Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Samuel 21 >> 

1आणि दावीद नोब यैथे अहीमलेख याजकाजवळ आला आणि अहीमलेख कापत कापत दावीदाला भेटायला आला व त्याला म्हणाला तू एकटा का आलास आणि तुझ्याबरोबर कोणी का नाही?

2तेव्हा दावीद अहीमलेख याजकाला म्हणाला राजाने मला काही काम करायला आज्ञापिले आहे आणि त्याने असे म्हंटले की ज्या कामाविषयी मी तुला पाठवतो व जे मी तुला आज्ञापिले आहे ते कोणाला समजू देउ नको; आणि तरुणांनी अमक्या अमक्या ठिकाणी असावे म्हणून मी त्यांना नेमले आहे.

3नतंर आता तुझ्या हातात काय़ आहे? पाच भाकरी किंवा जे काही असेल ते मला माझ्या हाती दे.

4तेव्हा याजकाने दावीदाला उत्तर देऊन म्हटले माझ्याजवळ काही सामान्य भाकर नाही तर पवित्र भाकर आहे; जर तरुणांनी आपणांस बायकांपासून दूर राखले असेल तर ती घ्यावी.

5दावीदाने याजकाला उत्तर देऊन म्हटले खचित हे तीन दिवस झाले मी निघालो तेव्हापासून बायका आम्हापासून दूर आहेत आणि तरुणांची पात्रे पवित्र आहेत; आणि ती भाकर जरी पात्रात आज पवित्र केली होती तरी कांही प्रकारे सामान्य आहे.

6मग याजकाने त्याला पवित्र भाकर दिली कारण ऊन भाकर ठेवावी म्हणून जी समक्षतेची भाकर देवाच्या समोरून त्या दिवशी काढलेली होती तिच्यावाचून दुसरी भाकर तेथे नव्हती.

7आणि त्या दिवशी शौलाच्या चाकरातील एक माणूस तेथे देवाच्या पुढे थांबवलेला असा होता; त्याचे नाव दवेग; तो अदोमी होता; तो शौलाच्या गुराख्यांमध्ये मुख्य होता.

8आणि दावीद अहीमलेखाला म्हणाला येथे तुझ्याजवळ भाला किंवा तरवार नाही काय? राजाचे काम निकडीचे आहे म्हणून मी आपल्या हाती आपली तरवार किंवा आपली शस्त्रे घेतली नाहीत.

9तेव्हा याजक म्हणाला गल्याथ पलिष्टी ज्याला तू एलाच्या खोऱ्यात जिवे मारले त्याची तरवार पाहा ती एफोदाच्या मागे वस्त्रात गुंडाळलेली आहे ती तू घेणार तर घे कारण तिच्यावाचून दुसरी येथे नाही दावीद म्हणाला तिच्यासारखी दुसरी नाही ती मला दे.

10आणि त्या दिवशी दावीद उठला व शौलाच्या भीतीमुळे पळून गथाचा राजा अखीश याच्याकडे गेला.

11तेव्हा अखीशाचे दास त्याला म्हणाले हा दावीद देशाचा राजा आहे की नाही: शौलाने हजार व दावीदाने दहा हजार मारले आहेत असे ते त्याच्याविषयी गाउन एकमेकांना म्हणत नाचत होते की नाही?

12आणि दावीद हे शब्द आपल्या मनात ठेवून गथाचा राजा आखीश याच्यापुढे पार भ्याला.

13मग त्याच्यापुढे त्याने आपली वर्तणूक पालटून त्यांच्यासमोर वेड घेतले आणि त्याने कवाडाच्या फळ्यांवर रेघा मारल्या व आपली लाळ आपल्या दाढीवर गाळू लागला.

14तेव्हा आखीश आपल्या दासांना म्हणाला पाहा हा वेडा आहे असे तुम्हाला दिसते तर कशासाठी तूम्ही त्याला माझ्याकडे आणले?

15वेडीमाणसे मला कमी आहेत म्हणून तुम्ही याला माझ्याकडे वेडेपण करायला आणले? याने माझ्या घरात यावे काय?


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Samuel 21 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran