Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Jeremiah 42 >> 

1नंतर तेव्हा सर्व सेनाधिकारी आणि कारेहाचा मुलगा योहानान, होशायाचा मुलगा यजन्या आणि लहानापासून मोठ्यापर्यत सर्व लोक यिर्मया संदेष्ट्याकडे पोहचले.

2ते त्याला म्हणाले, “आमची विनंती तुझ्यासमोर येवो. जे आम्ही संख्येने थोडे लोक उरले आहोत, ते तू पाहत आहेस, त्या आम्हासाठी तुझा देव परमेश्वराकडे प्रार्थना कर.

3आम्ही कोठे जावे व काय करावे याने आम्हास सांगावे म्हणून तुझा देव परमेश्वर याला विचार.”

4मग यिर्मया संदेष्टा त्यांना म्हणाला, “मी तुमचे ऐकले आहे. पाहा, मी तुमच्या विनंतीप्रमाणे तुमचा देव परमेश्वराकडे प्रार्थना करीन. जे काही परमेश्वर उत्तर देईल, मी तुम्हाला सांगीन. मी तुमच्यापासून काहीही लपविणार नाही.”

5मग ते यिर्मयाला म्हणाले, “जर परमेश्वर देव तुझ्याकडून जसे सांगतो तसे आम्ही वागलो नाही, तर परमेश्वर तुझा देव आमच्याविरुद्ध खरा व प्रामाणिक साक्षीदार होवो.

6ते चांगले असो किंवा जर ते वाईट असले तरी आम्ही परमेश्वर आमचा देव ज्याच्याकडे आम्ही तुला पाठवत आहो त्याची वाणी आम्ही ऐकू. अशासाठी की, जेव्हा आम्ही परमेश्वर आमचा देव याची वाणी ऐकतो तेव्हा आमच्याबरोबर चांगले व्हावे.”

7मग दहा दिवसानंतर असे झाले की, यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले.

8म्हणून यिर्मयाने कारेहाचा मुलगा योहानान, त्याच्याबरोबर असलेले सर्व सेनाधिकारी व लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व लोकांना बोलावले.

9आणि तो त्यांना म्हणाला, “परमेश्वर, इस्राएलाचा देव ज्याच्याजवळ तुम्ही मला त्याच्यासमोर तुमची विनंती ठेवायला पाठवले, परमेश्वर असे म्हणतो,

10“जर तुम्ही परत गेला आणि या देशात राहाल तर मी तुम्हाला बांधीन आणि तुम्हाला खाली पाडणार नाही; मी तुम्हाला लावीन, उपटून टाकणार नाही, कारण जे अरिष्ट मी तुमच्यावर आणले त्यामुळे मला वाईट वाटते.

11ज्या बाबेलाच्या राजाला तुम्ही भीत आहात,त्याला भिऊ नका. हे परमेश्वराचे निवेदन आहे. ‘कारण मी तुमचे रक्षण आणि त्याच्या हातातून तुमची सुटका करण्यास मी तुमच्याबरोबर आहे.

12कारण मी तुमच्यावर दया करीन आणि तुमच्याशी दयाळूपणाने वागेल आणि मी तुम्हाला तुमच्या देशात परत आणील.’

13पण कदाचित् तुम्ही म्हणाल, ‘आम्ही या देशात राहणार नाही.’ जर परमेश्वर तुमचा देव याची वाणी तुम्ही ऐकणार नाही.

14तुम्ही कदाचित् म्हणाल, ‘नाही, आम्ही मिसर देशामध्ये जाऊन राहू, तेथे आम्हाला कोणतेही युध्द दिसणार नाही, तेथे आम्ही रणशिंगाचा आवाज ऐकणार नाही आणि तेथे आम्ही अन्नासाठी भुकेले होणार नाही. आम्ही तेथे राहू.’

15तर आता यहूदातील वाचलेल्यांनो, परमेश्वराचे वचन ऐका. सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, ‘जर तुम्ही खरोखर मिसर देशामध्ये जाऊन आणि तेथे राहण्याचे निश्चित करता,

16तर ज्या तलवारीची तुम्हाला भीती वाटते, ती मिसर देशात तुम्हाला गाठेल. ज्या दुष्काळाची तुम्ही काळजी करीता, तो मिसरात तुमचा पाठलाग करील. आणि तुम्ही तेथे मराल.

17म्हणून असे घडेल की, जे सर्व माणसे मिसरमध्ये जाऊन राहण्याचे निश्चित करतील, ते तेथे तरवार, दुष्काळ, किंवा मरीने मरतील. तेथे त्यांच्यातील एकही जण वाचणार नाही, मी त्यांच्यावर आणलेल्या संकटातून एकही जण वाचणार नाही.’

18“कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, ‘जसा माझा क्रोध व माझा संताप यरुशलेमेवरचा माझा राग व्यक्त करून दाखविला. यरुशलेमेमध्ये राहणाऱ्यावर ओतला आहे तसा माझा क्रोध जर तुम्ही मिसरमध्ये जाल तेव्हा तुम्हावर ओतला जाईल. तुम्ही शापाची वस्तू व्हाल व भयचकीत, शाप बोलण्याचा विषय आणि काहीतरी निंदनीय व्हाल. आणि हे ठिकाण तुम्ही पुन्हा कधीही पाहणार नाही.’

19“यहूदातील वाचलेल्यांनो, परमेश्वर तुम्हाविषयी बोलला आहे, तुम्ही मिसरात जाऊ नका.तुम्ही खरोखर जाणून घ्या आज मी तुम्हाविरूद्ध साक्ष दिली आहे.

20कारण परमेश्वर आमचा देव याच्याजवळ आम्हासाठी प्रार्थना कर, आणि जे काही परमेश्वर आमचा देव सांगेल ते आम्ही करू असे बोलून परमेश्वर तुमचा देव याच्याकडे पाठवले तेव्हा तुम्ही आपल्या जिवाविरूद्ध कपटाने वागला.

21कारण आज मी तुम्हाला ते सांगितले आहे, पण त्याने जे काही माझ्याकडून सांगण्यासाठी पाठवले किंवा त्या कशातही तुम्ही तुमच्या परमेश्वर देवाची वाणी ऐकली नाही

22म्हणून आता तुम्ही खरोखर जाणा की ज्या स्थानात तुम्ही जाऊन राहू इच्छिता त्यात तुम्ही तरवार,दुष्काळ आणि मरीने मराल.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Jeremiah 42 >> 


Bible2india.com
© 2010-2023
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran