Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Isaiah 63 >> 

1जो अदोमाहून येत आहे, जो लाल वस्रे घातलेला बस्राहून येत आहे, तो कोण आहे? जो राजेशाही वस्त्रे ल्यालेला, जो त्याच्या महान शक्तीमुळे आत्मविश्वासाने कूच करीत आहे, तो कोण आहे? जो न्यायीपणाने बोलणारा, आणि तारयला समर्थ्य आहे, तो मीच आहे.

2तुझी वस्त्रे लालभडक का? आणि ती का द्राक्षांचा रस काढण्याऱ्याच्या कपड्यासारखी आहेत?

3“मी एकट्यानेच द्राक्षकुंड तुडवले आहे आणि राष्ट्रांतील कोणी माझ्याबरोबर नव्हता. मी आपल्या रागाने त्यांना तुडवले आणि आपल्या क्रोधने त्यांना रगडले. त्यांचे रक्त माझ्या कपड्यांवर उडाले आणि माझी सर्व कपडे मळीन झाली आहेत.

4कारण प्रतिकाराच्या दिवसा कडे पाहत अाहे, आणि माझ्या खंडूण घेतलेल्यांचे वर्ष आले आहे.

5मी पाहिले आणि मला मदत करण्यासाठी कोणीही नव्हते. कोणीही मदतीला नाही म्हणून मला आश्चर्य वाटले. परंतू माझ्याच बाहूने माझ्यासाठी विजय दिला आणि माझ्याच रागाने मला वर नेले.

6माझ्या रागात मी लोकांना पायाखाली तुडविले आणि त्यांना माझ्या रागात मस्त केले आणि त्यांचे रक्त मी पृथ्वीवर उडवले.

7मी परमेश्वराच्या कराराचा विश्वासूपणा आणि त्याची प्रशंसनीय कृत्ये सांगेन. परमेश्वराने आम्हांसाठी जे सर्व केले आणि इस्राएलाच्या घराण्याचे जे हित केले ते मी सांगेन. त्याच्या करुणामुळेच ही दया त्याने आम्हांला दाखवली आहे.

8कारण तो म्हणाला, खचित हे माझे लोक आहेत, मुले, जी विश्वासघातकी नाहीत.

9त्यांच्या सर्व दु:खात, तो पण दु:खी झाला आणि त्याच्या समक्षतेच्या दुतांने त्यांना तारले. त्याने आपल्या प्रेमाने व आपल्या करूणेने त्यांना वाचवले, आणि त्याने सर्व पुरातन दिवसांत त्यांना उचलून वाहून नेले.

10पण त्यांनी बंड केले आणि त्याच्या पवित्र आत्म्याला खिन्न केले. म्हणून तो त्यांचा शत्रू झाला आणि त्यांच्याविरूध्द लढला.

11त्याच्या लोकांनी मोशेच्या प्राचीन काळाविषयी विचार केला. ते म्हणाले, तो देव कोठे आहे, ज्याने आपल्या कळपाच्या मेंढपाळांसोबत त्यांना समुद्रातून वर आणले? देव कोठे आहे, ज्याने आपला पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये घातला?

12ज्याने आपले वैभवशाली सामर्थ्य मोशेच्या उजव्या हाताने पुढे नेले, आणि ज्याने आपणास सार्वकालिक नाव करायला त्यांच्यापुढे समुद्र दुभागला, तो देव कोठे आहे?

13तो देव कोठे आहे? ज्याने त्यांना खोल समुद्रामधून चालवत नेले, जसा घोडा सपाट जमीनावर धावत सुटतो, तशे ते अडखळले नाही.

14परमेश्वराने त्यांना खोऱ्यात उतरत जाणाऱ्या गुरांप्रमाणे विसावा दिला. ह्याप्रमाणे तू लोकांना मार्गदर्शन केलेस आणि ह्यासाठी की तुझे प्रतीपी होवो.

15स्वर्गातून खाली पाहा आणि तुझ्या पवित्र व तेजोमय वस्तीतून नोंद घे. तुझा आवेश आणि तुझी महतकृत्ये कोठे आहेत? तुझी करुणा आणि दयाळू कृती आमच्याकडून ठेवल्या आहेत

16तू तर आमचा पिता आहेस, तरी अब्राहामला आम्हाला ओळखत नाही आणि इस्राएलला आम्ही माहीत नाही. परमेश्वरा, तू आमचा पिता, सर्वकाळपासून आम्हांला खंडूण घोणारा, हे तुझे नाव आहे.

17परमेश्वरा, तू आम्हाला तुझ्यापासून मार्गतून का बहकू देतोस आणि तुझ्या आज्ञा न पाळव्यात म्हणून तू आमचे हृदये कठीण का करतोस? तुझ्या सेवका करीता परत ये, जे तुझ्या वतनाचे वंश आहेत.

18तुझी पवित्र माणसे थोडाच वेळ वतन भोगू शकली, पण आमच्या शत्रूंनी तुझे पवित्र मंदिर पायाखाली तुडविले.

19त्या लोकांन प्रमाणे आम्ही झालो, ज्यांच्यावर तू कधीच राज्य नाही केले आणि ज्याना तुझे नाव ठेवले नाही.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Isaiah 63 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran