Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Samuel 20 >> 

1आणि दावीद रामा येथल्या नायोथाहून पळून योनाथानाकडे येऊन म्हणाला मी काय केले आहे? माझा अपराध काय? आणि तुझ्या बापाच्यापुढे माझे काय पाप झाले आहे की तो माझा जीव घ्यायला पाहत आहे?

2तेव्हा त्याने त्याला म्हटले असे न होवो तू मरणार नाहीस; पाहा माझा बाप लहान मोठे काहीएक कार्य मला सांगितल्या वाचून करीत नाही तर ही गोष्ट माझा बाप माझ्यापासून कशाला गुप्त ठेवील? असे होणार नाही.

3मग दावीद शपथ वाहून म्हणाला तुझी कृपादृष्टी माझ्यावर आहे हे तुझा बाप खचित जाणतो म्हणून तो म्हणतो हे योनाथानाला कळू नये कळले तर त्याला दुख होईल; परंतु खरोखर यहोवा जिवंत आहे व तुझा जीव जिवंत आहे माझा जीव मरणापासून केवळ पावलांच्या अंतरावर आहे.

4तेव्हा योनाथान दावीदाला म्हणाला जे कांही तुझा जीव इच्छीतो ते मी तुझ्यासाठी करीन.

5आणि दावीद योनाथानाला म्हणाला पाहा उद्या अमावस्या आहे तेव्हा मी राजाबरोबर जेवण्यास बसायला चुकू नये; परंतु मला जाऊ दे परवा संध्याकाळपर्यत मी रानात लपून राहील.

6जर तुझ्या बापाने माझी आठवण काढलीच तर सांग की दावीदाने आपले गाव बेथलहेम येथे जायला माझ्यापाझी आग्रह करून रजा मागितली कारण तेथे त्याच्या सर्व कुटुंबाचा वार्षिक यज्ञ आहे.

7जर तो बरे म्हणेल तर तुझ्या दासाला शांति प्राप्त होईल परंतु जर त्याला राग आला तर त्याने माझे वाईट करण्याचा निश्चय केला आहे असे जाण.

8यास्तव तू आपल्या दासावर कृपा कर कारण तू आपल्या दासाला आपल्याबरोबर देवाच्या करारात आणले आहे; तथापि माझ्या ठायी अन्याय असला तर तूच मला जिवे मार; तू आपल्या बापाजवळ मला का आणावे?

9तेव्हा योनाथान म्हणाला तुला असे न होवो माझ्या बापाने तुझे वाईट करण्याचा निश्चय केला आहे असे मला खचित समजले तर मी ते तुला सांगू नये काय?

10तेव्हा दावीद योनाथानाला म्हणाला जर कदाचित तुझा बाप तुला कठोर उत्तर दिले तर ते मला कोण सांगेल?

11आणि योनाथान दावीदाला म्हणाला चल आपण रानात जाऊ मग ते दोघे बाहेर रानात गेले.

12आणि योनाथान दावीदाला म्हणाला यहोवा इस्त्राएलाता देव साक्षी असो उद्या किंवा परवा या वेळेस मी आपल्या बापाचे मन पाहीन तेव्हा पाहा जर दावीदाविषयी त्याचे मन चांगले असेल तर मी तुझ्याकडे निरोप पाठवून ते तुला कळवणार नाही काय़?

13जर तुझे वाईट करावे असे माझ्या बापाला वाटले आणि जर मी ते तुला कळवले नाही आणि तू शांतीने जावे म्हणून मी तुला रवाना केले नाही तर यहोवा परमेश्वर योनाथानाचे तसे व त्यापेक्षा अधिक करो आणि यहोवा परमेश्वर जसा माझ्या बापासंगती होता तसा तो तुझ्यासंगती असो.

14आणि मी जिवंत आहे तोपर्यत माझा घात होऊ नये म्हणून तू देवाची प्रेमदया माझ्यावर करावी असे केवळ नाही

15तर तू आपली कृपा माझ्या घराण्यावरून कधीही काढू नको; देव दावीदाचा प्रत्येक शत्रु भूमीच्या पाठीवरून छेदून टाकील तेव्हाही ती काढू नको;

16आम्ही योनाथानाने दावीदाच्या घराण्याशी करार करून म्हटले देव दावीदाच्या शत्रुंच्या हातून याची झडती घेवो.

17मग योनाथानाने दावीदाकडून त्याच्यावरच्या आपल्या प्रीती करिता आणखी शपथ वाहवली कारण जशी आपल्या स्वत:च्या जिवावर तशी त्याने त्याच्यावर प्रीति केली.

18आणि योनाथान त्याला म्हणाला उद्या अमावस्या आहे आणि तू नाहीस म्हणून कळेल कारण तुझे बसण्याचे ठिकाण रिकामे राहील.

19आणि तू तीन दिवस राहिल्यावर लवकर ऊतरून ते कार्य घडले त्या दिवशी ज्या ठिकाणी तू लपला होतास तेथे एजेल दगडाजवळ तू राहा.

20मग पाहा मी पोराला पाठवून म्हणेन जा बाणांचा शोध कर. जर मी पोराला म्हणेन पाहा बाण तुझ्या अलीकडे आहेत ते घेऊन ये तर तू ये;

21कारण तुझे कुशल आहे आणि तुझे वाईट होणार नाही; देव जिवंत आहे.

22परंतु जर मी पोराला म्हणेन पाहा बाण तुझ्या पलीकडे आहेत; तर तू निघून जा कारण देवाने तुला पाठवून दिले आहे.

23आणि जी गोष्ट तू व मी बोलतो आहे तिच्याविषयी तर पाहा यहोवा देव तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये निरंतर आहे.

24मग दावीद रानात लपून राहिला आणि अमावस्या आली तेव्हा राजा जेवायला बसला.

25आणि राजा आपल्या आसनावर जसा इतरवेळी तसा भिंतीजवळ आसनावर बसला व योनाथान उठून उभा राहिला व अबनेर शौलाच्या बाजूला बसला परंतु दावीदाची जागा रिकामी होती.

26तरी शौल त्या दिवशी काही बोलला नाही. कारण त्याला काही झाले असेल खचित तो शुध्द नसेल असे त्याला वाटले.

27मग अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी असे झाले की दावीदाची जागा रिकामी होती आणि शौलाने आपला मुलगा योनाथानाला म्हटले इशायाचा मुलगा काल व आजही जेवायला का आला नाही.

28तेव्हा योनाथानाने शौलाला उत्तर दिले की दावीदाने बेथलहेमास जायला आग्रहाने माझ्यापाशी रजा मागितली.

29तो म्हणाला मी तुला विनंती करतो मला जाऊ दे कारण आमचे घराणे नगरात यज्ञ करणार आहे आणि मला माझ्या भावाने आज्ञा केली आहे म्हणून आता तुझी कृपादृष्टी माझ्यावर झाली तर मला माझ्या भावांना भेटायला जाऊ दे. यामुळे तो राजाच्या पंक्तीस आला नाही.

30तेव्हा योनाथानावर शौलाचा राग पेटला तो त्याला म्हणाला अरे विपरीत फितूर खोर बायकोच्या मुला तुझी फजिती व तुझ्या आईच्या नागवेपणाची फजिती होण्यास तू इशायाच्या मुलाशी जडलास हे मला ठाऊक नाही काय?

31कारण जोपर्यत इशायाचा मुलगा पृथ्वीवर आहे तोपर्यत तू आणि तुझे राज्यही स्थापित होणार नाही म्हणून आता माणसे पाठवून त्याला माझ्याकडे आन कारण त्याला खचित मेले पाहिजे.

32मग योनाथानाने आपला बाप शौल याला ऊत्तर देऊन म्हटले त्याला कशासाठी मारावे? त्याने काय केले आहे?

33तेव्हा शौलाने त्याला मारायला भाला फेकला यावरून योनाथानाला कळले की आपल्या बापाने दावीदाला जिवे मारण्याचा निश्चय केला आहे.

34मग योनाथान फार रागे भरून पक्तींतून उठला आणि महिन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने काही अन्न खाल्ले नाही कारण दावीदाविषयी त्याला वाईट वाटले कारण त्याच्या बापाने त्याचा अपमान केला.

35मग असे झाले की योनाथान सकाळी दावीदाशी नेमेलेल्या वेळेस आपल्याबरोबर एक लहान पोर घेऊन रानांत गेला.

36आणि तो आपल्या पोराला म्हणाला धाव आता मी बाण मारतो त्याचा शोध कर. आणि पोर धावत असता त्याने त्याच्या पलिकडे बाण मारला.

37आणि जो बाण योनाथानाने मारला होता त्याच्या ठिकाणावर पोर पोहचला तेव्हा योनाथान पोराच्या मागून हाक मारून बोलला बाण तुझ्या पलीकडे आहे की नाही?

38आणि योनाथानाने पोराच्या मागून हाक मारली की धाव लवकर पळ थांबू नको.

39मग पोराला काहीच ठाऊक नव्हते योनाथानाला व दावीदाला मात्र गोष्ट ठाऊक होती.

40आणि योनाथानाने आपली हत्यारे आपल्या पोराला दिली व त्याला म्हटले चल ही उचलून घेऊन नगरात जा.

41आणि पोर गेल्यावर दावीद दक्षिणेकडील एका ठिकाणातून उठून भूमीवर उपडा पडला व तीन वेळा नमला; तेव्हा ते एकमेकाचे चुंबन घेऊन एकमेकांसाठी रडले पण दावीद अधीक रडला.

42आणि योनाथान दावीदाला म्हणाला शांतीने जा कारण आपण दोघांनी देवाच्या नावाने शपथ वाहून म्हटले आहे की माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये आणि माझ्या संतानामध्ये व तुझ्या संतानामध्ये देव सर्वकाळ असो मग तो उठून निघून गेला व योनाथान नगरात गेला.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Samuel 20 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran