Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Samuel 2 >> 

1मग हन्ना प्रार्थना करून म्हणाली माझे ह्रदय देवाच्या ठायी आनंद पावत आहे माझे शिंग देवाच्या ठायी उंच केले आहे माझे मुख माझ्या शत्रूविरूध्द धैर्याने बोलत आहे कारण तू केलेल्या तारणाने मी आनंदित होत आहे.

2देवासारखा कोणी पवित्र नाही कारण तुझ्या शिवाय कोणी नाही; आमच्या देवासारखा खडकही कोणी नाही.

3अति गर्विष्टपणाने आणखी बढाई मारू नको; तुमच्या तोंडातून उध्दटपणाचे भाषण न निघो कारण परमेश्वर ज्ञानाचा देव आहे; त्याच्याकडून कृत्ये तोलली जातात.

4पराक्रम्याची धनुष्ये मोडलेली आहेत आणि जे अडखळले ते बलाने वेष्टीलेले आहेत.

5जे तृप्त होते ते अन्नासाठीं मोलमजुरी करीत आहेत आणि जे भुकेले होते ते तसे राहिले नाहीत; वांझ होती तिने सातांस जन्म दिला आहे आणि फार लेकरे आहेत ती अशक्त झाली आहे.

6यहोवा जिवे मारतो व जिवनात आणतो; तो अधोलोकास नेतो व वर आणतो;

7देव गरीब करतो व श्रीमंतही करतो; तो कमी करतो तो उंचही करतो तो गरीबाला धुळीतून वर उठवतो; तो भिकाऱ्याला उकिरड्यावरून उठवून उभे करतो;

8यासाठी की त्यांना राजपुत्राबरोबर बसवावे व त्यांना वारसाने सन्मानाचे आसन मिळावे; कारण पृथ्वीचे खांब देवाचे आहेत त्याने त्यावर जग ठेवले आहे.

9तो आपल्या विश्वासणाऱ्या लोकांचे पाय संभाळील परंतु दुष्ट अंधारांत शांत ठिकाणी ठेवले जातील कारण सामर्थ्याने कोणी मनुष्य विजय मिळविणार नाही

10देवाशी विरोध करणाऱ्यांचे तुकडे तुकडे केले जातील; आकाशांतून तो त्याच्याविरूध्द मेघगर्जना करील; देव पृथ्वीच्या शेवटल्या टोकावर असलेल्यांचा न्याय करील; तो आपल्या राजाला सामर्थ्य देईल आणि आपल्या अभिषिक्ताचे शिंग उंच करील.

11मग एलकाना रामा येथे आपल्या घरी गेला. आणि तो लहान मुलगा एली याजकासमोर देवाची सेवा करू लागला.

12एलीचे मुले नालायक माणसे होती; ते देवाला ओळखत नव्हते.

13त्या लोकाच्या बाबतीत याजकांची अशी रीत होती की कोणी मनुष्य यज्ञ अर्पण करू लागला की मांस शिजत असता याजकाचा चाकर मांस उचलण्यासाठी तीन अणकुचीदार टोकाचा काटा आपल्या हातात घेऊन येई

14तो परातीत किंवा तपेल्यांत किंवा कढईत किंवा पातेल्यांत ती घुसवत आणि जे सर्व धरून तो काटा काढी ते याजक आपणासाठी घेई; जे इस्त्राएल शिलो येथे येत त्या सर्वांना ते तसेच करत असत

15त्यांनी चरबी जाळण्याच्या आधीच याजकाचा चाकर येऊन यज्ञ करणाऱ्याला म्हणत असे की याजकासाठी मांस भाजण्यास दे कारण तो तुझ्यापासून शिजलेले मांस घेणार नाही तर फक्त कच्चे घेईल.

16जर त्या मनुष्याने त्याला असे म्हटले की अगोदर ते चरबी जाळतील मगच तुला पाहिजे तेवढे तूं घे; तर तो म्हणे असे नको पण तूं आताच दे नाही तर ते मी बळजबरीने घेईन.

17हे त्या तरुणाचे पाप देवाच्यासमोर फार मोठे होते कारण त्यामुळे देवासाठी अर्पण आणण्याचा लोकांना तिरस्कार वाटू लागला.

18परंतु शमुवेल बाळ तर तागाचे वस्त्र एफोद घालून देेवाची सेवा करीत होता.

19त्याची आई त्याच्यासाठी लहान अंगरखा करीत असे आणि प्रत्येक वर्षी आपल्या पतीबरोबर वार्षिक यज्ञ करावयास येई त्यावेळी त्याला तो देत असे.

20एलकानाला व त्याच्या बायकोला एली आशीर्वाद देऊन म्हणत असे या बायकोपासून यहोवा तुला संतान देवो कारण जे तिने देवाकडे विनंती करून मागितले त्याला परत दिले मग ते आपल्या घरी जात असत.

21आणि देवाने हन्नेला पुन्हा मदत केली ती गरोदर झाली. तिने तीन मुलांना व दोन मुलीना जन्म दिला दरम्यानच्या काळात शमुवेल बाल यहोवाच्यासमोर वाढत गेला.

22आता एली फार म्हातारा झाला होता आणि आपले मुलगे सर्व इस्राएलांशी कसे वागले आणि सभामंडपाच्या प्रवेशदाराजवळ ज्या स्त्रीया सेवा करीत त्यांच्यांपाशी ते कसे निजले हे सर्व त्याने ऐकले.

23तेव्हा तो त्यांना म्हणाला तुम्ही अशी कृत्ये का करता? कारण तुमची वाईट कृत्ये या सर्व लोकांपासून मी ऐकली आहेत.

24माझ्या मुलांनो असे करू नका कारण जी बातमी मी ऐकतो ती चांगली नाही; तुम्ही देवाच्या लोकांना आज्ञाभंग करायला लावता.

25जर कोणी एक माणूस दुसऱ्याविरुध्द पाप करील तर देव त्याचा न्याय करील. पण जर माणूस देवाच्या विरूध्द पाप करील तर त्यासाठी कोण बोलेल? पण ते आपल्या बापाच शब्द ऐकेनात कारण त्यांना जिवे मारावे असे देवाचा हेतू होता.

26शमुवेल बाळ हा मोठा झाला आणि देवाच्या व मनुष्याच्या कृपेत वाढत गेला.

27आता देवाचा एक माणूस एलीकडे येऊन त्याला म्हणाला देव असे म्हणतो तुझ्या पूर्वजांचे घराणे मिसरात फारोच्या दास्यात राहत असता मी त्याला प्रगट झालो नाही काय?

28आणि त्याने माझा याजक व्हावे माझ्या वेदीकडे धूप जाळायला वरती जावे माझ्यासमोर एफोद धारण करावे म्हणून मी त्याला सर्व इस्त्राएलाच्या वंशातून निवडून काढले नाही काय? आणि इस्त्राएलाच्या लोकांनी अग्नीतून केलेली सर्व अर्पणे मी तुझ्या पूर्वजांच्या घराण्याला दिली नाहीत काय?

29तर तुम्ही जो माझा यज्ञ व जे माझे अर्पण मी जिथे मी राहतो तिथे आज्ञापिले आहे त्यांना तुम्ही का लाथ मारता? आणि माझे लोक इस्त्राएलांच्या सर्व अर्पणातील जी उत्तम त्यांकडून आपणाला पुष्ट करण्यास माझ्यांपेक्षा आपल्या मुलांचा तू का अधिक आदर करतोस?

30यामुळे इस्त्राएलांचा देव म्हणतो की तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे माझ्यासमोर निरंतर चालेल असे मी म्हटले खरे; परंतु आता देव असे म्हणतो ही गोष्ट माझ्यापासून दूर होवो कारण जे माझा आदर करतात त्यांचा आदर मी करीन आणि जे मला तिरस्कार करतात त्यांचा अवमान होईल.

31पाहा असे दिवस येत आहे की ज्यात मी तुझे सामर्थ्य व तुझ्या बापाच्या घराण्याचे सामर्थ्य कापून टाकीन आणि तुझ्या घराण्यात कोणी म्हातारा होणार नाही.

32जरी इस्त्राएलाला जे सर्व चांगले दिले जाईल तरी जिथे मी राहतो त्याजागी दु; ख पाहशील आणि तुझ्या घराण्यात सर्वकाळ कधी कोणी म्हातारा होणार नाही.

33आणि तुझा जो माणूस मी आपल्या वेदीपासून काढून टाकणार नाही तो तुझे डोळे क्षीण करणारा व तुझ्या ह्रदयाला खेद देणारा होईल व तुझ्या घराण्याची सर्व संतती ऐन तरुणपणात मरेल.

34आणि तुझे दोघे मुलगे हफनी व फिनहास यांच्यावर जे येईल तेच तुला चिन्ह होईल; ते दोघेहि एकाच दिवशी मरतील.

35आणि मी आपणासाठी विश्वासू याजक उभा करीन; तो माझ्या ह्रदयात व माझ्या मनांत त्याप्रमाणे करील. मी त्याचे घराणे निश्चित स्थापील. आणि तो माझ्या अभिषिक्त राजासमोर निरंतर चालेल.

36असे होईल की तुझ्या घराण्यातील प्रत्येक जण जो कोणी राहिलेला आहे तो येऊन रुपाच्या तुकड्यासाठी व भाकरीच्या तुकड्यासाठी त्याच्यापुढे नमन करील आणि म्हणेल की मी तुला विनंती करतो मला भाकरीचा तुकडा खाण्यास मिळावा म्हणून मला याजकपदातले एखादे काम दे.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Samuel 2 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran