Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Samuel 24 >> 

1आणि असे झाले शौल पलिष्ट्यांचा पाठलाग सोडून माघारी आल्यावर त्याला कोणी सांगितले की दावीद एन गेदीच्या रानात आहे.

2तेव्हा शौल सर्व इस्त्राएलांतून निवडलेल्या तीन हजार मनुष्यांस घेऊन रानबकऱ्याच्या खडकावर दावीदाचा व त्याच्या मनुष्यांचा शोध करायला गेला.

3आणि तो मेंढवाड्याजवळ रस्त्यावर आला तेथे एक गुहा होती तिच्यात शौल शौचास गेला आणि दावीद व त्याची माणसे त्या गुहेच्या अगदी आतल्या भागात बसली होती.

4तेव्हा दावीदाच्या माणसांनी त्याला म्हंटले देवाने तुला सांगितले की पाहा मी तुजा शत्रू तुझ्या हाती देईन आणि तुला जसे बरे दिसेल तसे तू त्याचे करशील; तो हा दिवस पाहा. मग दावीदाने उठून शौलाच्या वस्त्राचा काठ हळूच कापून घेतला.

5त्यानंतर असे झाले की दावीदाचे मन त्याला टोचू लागले कारण त्याने शौलाचे वस्त्र कापून घेतले होते.

6आणि त्याने आपल्या माणसांस म्हटले मी आपल्या धन्यावर देवाच्या अभिषिक्तावर आपला हात टाकावा अशी गोष्ट देवाने माझ्याकडून घडू देऊ नये कारण तो देवाचा अभिषिक्त आहे.

7असे बोलून दावीदाने आपल्या माणसांना धमकावले आणि त्यांना शौलावर हल्ला करण्याची परवानगी दिली नाही मग शौल उठून गुहेतून निघून वाटेने चालला.

8नतर दावीदही उठून गुहेतून निघाला आणि शौलाच्या पाठीमागून हाक मारून बोलला हे माझ्या प्रभू राजा. तेव्हा शौलाने आपल्यामागे वळून पाहिले आणि दावीद आपले तोंड भूमीस लावून नमला

9मग दावीदाने शौलाला म्हटले पाहा; दावीद तुझे वाईट करायला पाहतो असे जे लोकांचे बोलणे ते तू कशाला ऐकतोस?

10पाहा आज तू आपल्या डोळ्यांनी पाहिले की देवाने गुहेत आज तुला माझ्याहाती दिले होते आणि तुला जिवे मारावे असे कोणी मला सांगितले पण मी तुला सोडून दिले आणि मी बोललो मी आपला हात माझ्या प्रभूवर टाकणार नाही कारण तो देवाचा अभिषिक्त आहे.

11आणखी माझ्या बापा पाहा माझ्या हातात तुझ्या वस्त्राचा काठ पाहा कारण मी तुझ्या वस्त्राचा काठ कापला आणि तुला जिवे मारले नाही यावरून माझ्याठायी दुष्टाई किंवा फितूरी नाही आणि जरी तू माझा जीव घ्यायला टपून बसतोस तरी मी तुझ्याविरूध्द पाप केले नाही याची खात्री करून पाहा.

12माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये देव न्याय करो; माझा सूड देव तुझ्यावर उगवो परंतु माझा हात तुझ्यावर पडणार नाही

13दुष्टापासून दुष्टाई निघते अशी पुरातन लोकांची म्हण आहे परंतु माझा हात तुझ्यावर पडणार नाही.

14कोणाच्यामागे इस्त्राएलाचा राजा निघून आला? तू कोणाच्या पाठीस लागतोस? मेलेल्या कुत्र्याच्यामागे काय?

15यास्तव देव न्यायाधीश होऊन माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये न्याय करो हे पाहून तो माझा वाद करो आणि तुझ्या हातून मला सोडवो.

16आणि असे झाले की दावीदाने शौलाशी हे शब्द बोलणे सपवल्यावर शौल म्हणाला माझ्या मुला दावीदा ही तुझी वाणी आहे काय? मग शौल गळा काढून रडला

17आणि तो दावीदाला म्हणाला माझ्यापेक्षा तू अधिक न्यायी आहेस कारण तू माझे बरे केले आहेस परंतु मी तुझे वाईट केले आहे.

18आणि तू माझ्याशी चांगले वर्तन करतोस हे तू आज उघड केले आहे. कारण यहोवाने मला तुझ्या हाती दिले होते तेव्हा तू मला जिवे मारले नाही.

19कोणा माणसाला त्याचा वैरी सापडला तर तो त्याला चांगल्या रीतीने वाटेस लावील काय? तर तू आज जे माझे बरे केले त्याबद्दल देव तुला उत्तम प्रतिफळ देवो.

20आणि आता पाहा मी जाणतो की तू खचित राजा होशील आणि इस्त्राएलांचे राज्य तुझ्या हाती स्थापित होईल.

21म्हणून आता तू माझ्याशी देवाची शपथ वाहा की तू माझ्यामागे माझे संतान नाहीसे करणार नाहीस आणि माझ्या बापाच्या कुळातून माझे नाव नष्ट करून टाकणार नाहीस.

22तेव्हा दावीदाने शौलाशी शपथ वाहिली. मग शौल घरी गेला आणि दावीद व त्याची माणसे गडात चढून गेली.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Samuel 24 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran