Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Ezekiel 3 >> 

1“मानवाच्या मुला तो मला म्हणाला जे तुला प्राप्त झालेला हा ग्रंथ खाऊन टाक! आणि जा आणि इस्त्राएलाच्या घराण्याशी बोल.”

2म्हणून तेव्हा मी आपले तोंड उघडले व त्याने मला तो ग्रंथ खाऊ घातला.

3“मानवाच्या मुला, तो मला म्हणाला मी तुला दिलेल्या ग्रंथपटाने आपले पोट भरुन टाक!” मग मी ते खाल्ले, आणि ते माझ्या तोंडाला मधासारखे गोड वाटले.

4तेव्हा तो मला म्हणाला “मानवाच्या मुला इस्त्राएलाच्या घराण्याकडे जा आणि माझे शब्द त्यांना सांग.

5अपरीचीत वाणी आणि कठोर भाषेच्या लोकां जवळ मी तुला पाठवत नाही, परंतू इस्त्राएलाच्या घरण्याकडे

6मोठी राष्ट्रे अपरीचीत, कठिण भाषेचे, ज्यांची भाषा समजत नाही त्यांच्या कडे पाठवत नाही! जर मी तुला त्यांच्या कडे पाठवेल तर ते तुझे ऐकतील!

7परंतू इस्त्राएलाचे घराणे तुझे ऐकण्याची इच्छा दाखवणार नाही, ते माझेही ऐकण्याची इच्छा दाखवत नाही. म्हणून इस्त्राएलाचे सर्व घराणे हट्टी कपाळाचे आणि कठिण मनाचे आहे.

8पहा! मी तुझा चेहरा त्यांच्या हट्टी चेहऱ्या सारखा त्यांच्या कठोर कपाळासारखा तुझे कपाळ केले आहे.

9तुझे कपाळ मी हिऱ्यासारखे कठोर केले आहे! त्यांना भयभीत होऊ नको किंवा निराश होऊ नको कारण पहील्यापासुन फितूर आहेत.”

10“मानवाच्या मुला, तेव्हा तो मला म्हणाला; जे काही मी तुला बजावले आहे-ते आपल्या मानात साठवून घे आणि आपल्या कानांनी त्यांचे ऐक!

11मग गुलामां कडे-तुझ्या लोकांजवळ जा-आणि त्यांच्याशी बोल; ते ऐकोत किंवा न ऐको, यहोवा देव असे सांगतो”

12आत्म्याने मला वर उचलले, आणि माझ्या मागे मी भुकंपासारखा मोठा आवाज ऐकला, तो म्हणाला; त्याच्या स्थानातून यहोवा देवाचे गोरव धन्य आहे!

13ऐकमेकांच्या स्पर्श करणाऱ्या जीवंत प्राण्यांचा आवाज त्यानंतर मी ऐकला व त्यांच्या बरोबर चाकांचा आवाज व मोठ्या भुकंपाचाही आवाज होत होता!

14आत्म्याने मला उंच केले व वर नेले व आत्म्यात माझ्या कडवट पण घेऊन आलो व यहोवा देवाचा हात सामर्थ्याने माझ्यावर आला!

15तेल-अबीब या ठिकाणी मी गुलामां कडे गेलो जे खबार ओढ्याच्या शेजारी राहात होते आणि मी तेथे सात दिवस राहीलो व चकीत होऊन व्यापून गेलो.

16मग सातव्या दिवसानंतर यहोवा देवाचे वचन मला मिळाले, आणि म्हणाले

17“मानवाच्या मुला, मी तुला इस्त्राएलाच्या घरण्यावर पहारा देण्यासाठी मी तुझी नेमणुक केले आहे, म्हणून माझ्या तोंडचा शब्द ऐकून घे व त्यांना सावधान कर!

18जेव्हा मी दुष्टांना म्हणालो, तू निश्चीत मरशील, कारण त्यांच्या वाईट कामासाठी तू त्याला सावध केले नाही तर कदाचित वाचला असता-दुष्ट आपल्या पापात मरेल-पण त्याच्या रक्ताचा जाब मी तुझ्या कडुन घेईल.

19परंतू जर दुष्टाला त्याच्या मार्गापासुन सावध केले आणि तो आपल्या दुष्ट मार्गापासुन किंवा कामापासुन मागे वळाला नाही तर तो त्याच्या पापात मरेल मग त्याचा जाब तुझ्याकडे विचारला जाणार नाही.

20जर देवभीरु व्यक्ती आपल्या देवाच्या भयापासुन व कार्यापासून अधम वागेल, तर मी त्याच्या पुढे अडखळण ठेवेल, आणि तो मरेल जर तू त्याला सावध केले नाही, तो त्याच्या पापात मरेल, आणि त्याने केलेल्या धार्मीक काम आठ्वले जाणार नाही, पण त्याच्या रक्ताचा जाब मी तुला विचारेल.”

21परंतू जर तू देवभीरु माणसाला पाप करण्यापासुन सावध करशील, तो निश्चीत वाचेल; आणि त्याचा जाब तुला विचारला जाणार नाही.

22मग यहोवा देवाचा हात माझ्यावर आला, आणि तो मला म्हणाला, “उठ आणि दरीत जा, तेथे मी तुझ्याशी बोलेन!”

23मी उठलो आणि दरीत खबार ओढ्याजवळ गेलो, यहोवा देवाचे गोरव तेथे प्रकाशत होते; तेथे मी उपडा पडलो.

24आत्म्याने येऊन मला तेव्हा माझ्या पाया वर उभे केले; आणि माझ्याशी बोलला, व म्हणाला जा आणि स्वताःला आपल्या घरात बंद करून ठेव,

25आता, मानवाच्या मुला, ते तुला दोरीने बांधतील म्हणून त्याच्या मध्ये तू बाहेर जाऊ शकणार नाही.

26तुझी जिभ टाळुला चिकटेल असे मी करेल आणि मुका होशील तू त्यांना धमकावु शकणार नाहीस, कारण ते फितुर घराणे आहे.

27पण जेव्हा मी तुझ्याशी बोलेन तेव्हा तुझे तोंड मी उघडीन व यहोवा देव असे म्हणतो त्यांना सांग, ज्याला ऐकायचे असेल त्याने ऐकावे ज्याला ऐकावयाचे नसेल त्याने ऐकू नये कारण ते फितुर घराणे.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Ezekiel 3 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran