Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Samuel 19 >> 

1यानंतर शौलाने आपला पुत्र योनाथान याला व आपल्या सर्व चाकरांस असे सांगितले की दावीदाला जिवे मारावे.

2तथापि शौलाचा पुत्र योनाथान याची दावीदावर फार प्रीती होती; आणि योनाथानाने दावीदाला म्हंटले की माझा बाप शौल तुला जिवे मारायास पाहत आहे म्हणून आता सकाळपर्यंत सावध होऊन एकांती लपून राहा.

3आणि मी जाऊन ज्या शेतात तू आहेस तेथे आपल्या बापाजवळ उभा राहीन आणि तुझ्याविषयी मी आपल्या बापापाशी संभाषण करीन आणि जे पाहीन ते तुला कळवीन.

4तेव्हा योनाथानाने आपला बाप शौल याला दावादाविषयी बरे म्हटले आणि तो त्याला बोलला की राजाने आपला चाकर दावीद याचे वाईट करु नये कारण की त्याने तुझी फार चांगली कृत्ये केली आहेत.

5त्यानेही आपले शिर हाती घेवून पलिष्ट्याला जिवे मारिले आणि परमेश्वराने अवघ्या इस्त्राएलासाठी मोठे तारण केले ते तू पाहून हर्षित झालास; तर दावीदाला निष्कारण मारितांना निर्दोष रक्त तू का पाडावे?

6तेव्हा शौलाने योनाथानाची विनंती मानली आणि शौलाने अशी शपथ वाहीली देवाची शपथ मी त्याला मारणार नाही.

7मग योनाथानाने दावीदाला बोलावले आणि योनाथानाने त्याला ह्या सर्व गोष्टी सांगितल्या; आणि योनाथानाने दावीदाला शौलाजवळ आणिले आणि तो त्याच्याजवळ पूर्वीसारीखा राहू लागला.

8यानंतर आणखी लढाई झाली आणि दावीदाने जाऊन पलीष्ट्यांशी लढून त्यांचा फार मोड केला आणि ते त्याच्यापुढे पळाले.

9मग देवापासून दुष्ट आत्मा शौलालावर आणि तो आपला भाला हाती धरुन आपल्या घरी बसला असता दावीद हाताने सारंगी वाजवीत होता.

10तेव्हा शौल भाल्याने दावीदाला भिंतीशी लावायास झटला परंतु तो शौलासमोरून निसटला आणि भाला भिंतीस लागला आणि दावीदाने पळून आपला जीव त्या रात्री राखिला.

11मग दावीदावर टपून सकाळी त्याला जिवे मारावे म्हणून शौलाने त्याच्या घरास दूत पाठविले आणि दावीदाची बायको हें वर्तमान त्याला सांगून असे बोलली जर या रात्री आपल्या जिवाजे रक्षण तूम्ही करीत नाहीस तर सकाळी तूम्ही जिवे मारला जाल.

12तेव्हा मीखलने दावीदाला एका खिडकीतून उतरवले आणि त्याने पळून जावून आपल्या जिवांचे रक्षण केले.

13मग मिखलने एक मुर्ती घेऊन पलंगावर ठेवली आणि तिच्या डोकीखाली बकऱ्याच्या केसांची उशी ठेवून तीजवर पांघरूण घातले.

14आणि जेव्हा शौलाने दूत दावीदाला धरायास पाठविले तेव्हा तिने म्हटले की तो दु:खनाईत आहे.

15मग शौलाने दावीदाला पाहायास दूत पाठवून म्हटले की मी त्याला जीवे मारावे म्हणून त्याला पलंगावर असतानाच मजपाशी आणा.

16आणि ते दूत घरात आले असता पाहा पलंगावर मुर्ती व तिच्या डोकीखाली बकऱ्यांच्या केसांची उशी होती.

17तेव्हां शौलाने मीखलला म्हटले की तू मला का फसविले आणि माझ्या वैऱ्याने निभावून पळून जावे म्हणून त्याला लावून दिले? मग मीखल शौलाला म्हणाली त्याने मला म्हटले की मला जाऊ दे मी तूला का मारावे?

18याप्रमाणे दावीदाने पळून आपल्या जिवाचे रक्षण केले आणि शमुवेलाजवळ रामामध्ये येऊन त्याने आपणाला जे अवघे शौलाने केले होते ते सांगितले; तेव्हा तो व शमुवेल जाऊन नायोथात राहिले.

19मग शौलाला कोणी असे सागीतले की पाहा दावीद रामा येथे नायोथात आहे.

20तेव्हा शौलाने दावीदाला धरायास दूत पाठविले परंतु भविष्यवाद्याची मंडळी भविष्यवाद करित असता आणि शमुवेल त्यावर मुख्य नेमलेला उभा असता हे जेव्हा त्यांनी पाहीले तेव्हा देवाचा आत्मा शौलाच्या दूतांवर आला आणि तेही भविष्यवाद करु लागले.

21मग हे शौलाला सांगितले असता त्याने आणखी दूत पाठविले आणि तेही भविष्यवाद करू लागले; मग शौलाने तिसऱ्या वेळेस आणखी दूत पाठविले आणि तेही भविष्यवाद करू लागले.

22तेव्हा तोहि रामास जायास निघाला आणि सेखूमध्ये एका मोठ्या विहीरीजवळ येउन त्याने असे विचारिले की शमुवेल व दावीद कोठे आहेत? मग कोणीएकाने म्हटले पाहा तो रामातल्या नायोथात आहेत.

23तेव्हा तो रामातल्या नायोथात जाऊ लागला आणि देवाचा आत्मा त्याजवरही आला आणि तो जाताना रामातल्या नायोथा पर्यंत भविष्यवाद करीत गेला.

24मग त्यानेही आपली अंगवस्रे काढून शमुवेलापुढे भविष्यवाद केला आणि तो पडून त्या सर्व दिवस आणि त्या सर्व रात्री उघडा पडून राहीला; या कारणास्तव ते म्हणाले शौलही भविष्यवाद्यांमध्ये आहे की काय?


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Samuel 19 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran