Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Ezekiel 17 >> 

1यहोवा देवाचा शब्द माझ्या कडे आला आणि म्हणाला

2मानवाच्या मुला इस्त्राएलाच्या घराण्याला कोडे सांग आणि दाखला सांग.

3सांग की यहोवा देव तुम्हास सांगत आहेः एक मोठा गरुड मोठ्या पंखासह आणि लांब दातेरी चाकासह व पिसाऱ्याने परिपूर्ण आणि ते बहुरंगी आहेत ते लबानोन पर्वतावर गेला व त्यांने देवराराची फांदी मोडून टाकली.

4त्यांच्या फांदीचा शेंडा मोडुन टाकला आणि त्याला कनानात घेऊन गेला त्याला व्यापाऱ्यांच्या शहरात लावले.

5त्याने त्यातले काही बिज घेतले आणि पेरणी करण्यासाठी तयार भुमीत पेरले जेथे विपुल पाणी होते.

6मग त्याची वाढ होऊन द्राक्षाचे झाडाच्या फांद्या पसरल्या व गरुडाकडे झुकल्या आणि त्याचे मुळ त्याकडे वाढ झालेले होते.

7पण तेथे अजून एक मोठा गरूड असून मोठे पंख आणि पिसारा असलेला होता आणि बघा! या द्राक्षलता गरुडाकडे झुकलेली असून व त्यांच्या फांद्याही गरूडाकडे पसरलेल्या होत्या, त्याला रोपन केल्या पासून त्याला विपुल पाणी घातले होते.

8त्याला सुपीक जमीनीत विपुल पाण्याजवळ रोपन केलेले होते त्यामुळे त्यांच्या फांद्या बहरल्या आणि ते फलदायी झाले त्यातून उत्तम दर्जाची द्राक्ष आली!

9हे घडेल का? लोकांना असे सांगा यहोवा देव हे म्हणतोः त्याचे मुळ उपटुन टाकू नका आणि त्याची फळे तोडु नका, त्यांची वाढ सुकून जाईल? कोणतेही बाहुबल कोणताही जनसमुदाय त्याला उपटुन टाकणार नाही?

10मग बघा! त्याला रोपन केल्यावर त्याची वाढ होईल? ते सुकून जाणार नाही? जेव्हा पुर्वे कडील वारा त्याला स्पर्श करेल? ते आपल्या जागेत पूर्ण वाळून जाईल.

11मग यहोवा देवाचा शब्द माझ्या कडे आला आणि म्हणाला

12बडखोर घराण्याशी बोल या गोष्टी काय आहे ते तुला माहीत नाही का? बघ! बाबेलचा राजा यरुशलेमकडे येईल त्यांचा राजा आणि राज पुत्राला घेऊन जाईल बाबेलात जाईल.

13मग राजवंशाला घेऊन जाईल, त्याच्याशी करार करेल आणि त्यांना शपथेखाली घेऊन येईल. आणि भुमीतील बलवानांना सोबत घेऊन जाईल.

14मग राज्य रसातळाला जाईल मग उच्च पातळी गाठणार नाही, त्याचा करार मान्य करुनच भुमीवर वावरता येईल.

15पण यरुशलेमेचा राजा आपला राजदुत यरुशलेमेत पाठवुन त्याज विरध्द बंड करेल घोडे आणि सैन्य हस्तगत करेल. तो यशस्वी होईल? या गोष्टी करणाऱ्याची सुटका होईल? जर तो कराराचे उल्लंघन करेल, त्याची सुटका होईल?

16माझ्या जीवताची शपथ असे यहोवा देव जाहीर करतो तो निश्चीत राज्याच्या भुमीत मरेल ज्याने त्याला राजा केले, ज्या राजाने करार केला ज्याने त्याला तुच्छ लेखून करार मोडला. तो बाबेलाच्या मध्यवर्ती ठिकाणी मरेल!

17फारो आपल्या पराक्रमी बाहूबलाने अनेक लोकांना जमवेल युध्दाने त्याचा बचाव होणार नाही, जेव्हा बाबेलच्या पर्वतावर वेढा बुरुज बांधतील आणि अनेकांचा धुव्वा उडवण्यासाठी ते बुरुज पाडून टाकतील.

18करार मोडुन राजाने शपथेला तुच्छ लेखले, बघ! तो आपला हाताने वचनप्राप्ती करेल, पण त्याने जे केले त्यासाठी तो निभावणार नाही.

19यास्तव यहोवा देव असे सांगतो जसे मी शपथेने म्हणतो त्याने करार मोडला आणि तुच्छ लेखले? म्हणून मी त्याच्या माथी मी शासन आणिन!

20मी आपले पाश त्याच्या वर टाकीन, त्यास पारध म्हणून पकडेल, मग त्याला बाबेलात नेईन आणि शासन अमलात आणिन जेव्हा त्यांनी देशद्रोह केला व माझ्याशी विश्वासघात केला.

21आणि त्याच्या बाहुबलाचे सर्व शरणस्थान तरवारीने मोडले गेले, आणि जे उरलेले सर्व दिशेने विखुरले गेले आहे, मग तुला कळेल मी यहोवा देव आहे, मी जे बोलले ते घडेल.

22यहोवा देव हे म्हणतोः मग मी स्वताःला देवदार झाडाच्या उच्च ठिकाणी घेऊन जाईल आणि मी त्यांचे रोपन करेल व त्यांच्या फांद्या तोडल्या जातील व मी स्वताःला उच्चस्थानी स्थापील.

23मी त्यांना इस्त्राएलाच्या पर्वतावर रोपन करेल व त्यांना फांद्या, फळे येतील आणि ते देवदार झाडाचे उदात्त होतील म्हणून पंखाचे पक्षी त्याखाली रहातील, ते त्यांच्या फांद्यां मध्ये घरटे करतील.

24मग सर्व झाडाच्या पक्षांना कळेल की मी यहोवा देव आहे, मी उच्च झाड खाली आणेल; मी लहान झाडाला उच्च करीन! मी सुकलेल्या झाडाला पाणी देईन; कारण मी त्यांच्यावर वारा वाहून वाळवले आहे! मी यहोवा देव आहेः मी जे जाहिर केले आहे ते घडेल!


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Ezekiel 17 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran