Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Jonah 1 >> 

1आता अमित्तयाचा पुत्र योना याच्याजवळ परमेश्वराचे वचन आले की,

2''ऊठ व त्या मोठ्या निनवे शहरात जा आणि तिकडे जाऊन त्याच्याविरूध्द आरोळी करून सांग; कारण त्यांची दुष्टता मजसमोर वर आली आहे''.

3परंतु योना परमेश्वराच्या सान्निध्यापासून तार्शिसास दूर पळून जायला उठला, आणि याफो येथे उतरला तेव्हा तार्शिसास जाणारे एक जहाज त्यास सापडले; मग त्याने प्रवासाचे भाडे दिले व परमेश्वराच्या सान्निध्यापासून त्यांच्याबरोबर दूर तार्शिसास जाण्यासाठी जहाजात जाऊन बसला.

4परंतु परमेश्वराने समुद्रात मोठा वारा सुटू दिला आणि असे मोठे वादळ समुद्रात आले की जहाज फुटण्याच्या मार्गावर आले.

5तेव्हा खलाशी घाबरले आणि प्रत्येकजन आपल्या देवाला हाक मारू लागले, आणि जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून देऊ लागले; परंतु योना तर जहाजाच्या अगदी सर्वात आतल्या भागात उतरून जाऊन तेथे तो गाढ झोपला होता.

6मग जहाजाचा मुख्यनायक त्याच्याजवळ येऊन म्हणाला, अरे झोप घेत काय पडलास? ऊठ आपल्या देवाला हाक मार कदाचित तुझा देव आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश होणार नाही.

7आणि ते सर्व एकमेकाला म्हणाले, चला आपण चिठ्ठ्या टाकू म्हणजे कोणामुळे हे संकट आपणावर आले आहे; हे आपणास कळेल. त्यांनी चिठ्या टाकल्या तेव्हा योनाच्या नावाची चिठी निघाली.

8तेव्हा त्यांनी योनाला म्हटले, आम्ही तुला विनंती करतो, कोणामुळे हे संकट आम्हावर आले आहे, हे तू आम्हाला सांग, तुझा धंदा काय आहे आणि तू कोठून आला आहेस? तुझा देश कोणता आणि तू कोणत्या लोकांपैकी आहेस?

9मग योनाने त्यास सांगितले कि मी इब्री आहे; आणि ज्या स्वर्गातल्या देवाने समुद्र व कोरडी भूमी उत्पन्न केली त्या परमेश्वराचे मी भय धरतो.

10मग त्या माणसास अत्यन्त भीति वाटली, आणि ते योनाला म्हणाले, तू हे काय केले ? कारण त्या मनुष्यांनी जाणले तो परमेश्वरासमोरून पळून जात आहे. कारण त्याने त्यास तसे सांगितले होते.

11मग ते योनाला म्हणाले कि समुद्र आमच्यासाठी शांत व्हावा, म्हणून आम्ही तुझे काय करावे? कारण समुद्र तर अधिकाधिक खवळत होता.

12योना त्यास म्हणाला तुम्ही मला उचलून समुद्रात फेकून द्या, म्हणजे समुद्र तुमच्यासाठी शांत होईल; कारण मझ्यामुळे हे मोठे वादळ तुम्हावर उठले आहे. हे मला माहीत आहे.

13तरी सुध्दा त्या माणसांनी जहाज किनाऱ्यास आणण्यासाठी खूप प्रयत्नाने वल्हविले; परंतु ते काही करू शकत नव्हते. कारण समुद्र त्यांजवर अधिकाधिक खवळत चालला होता.

14तेव्हा ते परमेश्वराचा धावा करत म्हणाले, हे परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो या माणसाच्या जीवनामुळे आमचा नाश होऊ नये, आणि त्याच्या मृत्यूचा दोष आम्हावर येऊ नये; कारण हे परमेश्वरा, जसे तुला योग्य वाटेल तसे तू केले आहे.

15नंतर त्यांनी योनाला उचलून समुद्रात फेकून दिले. तेव्हा समुद्र खवळायचा थांबून शांत झाला.

16मग त्या माणसांस परमेश्वराची खूप भीती वाटली, आणि त्यांनी परमेश्वराला यज्ञ केला आणि नवसही केले.

17मग योनाला गिळण्यास परमेश्वराने एक मोठा मासा तयार केला होता. योना तीन दिवस आणि तीन रात्र त्या माशाच्या पोटात होता.



 <<  Jonah 1 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran