Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 36 >> 

1वाईट माणूस जेव्हा असे म्हणतो “मी देवाला भिणार नाही, त्याला मान देणार नाही” तेव्हा तो फार वाईट गोष्ट करतो.

2तो माणूस स्वतःशीच खोटे बोलतो त्याला स्वतःच्या चुका दिसत नाहीत म्हणून तो क्षमेची याचना करीत नाही.

3त्याचे शब्द खोटे असतात त्यांना कवडीची किंमत असते तो शहाणा होत नाही किंवा सत्कृत्य करायला शिकत नाही.

4सर्व रात्रभर तो चुकीच्या किंवा वाईट गोष्टींच्या योजना आखतो. तो उठल्यावर काहीही चांगले करीत नाही. परंतु तो काही वाईट करायला नकारही देत नाही.

5परमेश्वरा, तुझे खरे प्रेम आकाशापेक्षाही उत्तुंग आहे. तुझी इमानदारी ढगांपेक्षा उंच आहे.

6परमेश्वरा तुझा चांगुलपणा सर्वात उंचपर्वतापेक्षाही उंच आहे तुझा न्यायीपणा सर्वात खोल, समुद्रापेक्षाही खोल आहे. परमेश्वरा तू मनुष्याला आणि प्राण्यांना वाचवतोस.

7तुझा प्रेमळ दयाळूपणा सगळ्यांत किंमती आहे. माणसे आणि देवदूत तुझ्याकडे संरक्षणासाठी येतात.

8परमेश्वरा तुझ्या घरातल्या चांगल्या वस्तूंमुळे त्यांना नवा जोम येतो. तू त्यांना तुझ्या अद्भुत नदीतून मनसोक्त पिऊ देतोस.

9परमेश्वरा जीवनाचे कारंजे तुझ्यातून उडते. तुझा प्रकाश आम्हाला प्रकाश दाखवतो.

10परमेश्वरा जे तुला खरोखरच ओळखतात त्यांच्यावर प्रेम करणे तू चालूच ठेव. जे लोक तुझ्याशी प्रामाणिक आहेत त्यांच्यासाठी तुझा चांगुलपणा असू दे.

11परमेश्वरा गर्विष्ठ लोकांना मला सापळ्यात अडकवू देऊ नकोस. वाईट लोकांना मला पकडू देऊ नकोस.

12त्याच्यां थडग्यावर “हथे वाईट लोक पडले, त्यांना चिरडण्यात आले, ते आता पुन्हा कधीही उभे राहू शकणार नाहीत.” असे लिहून ठेव.



 <<  Psalms 36 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran