Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Joshua 9 >> 

1मग यार्देनेच्या डोंगराळ प्रदेशात, तळवटीत आणि लबानोनासमोरील महासमुद्राच्या किनाऱ्यावर राहणारे हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि युबसी यांचे सर्व राजे होते

2तेव्हा त्यांनी एका आदेशाखाली एकत्र जमून यहोशवा व इस्राएल यांच्या विरूध्द लढाई पुकारली.

3यहोशवाने यरीहो आणि आय या नगराचे काय केले हे जेव्हा गिबोनाच्या रहिवाश्यांनी ऐकले,

4तेव्हा त्यांनी फसवेगिरीची योजना केली; त्यांनी स्वतःसाठी शिधासामग्री घेतली आणि आपल्या गाढवावर जुनी गोणताटे व झिजलेले, फाटलेले, शिवलेले द्राक्षारसाचे बुधले घेतले;

5त्यांनी आपल्या पायात झिजलेले व ठिगळाचे जोडे आणि अंगात जुने पुराणे कपडे घातले; त्यांच्या खाण्याच्या सर्व भाकरी वाळलेल्या आणि बुरसटल्या होत्या

6ते गिलगाल येथील छावणीत यहोशवाकडे येऊन त्याला व इस्राएल लोकांना म्हणाले, आम्ही दूर देशांहून आलो आहोत म्हणून आता आमच्याबरोबर करार करा.

7इस्राएल लोकांनी त्या हिव्वी लोकांना म्हटले, आम्ही तुमच्याबरोबर करार कसा करणार? कदाचित न जाणो तुंम्ही आमच्याजवळ राहणारे असाल.

8ते यहोशवाला म्हणाले, आम्ही तुझे दास आहो यहोशवाने त्यांना विचारले, तुम्ही कोण व कोठून आला?

9त्यांनी त्याला म्हटले, तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव ऐकून तुझे दास फार दूर देशाहून आलो आहोत कारण त्याने मिसरात जी प्रत्येक गोष्ट केली त्याची किर्ती आम्ही ऐकली आहे;

10आणि यार्देनेच्या पलीकडील अमोरी यांचे दोन राजे, हेशबोनाचा राजा सीहोन आणि अष्टरोथातला बाशानाचा राजा ओग, यांना जे काय केले तेही आम्ही ऐकले आहे.

11तेव्हा आमचे वडील आणि आमच्या देशांतील सर्व रहिवासी आम्हांला म्हणाले, प्रवासासाठी आपल्याबरोबर शिदोरी घ्या व त्यांना भेटायला जा आणि त्यांना म्हणा, आम्ही तुमचे दास आहोत, तेव्हा आता आमच्याशी करार करा.

12या पाहा आमच्या भाकरी! आम्ही घरून तुमच्याकडे येण्यास निघालो त्या दिवशी, प्रवासांत शिदोरी म्हणून घेतल्या तेव्हा त्या गरम होत्या; पण आता त्या वाळून बुरसटल्या आहेत.

13हे द्राक्षरासाचे बुधले आम्ही भरून घेतले तेव्हा ते नवे होते, पण आता ते फाटून तुटून गेले आहेत; हे आमचे कपडे आणि जोडे फार लांबच्या प्रवासाने जीर्ण झाले आहेत.

14तेव्हा लोकांनी त्यांचे काही अन्न स्वीकारले; पण त्यांनी मार्गदर्शनासाठी परमेश्वर देवाचा सल्ला घेतला नाही.

15मग यहोशवाने त्यांच्याशी समेट केला आणि त्यांना जीवन बहाल करुन सुरक्षीत ठेवण्याचे, अभिवचन दिले. लोकांच्या नेत्यांनीहीसुध्दा त्यांच्याशी शपथ घेतली.

16इस्राएल लोकांनी त्यांच्याशी करार केल्यानंतर तीन दिवसांनी त्यांना समजले कि, हे आपले शेजारी असून आपल्यामध्ये राहणारे आहेत.

17नंतर इस्राएल लोक कूच करीत तिसऱ्या दिवशी त्यांच्या नगरास जाऊन पोहचले त्यांच्या नगरांची नांवे गिबोन, कफीरा, बैराथ व किर्याथ-यारीम.

18पण इस्राएल लोकांनी त्यांना मारून टाकले नाही, कारण त्यांच्या नेत्यांनी इस्राएलाचा देव परमेश्वर याची शपथ घेतली होती; तेव्हा सर्व इस्राएल लोकांनी त्यांच्या नेत्यांविरुद्ध कुरकुर केली.

19परंतु सर्व नेते सगळ्या लोकांना म्हणाले, आम्ही त्यांच्यासमोर इस्राएलाचा देव परमेश्वर याची शपथ घेतली आहे, म्हणून आता आम्हाला त्यांना हात लावता येत नाही.

20त्यांचाशी आम्ही असेच वागणार; त्यांना आम्ही जीवंत राखणार; तसे न केल्यास त्यांच्याशी शपथ वाहिल्यामुळे आम्ही क्रोधास पात्र ठरू.

21नेत्यांनी लोकांना सांगितले की, त्यांना जिवंत राहू द्या. नेत्यांनी त्यांना सांगितल्या प्रमाणे गिबोनी लोक सर्व इस्राएली लोकांचे लाकूडतोडे व पाणक्ये झाले.

22यहोशवाने त्यांना बोलावून म्हटले तुम्ही आमच्यामध्ये राहत असून आम्ही फार दूरचे आहोत असे सांगून आम्हांला कां फसवले?

23म्हणून आता तुम्ही या कारणासाठी शापित आहात, आणि तुमच्यातले काही नेहमी दास होऊन राहाल; तुम्ही माझ्या देवाच्या घरासाठी लाकूड तोडणारे व पाणी काढणारे असे होऊन राहाल.

24त्यांनी यहोशवाला उत्तर दिले, हा सर्व देश तुम्हांला द्यावा आणि तुमच्यासमोर देशांतील सर्व रहिवाश्यांचा नाश करावा असे तुझा देव परमेश्वर याने आपला सेवक मोशे याला आज्ञापिले होते, हे तुझ्या दासांना पक्के कळले होत; तुमच्यामुळे आम्हांला आमच्या जीवाची फार भीती वाटली म्हणून आम्ही हे काम केले.

25आता पाहा, आम्ही तुझ्या हातात आहोत; तुला बरे व योग्य दिसेल तसे आमचे कर.

26त्यामुळे यहोशवाने त्यांचे तसे केले; त्यांना इस्राएल लोकांच्या हातांतून सोडवले; इस्राएल लोकांनी त्यांना जिवे मारले नाही,

27यहोशवाने त्या दिवशी मंडळीसाठी आणि परमेश्वर निवडणार होता त्या स्थानी त्याच्या वेदीसाठी गिबोन्यांना लाकूडे तोडणारे व पाणी काढणारे म्हणून नेमले; तसे ते आजपर्यंत आहेत.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Joshua 9 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran