Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Ezekiel 6 >> 

1मग यहोवा देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि तो मला म्हणाला

2मानवाच्या मुला, आपले मुख इस्त्राएलाच्या पर्वताच्या विरुध्द राहून त्यांच्या विरुध्द भाकीत कर

3यहोवा देवाचा शब्द ऐका असे इस्त्राएलाच्या पर्वताला जाऊन सांग, देव त्या पर्वत दऱ्या खोऱ्याना झऱ्यांना सांगत आहे. ऐका! मी तुमच्या विरुध्द तरवार चालवील, आणि मी तुमचे उच्चस्थान उध्वस्त करीन.

4तुमच्या वेद्याचे खांब मी पाडुन टाकीन त्यांच्या मुर्त्यांना बाहेर काढून टाकेल.

5इस्त्राएल लोकांचे प्रेत त्यांच्या मुर्त्यांपुढे मी टाकून देईन आणि त्यांच्या वेद्यांपुढे हाडांची पांगापांग करेल.

6जेथे तुम्ही रहातात, त्या शहराचे उच्च स्थानांचा विध्वंस करेल. म्हणून तुमच्या वेद्या, मुर्त्या, उध्वस्त केल्या जाईल. त्यामुळे ते मोडकळीस येतील आणि त्यांची सर्व कामे पुसुन टाकली जातील.

7त्यांच्या मध्ये ते म्रतप्राय होतील आणि मग तुम्हाला कळेल मी यहोवा देव आहे.

8तरी उरलेल्यांचा मी बचाव करेल, देशातुन काहींचा बचाव तरवारीपासुन होईल, जेव्हा देशातुन तुमची पांगापांग होईल.

9ज्यांचा बचाव झाला ते माझ्या बद्दल विचार करतील जेथे ते गुलामगिरीत होते. त्यांची मन रसमिसळ झालेला, माझ्या पासून दुर आहेत, मग ते तिव्री तिटकारा त्यांच्या चेहऱ्यावर व डोळे मुर्तीकडे लागलेले, दुष्टपणा, घ्रुणा त्यांच्या झाली होती.

10तेव्हा त्यांना समजेल मी यहोवा देव आहे, त्यांच्या संकट आणले त्यासाठी विशेष त्यांचे कारण आहे.

11यहोवा देव हे म्हणतो; “टाळ्या वाजवा आपले पाय आपटा! आहा हा हा! कारण इस्त्राएलाच्या घराण्यात सर्व प्रकारचे वाईट घ्रुणा आहे! त्यांच्यावर तरवार, दुष्काळ, साथीचा रोग येईल.

12जे लांब असतील ते साथीच्या रोगाने मरतील जे जवळ असतील ते तरवारीने मरतील जे उरलेले लोक दुष्काळाने मरतील; मी त्यांच्या विरुध्द असलेला त्वेष पूर्ण करेल.

13मग तुम्हाला समजेल मी यहोवा देव आहे, जेव्हा त्यांचे म्रुतक त्यांच्या वेद्यांपुढे उच्च ठिकाणी ओक झाडा शेजारी, हिरव्या छाये खाली पडलेले असतील, जेथे ते मुर्त्यांना सुगंधी द्रव्य अर्पण करीत होते!

14मी आपले सामर्थ्य त्यांना दाखवील, आणि त्यांच्या भुमीचा पूर्ण विध्वंस करेल, त्यांचे राहाण्याचे ठिकाणे दिबलायाकडे व ज्या जागी ते राहात होते जवळपास सर्व ठिकाणे वाया घालवील, मग त्यांना समजेल मी यहोवा देव आहे!”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Ezekiel 6 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran