Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Revelation 10 >> 

1मी आणखी एक बलवान देवदूत स्वर्गातून उतरतांना पाहिला, तो मेघ पांघरलेला असून त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते, त्याचे तोंड सूर्यासारखे, व त्याचे, पाय अग्निस्तंभासारखे होते,

2त्याच्याहाती एक उघडलेले लहानसे पुस्तक होते, त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय भूमीवर ठेवला,

3आणि सिंहगर्जनेप्रमाणे तो मोठ्याने आेरडला, आणि तो आेरडला तेव्हा सात मेघगर्जनांनी आपआपले शब्द काढले.

4त्या सात मेघगर्जनांनी शब्द काढले तेव्हा मी लिहिणार होतो, इतक्यात स्वर्गातून झालेली वाणी मी एेकली, ती म्हणाली, सात मेघगर्जनांनी काढलेले शब्द गुप्त ठेव, ते लिहू नको.

5ज्या देवदूताला समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेले मी पाहिले, त्याने आपला उजवा हात स्वर्गाकडे वर केला,

6आणि जो युगानुयुग जिवंत आहे, ज्याने आकाश व त्यांत जे आहेत, पृथ्वी व तिच्यावर जे आहे ते, आणि समुद्र व त्यात जे आहे ते निर्माण केले, त्याची शपथ वाहून म्हटले, आणखी उशीर होणार नाही.

7परंतु सातव्या देवदूताची वाणी होईल त्यादिवसात म्हणजे तो देवदूत कर्णा वाजविण्याच्या व बेतात असेल, तेव्हा देवाने आपले दास संदेष्टे ह्यांना जाहीर केल्यानुसार त्याचे गूज पूर्ण होईल.

8स्वर्गातून झालेली जी वाणी मी एेकली होती ती माझ्याबरोबर पुन्हा बोलताना मी एेकली. ती म्हणाली, जा आणि समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेल्या देवदूताच्या हातातलें उघडलेले पुस्तक जाऊन घे.

9तेव्हा मी त्या देवदूताकडे जाऊन, ते लहानसे पुस्तक मला दे असे म्हटले. तो म्हणाला, हे घे आणि खाऊन टाक; ते तुझे पोट कडू करील तरी तुझ्या तोंडाला मधासारखे गोड लागेल.

10तेव्हा मी देवदूताच्या हातातून ते लहानसे पुस्तक घेतले व खाऊन टाकले, ते माझ्या तोंडाला मधासारखे गोड लागले, तरी ते खाल्ल्यावर माझे पोट कडू झाले.

11तेव्हा ते मला म्हणाले, अनेक लोक, राष्ट्रें, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राजे ह्यांच्याविषयी तू पुन्हा संदेश दिला पाहिजे.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Revelation 10 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran