे करून तुला इस्त्राएलाचा अधिकारी नेमील

31तेव्हा माझ्या प्रभूने विनाकारण रक्त पाडले व सूड घेतला ह्याबद्दल खेद तुला होणार नाही किंवा मनाचा संताप माझ्या प्रभूला होणार नाही. आणि यहोवा माझ्या प्रभूचे बरे करील तेव्हा तू आपल्या दासीचे स्मरण कर.

32तेव्हा दावीद अबीगईलेला म्हणाला यहोवा इस्त्राएलाचा देव ज्याने तुला आज मला भेटायला पाठवले तो धन्यवादित असो.

33आणि तुझा बोध आशीर्वादित होवो; आणि आज रक्त पाडण्याच्या दोषापासून व आपल्या हाताने सूड घेण्यापासून मला जिने अडवले ती तू आशीर्वादित हो.

34कारण तुझे वाईट मी करणार होतो ते ज्याने मला करू दिले नाही तो यहोवा इस्त्राएलाचा देव जिवंत आहे; जर तू मला भेटायला लवकर आली नसतीस तर खचित नाबालाचा एक मुलगा देखील सकाळ उजाडेपर्यत राहिला नसता.

35मग जे तिने दावीदासाठी आणले होते ते त्याने तिच्या हातातून घेतले व तिला म्हटले तू आपल्या घरी शांतीने जा पाहा मी तुझी वाणी ऐकली आहे आणि तुला मान्य केले आहे.

36मग अबगईल नाबालाकडे आली आणि पाहा त्यानें आपल्या घरी राजाच्या मेजवाणीसारखी मेजवाणी केली आहे. तेव्हा नाबालाचे ह्रदय त्याच्या आत संतुष्ट होते कारण तो मद्य पिऊन फार मस्त झाला होता म्हणून तिने पहाट उजाडेपर्यत त्याला अधिक उणे काहीच सांगितले नाही.

37आणि असे झाले की सकाळी नाबालाचा कैफ उतरल्यावर त्याच्या बायकोने या गोष्टी त्याला सांगितल्या तेव्हा त्याचे ह्रदय त्याच्या आत मेले व तो दगडासारखा झाला.

38आणि असे झाले की सुमारे दहा दिवसानंतर देवाने नाबालाला मारले व तो मेला.

39आणि नाबाल मेला असे दावीदाने ऐकले तेव्हा तो म्हणाला ज्याने माझ्या अपमानाचा सूड नाबालावर उगवला आहे आणि ज्याने आपल्या सेवकाला वाईट करण्यापासून आवरून धरले तो देव धन्यवादीत असो. देवाने नाबालाची दुष्टाई त्याच्याच मस्तकावर परत घातली आहे. मग दावीदानेअबीगईलेकडे सेवकाला पाठवून तिला आपली बायको करण्याविषयीची गोष्ट काढली.

40आणि दावीदाने चाकर कर्मेलास अबीगईलेकडे येऊन तिला म्हणाले दावीदाने तू त्याची बायको व्हावे म्हणून आम्हांला तूझ्याकडे पाठवले आहे.

41तेव्हा ती उठून भूमीकडे लवून नमली व म्हणाली पाहा तुझी दासी माझ्या प्रभूच्या चाकरांचे पाय धुवायला चाकरीण असावी.

42मग अबीगईल घाई करून उठली व गाढवावर बसून निघाली आणि तिच्या पाच सख्या तिच्या मागे गेल्या; आणि ती दावीदाच्या सेवकाच्या मागून गेली आणि त्याची बायको झाली.

43आणि दावीदाने इज्रेलकरीण अहीनवामलाही बायको करून घेतले; त्या दोघीही त्याच्या बायका झाल्या.

44शौलाने तर आपली मुलगी मीखल दावीदाची बायको गल्लीमातील लइशाचा मुलगा पालती याला दिली होती.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Samuel 25 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran