Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Ezekiel 1 >> 

1तिसाव्या वर्षीच्या चौथ्या महीन्यात, पाचव्या दिवशी, मी खबार ओढ्याच्या शेजारी गुलाम केलेल्या लोकांसोबत मी रहात होतो. तेव्हा स्वर्ग उघडला आणि मी देवाचा द्रुष्टांत पाहीला.

2महीन्याच्या पाचव्या दिवशी यहोयाखीन राजाच्या गुलामगीरीचे ते वर्ष होते.

3खबार ओढ्यानजीक, खास्द्यांच्या भुमीवर बुजीचा मुलगा यहेज्केल याजकाला यहोवा देवाचे वचन सामर्थ्याने आले व यहोवा देवाचा हात त्याच्यावर आला.

4तेव्हा मी पाहीले उत्तरे कडुन वादळव वारा आला-मोठे ढग अग्नीयुक्त लपेटलेले मध्य भागात विजांचा पिवळसर प्रकाश मध्यभागी चमकत होता.

5मध्यभागी चार जीवंत प्राण्याच्या आकाराचे ते माणासासारखे दिसत,

6पण त्यांना चार तोंडे होते. आणि प्रत्येक प्राण्याला चार पंख होते.

7त्यांची पाय मात्र मोठे लांबडे पण तळवे खोल पितळेने चकाकणारे वासरासारखे होते.

8अजुन त्यांच्या चार तोंडांना झाकण्यासाठी हाताखाली पंख असून त्यांच्या चार तोंडे पंखे असे होतेः

9त्यांची पंख पुढ्च्या प्राण्याच्या पंखांना स्पर्श करीत पुढे जाण्यासाठी ते वळत नव्हते जोपर्यंत ते सगळे सरळ सोबत चालत नाही.

10माणसाच्या तोंडासारखे त्याचे तोंड दिसत होते. पुढचे तोंड सिंहाच्या तोंडासारखे, त्याच्या पुढच्याचे बेलासारखे त्याच्या पुढच्याचे गरुडाच्या तोंडासारखे होते.

11त्यांची चेहरे आणि अंगे एकमेकापासुन वेगळी होती, प्रत्येक प्राण्याचा पंखांची जोडी दुसऱ्या प्राण्याच्या पंखांना स्पर्श करून घेत होती.

12प्रत्येक जण सरळ जात होते, जसा आत्मा त्यांना जाण्यासाठी सांगत तसे ते न वळसा घेत सरळ पुढे जात होती.

13जळत्या कोलीता समान किंवा विजेरी समान जीवंत प्राणी दिसत होते त्यांच्या तुन प्रखर अग्नी निघत होता. त्यांच्या प्रकाश चकाकत होता.

14हे जीवत प्राणी चपळ पणे पुढे मागे हालचाल करु शकत होते. आणि ते विजेसारखे दिसत होते!

15मग मी जीवंत प्राण्याकडे पाहीले त्याच्या बाजुला चाके होती,

16असे त्या चाक दिसत होती चारही चाके एक समान व रत्नासारखी होती आणि चाकात चाक अशी ती होती.

17जेव्हा चाक चालत तेव्हा ते कोणत्याही दिशेने वळण न घेता चालत.

18त्यांचे धावणे हे भयावह असून त्यांच्या चाकां भवती डोळे होते!

19जेव्हा ते जीवीत प्राणी चालत त्याच्या सोबत चाके चालत जेव्हा ते प्राणी प्रुथ्वीपासून उंच उडत त्यांची चाकेही त्यांच्या सोबत उंचावत होती.

20जेथे आत्मा त्यांना नेऊ इच्छीत होता ते तिकडे जात होते. आत्मा त्यांना उंचावत होता आणि त्यांच्या चाकात त्यांचा आत्मा होता.

21जेव्हा केव्हा ते प्राणी चालत चाकेही हालचाल करीत, जेव्हा ते थांबत चाकेही थांबत, जेव्हा ते उंच उडत त्यांच्या सोबत चाकेही उंच उडत होती कारण त्यांचा आत्मा त्यांच्या चाकात वास करीत होता.

22त्या जीवंत प्राण्यांच्या मस्तकावर महागड्या घुमटासारखे चकाकणारे दिसत होते, त्यांच्या कपाळावर स्पटीकासारखे चमकत होते.

23घुमटाखाली प्राणी आपले पंख सरळ लांब पसरवत होते आणि एकमेकांच्या पंखांना ते स्पर्श करीत होते. प्रत्येक प्राण्याच्या पंखांच्या जोडीने (दोन-दोन) आपले शरीर झाकीत आणि दोन-दोन पंखांनी स्वताःला आवरण करीत.

24तेव्हा मी त्यांच्या पंखांचा पाण्याच्या धबधब्यासारखा मोठा आवाज ऐकला तो सर्वसामर्थी वाणीसारखा होता, जेव्हा ते हालचाल करीत तेव्हा जोरदार पर्जन्यव्रुष्टी युक्त वादळा समान आवाज असून तो आवाज मोठ्या सेनेसारखा होता जेव्हा ते थांबत आपले पंख खाली ठेवत होते.

25जेव्हा ते थांबत घुमटातुन त्यांच्या माथ्यावरुन आवाज येत होता व जेव्हा ते आपले पंख खाली स्तब्ध ठेवीत होते.

26घुमटाच्या वरच्या त्यांच्या माथ्याच्या भागात नीलरत्न जडीत सिंहासन दिसत होते, आणि सिंहासनावर माणसाच्या चेहऱ्या समान कुणी असल्याची जाणीव होत होती.

27अग्नीयुक्त धातूने चमकणारी प्रतिमा मी कमरेच्या वरच्या भागात पाहीली, आणि खालच्या भागात प्रखरतेने प्रकाशीत झालेले होते.

28पाऊस पडतांना दिसणाऱ्या मेघधनुष्या सारखा तो भासत होता त्याच्या भवती प्रखर तेजोमय प्रकाश होता. हे यहोवा देवाच्या गोरवयुक्त तेज दिसत होते. जेव्हा मी हे पाहीले व माझ्यासोबत बोलणारी वाणी कली तेव्हा मी उपडा पडलो.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Ezekiel 1 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran