Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Ezekiel 4 >> 

1परंतू मानवाच्या मुला तू एक विट घे आणि तुझ्या पुढे ठेव. मग यरुशलेम शहराचे चित्र रेखाट.

2तिच्यावर वेढा पडला आणि सभोवताली वेशी उभ्या कर. उठून दोन समान पातळ्या जोडणारा रस्ता बनव आणि त्याला कुंपण घाल शहरात स्वताः मध्ये लोखंडाची भिंत उभी कर, तुझे तोंड शहराच्या विरुध्द दिशेला कर हे वेढ्याच्या आत घडेल वेढा त्याच्या विरुध्द बाजुला असेल!

3हे इस्त्राएलाच्या घराण्याला चिन्ह असेल.

4मग आपल्या डाव्या कुशीवर झोप आणि इस्त्राएलाच्या घराण्याचे पाप स्वताःवर घे; इस्त्राएलाचे पाप जितके दिवस तू झोपुन राहाशील तितके दिवस तू ते इस्त्राएलाच्या घराण्याचे वाहाशील;

5मी तुझ्यावर त्यांच्या शिक्षेची जबाबदारी प्रत्येक वर्षाची ३९० दिवस सोपवून दिली आहे, तू इस्त्राएलाच्या घराण्याचे अपराध वाहुन नेशील.

6जेव्हा तू हे दिवस पूर्ण करशील, तेव्हा दुसऱ्यांदा उजव्या कुशीवर नीज, ४० दिवस यहुदाच्या घराण्याचे पाप तू वाहशील, मी तुला प्रत्येक वर्षाला एक दिवस तुला सोपवून दिले आहेत.

7आपले तोंड यरुशलेमेच्या विरुध्द दिशेला कर जे चित्र रेखाटन केले आहेस, ज्याला वेढा पडलेला आहे, आपल्या बाहुंनी झाकु नको आणि त्यांच्या विरुध्द भाकीत करशील.

8पहा, तुला दोरीने करकचुन बांधतील तुला एका बाजुहून दुसरीकडे वळु शकणार नाही जोपर्यंत तू वेढा पडलेला समय पूर्ण करणार नाहीस.

9स्वताःसाठी तू गहु, जव, सोयाबीन, कडधान्य, बाजरी, ज्वारी, आणि जर्मन गहु घेऊन जितके दिवस तू एका बाजुस रहाशील तेवढ्या दिवसासाठी एका भांड्यात ते घे आणि आपल्यासाठी भाकर तयार कर जे तू ३९० दिवस खाशील.

10हे तुझ्या खाण्यासाठी २० शेकेल वजनाचे असेल जी वेळॊवेळी तुझी उपजीवीका असेल.

11पाणी ६० हिन मोजून वेळो वेळी तुझ्या पिण्यासाठी असेल.

12जवाची भाकर तू भाजून खा पण सर्वा देखत माणसाच्या विष्टेवर भाजून खा!

13यासाठी यहोवा देव “सांगतो, ती भाकर म्हणजे इस्त्राएलाचे घराणे जे अपवित्र आहेत, ज्या देशातुन मी त्यांना हद्दपार करेल.”

14परंतू मी म्हणालो “आहा हा हा. हे यहोवा! माझे मन कधी अपवित्र झाले नाही! जे मेलेले व मारुन टाकलेले मी कधी खाल्ले नाही, विटाळलेले मांस आजवर माझ्या मुखात गेले नाही.”

15म्हणून तो मला म्हणाला, “पहा! मी तुला मानवाच्या विष्टे ऐवजी गाईच्या विष्टेवर स्वताःसाठी भाकर भाज.”

16तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला पहा! मी यरुशलेमेच्या भाकरीचा पुरवठा काढून टाकेल, आणि अस्वस्थतेत शिधा वाटप ते करतील आणि ते पाणी पितील जोपर्यंत शिधा कपात केला जाईल.

17कारण त्यांना अन्नपाण्याचा तुटवडा पडुन त्यांची त्रेधा उडेल व ऐकमेकात त्यंच्या अपराधासाठी भयभीत होतील.”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Ezekiel 4 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran