Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Jonah 4 >> 

1परंतु ह्यामुळे योनाला फार वाइट वाटले व त्याला राग आला.

2तो परमेश्वराजवळ विनवणी करू लागला की, हे परमेश्वरा, मी माझ्या देशात होतो तेव्हा माझे सांगणे होते की नाही? म्हणूनच मी तार्शिशास पळून जाण्याची घाई केली. कारण मला माहित होते की तू कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दया संपन्न आहेस. आणि संकट आणल्याबद्दल अनुताप करणारा असा देव आहेस.

3माझी विनंती ऐक, हे परमेश्वरा, माझा जीव घे कारण जिवंत राहण्यापेक्षा मला मरण चांगले वाटते.

4मग परमेश्वर म्हणाला तुला राग येणे चांगले आहे का?

5मग योना बाहेर निघून शहराच्या पूर्व दिशेला बसला; तेथे तो एक मंडप करून सावलीत व शहराचे काय होईल हे पाहत बसला.

6मग तुंबीचा एक वेल देवाने योनाच्या डोक्यावर सावलीसाठी उगवला जेणेकरून त्याने दुःखातून मुक्त व्हावे. त्या तुंबीच्या वेली मुळे योनाला खूप आनंद झाला.

7मग दुसऱ्या दिवशी देवाने एक किडा त्या तुंबीच्या वेलीवर सोडला व ती वेल सुकून गेली.

8मग देवाने, सूर्य उगवल्यावर पूर्वेकडून झळईचा वारा सोडला; आणि ऊन योनाच्या डोक्याला लागले त्याने तो मूर्च्छित झाला व त्याला मरण येवो अशी तो विनवणी करत म्हणाला मला जिवंत राहण्यापेक्षा मरण चांगले वाटते.

9मग परमेश्वर योनाला म्हणाला तुंबीमुळे तुला राग येणे हे बरोबर आहे का? तो म्हणाला, रागामुळे माझा जीव गेला तरी चालेल.

10परमेश्वर त्याला म्हणाला या तुंबीसाठी तू काहीच कष्ट केले नाही व तू हिला मोठे केले नाही, ती एका रात्रीत मोठी झाली आणि एका रात्रीत नष्ट झाली त्या वनस्पतीवर तू करुणा केली आहे;

11ज्याला उजव्या व डाव्या हाताचा फरक समजत नाही अशी एक लाख वीस हजारांपेक्षा जास्त लोक ह्या मोठ्या निनवे शहरात आहेत आणि पुष्कळ गुरेढोरे आहेत. तिच्यावर मी करुणा करू नये काय?


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Jonah 4 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran