Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Samuel 18 >> 

1तेव्हा असे झाले कि दाविदाने शौलाशी बोलणे समाप्त केले असता योनाथानाचा जीव दाविदाच्या जीवाशी जडला होता आणि योनाथान आपल्या जीवा सारखी त्याच्यावर प्रीती करीत होता.

2आणि त्या दिवशी शौलाने त्याला ठेवून घेतले आणि त्याला त्याच्या बापाच्या घरास माघारी जाऊ दिले नाही.

3मग योनाथानाने दाविदाशी करार केला कारण तो आपल्या जिवासारखी त्याजवर प्रीती करीत होता.

4आणि योनाथानाने आपल्या अंगातील जो झगा होता तो काढून दाविदाला दिला आणि आपले अंग वस्त्रे आणि आपली तरवार व आपले धनुष्य व आपला कमरबंद हाही त्याला दिला.

5तेव्हा शौल दाविदाला जेथे जेथे पाठवी तेथे तेथे तो जाई आणि तो चतुराईने वागत असे. आणि शौलाने त्याला लढाईच्या माणसांवर नेमिले आणि तो शौलाच्या चाकराच्या दृष्टीतही तो मान्य झाला.

6आणि असे झाले दावीद त्या पलिष्ट्याला मारून माघारी आला तेव्हा बायका इस्राएलच्या सर्व नगरातून गात व नाचत डफ व झांज वाजवतीत शौल राजाची भेट घ्यावयास निघाल्या.

7आणि त्या बायका नाचत असता एकमेकीस उत्तर देऊन असे बोलत होत्या कि शौलाने हजारास मारले आणि दाविदाने दहा हजारास मारले

8तेव्हा शौल फार रागे भरला आणि ती गोष्ट त्याला वाईट वाटून त्याने म्हंटले त्यांनी दाविदाला दहा हजारचे यश दिले आणि मला मात्र हजाराचे यश दिले आणि राज्याशिवाय त्याला आणखी काय अधिक मिळवायचे राहिले?

9आणि त्या दिवसापासून पुढे शौल दाविदाकडे संशयाने पाहू लागला.

10मग दुसऱ्या दिवशी असे झाले देवापासून दुष्ट आत्मा शौलावर जोराने आला तेव्हा तो घरात स्तवन करीत होता आणि दावीद रोजच्याप्रमाणे आपल्या हाताने वाद्य वाजवीत होता. आणि शौलाच्या हाती त्याचा भाला होता.

11तेव्हा शौलाने भाला मारण्यासाठी उगारला कारण त्याने म्हटले मी दाविदाला मारून भिंतीशी खिळीन. परंतु दावीद त्याच्यासमोरून दोनदा निसटून गेला.

12मग शौल दाविदाचे भय धरू लागला कारण देव शौलाला सोडून दाविदाच्या बरोबर होता.

13आणि शौलाने त्याला आपल्यापासून दूर करून त्याला आपल्या हजारांचा सरदार करून ठेवले आणि लोकांच्या देखत तो आत बाहेर जात येत असे.

14दावीदाची त्याच्या सर्व मार्गात भरभराट झाली कारण परमेश्वर त्याच्या बरोबर होता.

15जेव्हा शौलाने बघितले त्याची भरभराट झाली आहे तेव्हा त्याला त्याचा धाक बसला.

16परंतु सर्व इस्राएली आणि यहुदी दाविदावर प्रीती करीत असे. कारण की तो त्यांच्यादेखत आत बाहेर जात येत असे.

17मग शौलाने दावीदाले म्हटले पाहा मी आपली वडील कन्या मेरब ही तूला बायको करुन देईन माझ्यासाठी तू केवळ शूर ऐस आणि परमेश्वरासाठी लढाया कर. कारण शौल म्हणाला माझा हात त्याजवर न पडो पण पलिष्टंयाचा हात त्याजवर पडो.

18तेव्हां दावीदाने शौलाला म्हटले मी राजाचा जावई व्हावे असा मी कोण आहे? आणि माझा जीव काय? आणि इस्त्राएलामध्ये माझ्या बापाचे कुळ काय?

19परंतु असे झाले की ज्या वेळेस शौलाची कन्या मेरब दावीदाला द्यायची होती तेव्हा ती अद्रीयेल अमोलाथी याला बायको करुन देण्यात आली.

20तेव्हा शौलाची कन्या मीखल हीने दावीदावर प्रीती करित असे आणि हे शौलाला सांगितले असता त्याला बरे वाटले.

21तेव्हा शौलाने म्हटले मी ती त्याला देईन आणि ती त्याला पाशरुप होईल आणि पलिष्ट्यांचा हात त्याजवर पडेल. मग शौलाने दावीदाला म्हटलें कीं तूं आज दोघीतील एकीकडून माझा जावई होशील.

22आणि शौलाने आपल्या चाकरास आज्ञा केली की तूम्ही दावीदाला गुप्तपणे बोलून म्हणा की पाहा राजा तुजवर संतुष्ट आहे आणि त्याचे अवघे चाकर तुजवर प्रीति करितात तर आता राजाचा जावई हो.

23आणि शौलाच्या चाकरांनी हे शब्द दावीदाला सांगितले; तेव्हा दावीदाने म्हटले की राजाचा जावई होणे ही तुमच्या हिशोबात हलकी गोष्ट आहे की काय? मी तर दीन व तुच्छ असा मनुष्य आहे.

24मग असे जे दावीदाने म्हटले ते शौलाच्या चाकरांनी त्याला सांगितले.

25तेव्हा शौलाने म्हटले तुम्ही दावीदाले असे म्हणा राजाच्या शत्रूंचा सूड उगवावा म्हणुन पलिष्टंयाच्या शंभर अग्रत्वचा याशिवाय काही हुंडा राजा मागत नाही. परंतु दावीदाला पलिष्ट्यांच्या हाताकडून पाडावे असे शाऊलाने इच्छिले.

26मग त्याच्या चाकरांनी हे शब्द दावीदाला सांगितले तेव्हा राजाचा जावई होणे हे दावीदाले बरे वाटले; आणि नेमलेला वेळ अद्याप समाप्त झालेला नव्हता;

27तेव्हां दावीदाने उठून आपल्या माणसासाह जाऊन दोनशे पलीष्ट्यांस जिवे मारिले आणि त्यांची अग्रत्वचा आणून आपण राजाचा जावईं होण्यासाठीं राजाजवळ त्यांची मोजणी करुन दिली; तेव्हा शौलाने आपली कन्या मीखल त्याला बायको करुन दिली.

28मग हे पाहून शौलाला कळले की परमेश्वर दावीदाच्या संगती आहे आणि शौलाची कन्या मीखल हीने त्याजवर प्रीती केली.

29तेव्हा शौल दावीदाला अधिक भ्याला आणि शौल दावीदाचा वैरी नेहमी झाला.

30यावर पलिष्ट्यांचे सरदार लढायास निघत असत आणि असे झाले की ते जात असता दावीद शौलाच्या सर्व चाकरापेक्षा चतुराईने वर्तला आणि त्याचे नाव प्रसिद्ध झाले.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Samuel 18 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran