Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Samuel 1 >> 

1एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामाथाईम-सोफीम ह्या नगरामधील एक माणूस होता व त्याचे नाव एलकाना होते. तो यरोहामाचा मुलगा तो एलीहूचा मुलगा तो तोहचा मुलगा तो सूफाचा मुलगा तो एलकाना एफ्राईमी होता.

2त्याला दोन बायका होत्या एकीचे नाव हन्ना व दुसरीचे नाव पनिन्ना होते. पनिन्नेला लेकरे होती परंतु हन्नेला नव्हती.

3तो माणूस आपल्या नगराहून प्रतिवर्षी शिलो येथे सैन्यांचा देवाचे भजनपूजन करायला व यज्ञ करायला जात असे. तेथे एलीचे दोन मुलगे हफनी व फिनहास देवाचे याजक होते.

4जेव्हा एलकाना यज्ञ करायचा दिवस आला म्हणजे तो आपली बायको पनिन्ना हिला व तिचे सर्व मुलगे तिच्या सर्व मुली यांना वाटे देत असे.

5परंतु हन्नेला तो दुप्पट वाटा देत असे कारण हन्नेवर तो प्रीती करत असे पण देवाने तिची कुस बंद केली होती.

6आणि देवाने तिचे गर्भस्थान बंद केले होते यामुळे तिला खिन्न करण्यासाठी तिची सवत तिला फारच चिडवी.

7आणि त्याने प्रतिवर्षी असेच केले. तेव्हा ती देवाच्या मंदिरात जाई तेव्हा ही तिला असाच त्रास देई म्हणून ती रडत असे व खात नसे.

8तेव्हा तिचा नवरा एलकाना तिला म्हणे हन्ना तू कां रडतेस का खात नाहीस आणि तुझे ह्रदय का दु:खीत आहे? मी तुला दहा मुलांपेक्षा जास्त नाही काय?

9मग त्यांनी शिलो येथे खाणेपिणे संपवल्यावर हन्ना उठली आणि एली याजक मंदिराच्या खांबाजवळच्या आपल्या आसनावर बसला होता.

10तेव्हा ती खूप दु:खीत अशी होती आणि ती देवाजवळ प्रार्थना करून फार रडली.

11नवस करून बोलली हे सैन्याच्या देवा जर तू आपल्या दासीचे दुख पाहशील व माझी आठवण करशील व तुझ्या दासीला विसरणार नाहीस व दासीला पुरूष संतान देशील तर मी त्याला त्याच्या आयुष्याच्या सर्व दिवसात देवाला देईल आणि त्याच्या डोक्यावर वस्तरा फिरवणार नाही.

12आणि असे झाले की ती देवाच्यापुढे प्रार्थना करीत असता एलीने तिच्या तोंडाकडे लक्ष दिले.

13हन्ना तर आपल्या ह्रदयात बोलत होती तिचे ओठ मात्र हालत होते पण तिची वाणी ऐकू येत नव्हती म्हणून ती दारू पिऊन नशेत बोलत असेल असे एलीला वाटले.

14तेव्हा एली तिला म्हणाला केवढा वेळ तू मस्त राहशील? तू आपले मद्य आपल्यापासून दूर कर.

15आणि हन्ना उत्तर देऊन म्हणाली असे नाही माझ्या प्रभू मी दु:खीत आत्म्याची बाई आहे द्राक्षारस किंवा मद्य मी प्याले नाही तर मी आपला जीव देवापुढे ओतत आहे

16तुझी दासी दुष्ट बाई आहे असे तू समजू नको कारण माझे क्लेश व यातना यांमुळे मी येथवर बोलले आहे.

17मग एली उत्तर करून म्हणाला सुखरूप जा व इस्त्राएलाचा देव याच्यापाशी जे मागणे तू मागितले ते तो तुला देवो.

18ती बोलली तुझ्या दासीवर तुझी कृपादृष्टी होऊ दे. मग ती स्त्री निघून आपल्या वाटेने गेली आणि तिने खाल्ले व पुढे तिचे तोंड उदास राहिले नाही.

19आणि सकाळी त्यांनी उठून देवाचे भजनपूजन केले; मग ती निघून रामा येथे आपल्या घरी गेली. आणि एलकानाने आपली बायको हन्ना हिला जाणले व देवाने तिची आठवण केली.

20आणि असे झाले की नेमलेली वेळ आल्यावर हन्ना गरोदर राहिली व तिने मुलाला जन्म दिला आणि तिने त्याचे नाव शमुवेल असे ठेवले; ती म्हणाली कारण मी त्याला देवापासून मागून घेतले.

21आणि तो माणूस एलकाना आपल्या सर्व कुटुंबासहीत देवाला वार्षिक यज्ञ अर्पण करायला व आपले नवस फेडायला वर गेला.

22परंतु हन्ना वर गेली नाही कारण ती आपल्या नवऱ्याला म्हणाली मुलाचे दूध तोडीपर्यत मी वर जाणार नाही मग मी त्याला नेईल; आणि तो देवापुढे हजर होईल व तो तेथे नेहमी वस्ती करील.

23तेव्हां तिचा नवरा एलकाना तिला म्हणाला तुला बरे वाटते ते कर; तूं त्याचे दूध तोडीपर्यत राहा; केवळ देव आपले वचन स्थापित करो. मग ती स्त्री घरी राहिली व आपल्या मुलाचे दूध तोडीपर्यत तिने त्याला स्तनपान दिले.

24आणि त्याचे दूध तोडल्यावर तिने तीन गोऱ्हे व एक एफाभर सपीठ व द्राक्षरसाचा एक बुधला घेऊन आपणाबरोबर त्याला शिलो येथे देवाच्या मंदिरात नेले; तेव्हा मूल लहान होते.

25मग त्यांनी एक गोऱ्हा कापला आणि मुलाला एलीकडे आणले.

26आणि ती म्हणाली माझ्या प्रभू तुझा जीव जिवंत आहे; माझ्या प्रभूजी बायको देवाची प्रार्थना करीत येथे तुझ्याजवळ उभी राहिली होती ती मीच आहे.

27या मुलासाठी मी प्रार्थना केली आणि जी माझी मागणी मी देवापाशी मागितली होती ती त्याने मला दिली आहे.

28म्हणूनच मी तो देवाला उसना दिला आहे तो वाचेल तोपर्यत तो देवाला उसना दिलेला आहे तेव्हा तेथे त्याने देवाची आराधना केली.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Samuel 1 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran