Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Jonah 3 >> 

1आणि परमेश्वराचे वचन दुसऱ्याने योनाकडे आले, ते म्हणाले,

2ऊठ, त्या मोठ्या निनवे शहरास जा, अणि जो संदेश मी तुला सांगेन त्याची घोषणा कर.

3मग परमेश्वराच्या वचनाप्रमाणे योना उठून निनवेस गेला. निनवे हे फार मोठे शहर होते. ते सर्व फिरण्यास तीन दिवस लागत होते.

4तेव्हा योना शहरातून एक दिवसाची वाट चालत असता त्याने घोषणा करून सांगितले, की अजून चाळीस दिवस आहेत, मग निनवेचा नाश होईल.

5तेव्हा निनवेतल्या लोकांनी देवावर विश्वास ठेवला, आणि उपास जाहीर केला, आणि मोठ्यापासून लहानपर्यंत त्यांनी गोणताट नेसले.

6कारण निनवेच्या राजाला ही बातमी समजली, तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपला झगा आपल्या अंगातून काढून ठेवला. मग तो गोणताट नेसून राखेत बसला.

7आणि राजाने, राज्याच्या आणि त्याच्या सरदारांच्या ठरावाने निनवेत घोषणा करून ठराव प्रसिध्द केला. त्याने सांगितले, की मनुष्यांनी अथवा पशूंनी, गुराढोरांनी, अथवा शेरडामेंढरांनी काही चाखू नये, खाऊ नये व पाणी पिऊ नये.

8परंतु मनुष्य आणि पशू गोणताट नेसावेत; आणि देवाचा मनापासून धावा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून आणि आपल्या हाताच्या जुलमापासून मागे फिरावे.

9न जाणो आमचा नाश होऊ नये म्हणून कदाचित देव वळेल, अनुताप पावेल, आणि आपल्या संतप्त क्रोधापासून फिरेल.

10तर ते आपल्या कुमार्गापासून फिरले आहेत, अशी त्यांची कृत्ये देवाने पाहिली आणि ज्या संकटाविषयी देव बोलला होता, की मी त्याच्यावर ते आणीन, त्याविषयी त्याने आपले मन बदलले, आणि त्याने तसे केले नाही.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Jonah 3 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran