Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Ezekiel 7 >> 

1यहोवा देवाचा शब्द माझ्याकडे आला व तो म्हणाला.

2“मानवाच्या मुला यहोवा देव इस्त्राएलाच्या भुमीला म्हणतो: या देशाच्या चारही बाजुचा शेवट झाला आहे!

3आता तुझा शेवट जवळ आला आहे, यास्तव मी माझा क्रोध त्यांच्यावर प्रकट करेल, त्यांच्या अपवित्र कामा वरुन मी त्यांचा न्याय करेल. त्यानंतर त्यांच्या वर घ्रुणा आणेल.

4माझी द्रुष्टी तुमच्यावर दया करणार नाही, आणि मी तुमची गय करणार नाही, तुमच्या कामाचे वेतन तुम्हास देईन, तुमची घ्रुणा मला येते, मग तुम्हाला कळेल मी यहोवा देव आहे!

5यहोवा देव हे सांगतो: अनर्थ! अनर्था मागे अनर्थ! पहा तो येत आहे!

6शेवट हा निश्चीत जवळ आला आहे: शेवट तुमच्या साठी जागा झाला आहे! पहा तो येत आहे!

7रहीवाशी असलेल्या लोकांच्या भुमीवर सत्यानाश येऊन ठेपला आहे, हानी जवळ येण्याचा समय आला आहे आणि कुठल्याही पर्वतावर हर्षभरीत ध्वनी ऐकु येणार नाही

8आता जास्त काळ मी तुम्हा विरुध्द आपल्या त्वेषाने माझ्या रागाची ओतणी तुम्हावर करेल, जेव्हा मी तुमच्या क्रुत्याप्रमाने न्यायाचा निकाल करेल आणि तुम्हावर सर्व प्रकारची घ्रुणा घेऊन येईल.

9मी तुम्हाकडे करुणेने बघणार नाही, आणि तुझी गय मी करणार नाही, तुझ्या कमाची परतफेड तुझ्यावर होईल. तुम्हा मध्ये घ्रुणा वास करेल मग तुम्हाला समजेल मी यहोवा देव जो शिक्षा करणारा आहे.

10पहा! असे दिवस येत आहेत, जे घमंडाने भरलेल्या शिक्षेची काठी तुम्हावर येईल.

11क्रुरपणाची काठी दुष्टपणावर उगवेल त्यांच्या सर्वावर, त्यांच्यातल्या धनावर, त्यांच्या महत्वाच्या शेवटच्या इच्छा रहाणार नाही.

12वेळ, दिवस समीप येत आहे, हर्ष खरेदी न करो आणि दुःख विक्री न करो, जोपर्यंत माझा क्रोध सर्व बहुसंख्य लोकांवर रहाणार आहे!

13विक्रेता विकलेला माल जोपर्यंत आहे तोवर कधीच वापस घेत नाही, कोणताही मानव त्याच्या पापात सशक्त होणार नाही.

14ते तुताऱ्याचा नाद करतील आणि तयारी करतील तरी लढाई करण्यास कोणी तयार होणार नाही. तथापी माझा क्रोध पूर्ण समुदायावर आला आहे.

15इमारतीच्या आत तरवार आणि दुष्काळ, साथीचा रोग बाहेर आहे. जे शेतात आहेत ते तरवारीने मरतील, तोवर दुष्काळ आणि साथीचा रोग त्यांचा नायनाट करेल.

16त्यांच्यातील काही जण बचावले जातील आणि पर्वतावर कबुतरा प्रमाणे जातील त्याच्या पातकामुळे ते कण्हत राहतील.

17प्रत्येक हात अडखळतील आणि प्रत्येक गुडघा पाण्याप्रमाणे कमजोर होइल.

18आणि ते अंगावर पोते गुंडळतील, त्यांच्यावर दहशतीचे सावट पसरेलः त्यांच्या चेह-यावर लाज व डोक्यावर टक्कल पडेल.

19ते आपले सोने व चांदी रस्त्यावर फेकुन देतील त्याचा त्याग करतील, त्यांच्या सोच्याचांदीने यहोवा देवाचा राग आवरु शकणार नाही, त्यांच्या जीवाचा बचाव होणार नाही.

20ते त्यांच्या दागीण्यांवर घमंड करीत होते, त्यांच्या मूर्ती त्यांनी तिरकार आणणाऱ्या घ्रुणा निर्माण करणाऱ्या तयार केल्या होत्या. तिरस्करणीय कार्य त्यांच्याशी केले आहे. म्हणून या सर्व गोष्टी त्यांच्या साठी अपवित्र केल्या आहे.

21आणि मी तिर्हाईतास हे सर्व लुट म्हणून वाटून देईन आणि प्रुथ्वी वरील वाईट लोकांना लुटून घेऊन जाऊ देईल.

22मग मी माझे तोंड त्यांच्या महत्वाच्या ठिकाणापासुन फिरवेल कारण यांनी माझे स्थान भ्रष्ट केले. डाकु येऊन आत लुटालुट करतील.

23साखळी तयार करा कारण भुमीवर रक्ताच्या न्यायाच्या निकालाने पूर्ण भरुन गेली आहे, शहर हिंसक बनले आहे.

24देशावर सर्वात दुष्ट लोक घेऊन येईल आणि ते त्यांची घरे बळकावून घेतील, आणि मी त्यांचा गर्व समाप्त करेल कारण त्यांनी पवित्र ठिकाण अमंगळ केली आहेत!

25भयभीत होतील! शांततेच्या शोधात ते भटकतील पण त्यांना ती सापडणार नाही!

26अनर्था वर अनर्थ येईल अफवा वर अफवा पसरतील! मग ते संदेष्ट्याला संदेश पहाण्यासाठी सांगतील, द्र्ष्ट्याची विद्या, सल्ला, वडिलांची बुध्दी संपून जाईल.

27राजे शोक करतील व राज कुमार निराशा परीधान करतील तेव्हा भुमीच्या लोकांचे हात भितीने थरथरतील त्यांच्या क्रुत्या प्रमाणे हे त्यांच्याशी मी करेल! आणि मी त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांच्या न्याय करेल जोपर्यंत त्यांना समजणार नाही मी यहोवा देव आहे.”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Ezekiel 7 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran