Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Lamentations 5 >> 

1हे परमेश्वरा, आमची अवस्थाकाय झाली ह्याकडे लक्ष लाव. आमच्या अप्रतिष्ठेकडे नजर टाक.

2आमचे वतन परक्यांच्या हातात गेला आहे. आमची घरे परदेशीयांना दिली गेली आहेत.

3आम्ही अनाथ झालो. आम्हाला वडील नाहीत. आमच्या मातांची स्थिती विधवांसारखी झाली आहे.

4आम्हाला पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते. आमचा स्वतःचा लाकूडफाटा आम्हाला विकला जातो.

5आमचा पाठलाग करणारे आमच्या मानगुटीस बसले आहेत. आम्ही दमलो आहेत. आम्हाला विश्रांती नाही.

6पोटभर भाकरी मिळविण्यासाठी आम्ही मिसर व अश्शूर यांच्यासमोर आम्ही आपले हात पूढे केले.

7आमच्या पूर्वजांनी तुझ्याविरुध्द पाप केले. आता ते नाहीत. पण त्यांच्या पापाची फळे आता आम्ही भोगत आहोत.

8गुलाम आमच्यावर राज्य करतात. त्यांच्या हातातून आम्हाला कोणीही वाचवायला नाही.

9राणात चालू असलेल्या तरवारीमुळे आम्ही आपला जीव मुठीत घेऊन आपले अन्न मिळवतो.

10आमची कातडी भट्टीप्रमाणे तापली आहेत. भुकेमुळे आम्हाला ताप चढला आहे.

11शत्रूंनी सियोनमधील स्त्रियांवर बलात्कार केला. यहूदा नगरातील कुमारी त्यांचाही बलात्कार केला.

12शत्रूंने आमच्या राजपुत्रांना फाशी दिली. त्याने आमच्यातील वडीलांचा मान ठेवला नाही.

13आमच्या तरुणांना शत्रूने गिरणीत धान्य दळायला लावले. ते तरुण लाकडाच्या ढिगाऱ्याखाली अडखळले.

14वृध्द आता नगरीच्या द्वारात बसत नाहीत. तरुण गायनवादन करीत नाहीत.

15आमच्या नृत्याचे रूपांतर आता मृतांच्या शोकात झाले आहे. आमच्या हृदयात आनंदाचा अंशही नाही.

16आम्ही पाप केल्यामुळे आमच्या डोक्यावरचा मुकुट खाली पडला आहे. म्हणून आम्हाला हायहाय.

17ह्या सर्व गोष्टीमुळे आमचे मन खचले आहे. आम्हाला डोळ्यांनी स्पष्टपणे दिसत नाही.

18सियोनचे डोंगर ओसाड झाले आहेत. सियोनच्या डोंगरावर कोल्हे वावरतात.

19पण परमेश्वरा, तुझी सत्ता चिरंतन आहे. तुझे राजसिंहासन चिरकाल राहील.

20परमेश्वर आम्हाला कायमचा विसरला आहेस असे दिसते. तू आम्हाला दीर्घकाल सोडून गेला आहेस.

21परमेश्वरा, आम्हाला तुझ्याकडे परत ने. आम्ही आनंदाने तुझ्याकडे येऊ. आमचे जीवन पूर्वीसारखे कर.

22तू आमच्यावर खूप रागावला होतास! तू आमचा पूर्णपणे त्याग केलास का?


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Lamentations 5 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran