Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Deuteronomy 15 >> 

1दर सात वर्षांच्या शेवटी तुम्ही कर्ज माफ करून टाकावे.

2त्याची पद्धत अशी: प्रत्येकाने आपल्या इस्राएल बांधवाला दिलेले कर्ज रद्द करून टाकावे. त्याला परतफेड करायला सांगू नये. कारण परमेश्वरानेच त्यावर्षी कर्जमुक्ती जाहीर केली आहे.

3परक्याकडून हवी तर वसुली करावी, पण तुझ्या बांधवाकडे तुझे काही येणे असेल तर ते तू सोडून दे.

4तुमच्या देशात कोणी गरीब असता कामा नये. कारण ही भूमी तुम्हाला परमेश्वराने दिली आहे आणि तो तुम्हाला भरभरुन आशीर्वाद देणार आहे

5पण त्यासाठी तुम्ही तुमचा देव परमेश्वर याच्या आज्ञेत राहिले पाहिजे. मी आज सांगितलेल्या सर्व आज्ञा काळजीपूर्वक पाळा.

6मग तुमचा देव परमेश्वर आपल्या वचनानुसार तुमचे कल्याण करील. तुम्ही इतर राष्ट्रांना उसने द्याल पण उसने घ्यायची तुमच्यावर वेळ येणार नाही. तुम्ही इतर राष्ट्रावर सत्ता चालवाल पण तुमच्यावर इतरांची सत्ता चालणार नाही.

7तुमचा देव परमेश्वर तुम्हांला देणार असलेल्या या देशात एखादा माणूस गरीब असेल, त्याला मदत करायला हात आखडता घेऊ नका, स्वार्थीपणाने वागू नका.

8त्याच्यासाठी हात सैल सोडा आणि त्याच्या गरजेपुरते उसने द्या.

9कर्जमाफीचे वर्ष (सातवे वर्ष) आता जवळच आले आहे अशा दुष्ट विचाराने कुणाला मदत नाकारु नका. गरजूंच्या बाबतीत असे क्षुद्र विचार मनात आणू नका. त्याच्या बाबतीत अनुदार राहू नका. तसे केले तर ते तुमच्याविरुध्द परमेश्वराकडे गाऱ्हाणे गातील. आणि तुम्हांला पाप लागेल.

10तेव्हा तुम्हांला शक्य आहे ते त्यांना द्या. उदार अंत:करणाने द्या. या सत्कृत्याबद्दल तुम्हांला परमेश्वर देवाचा आशीर्वाद मिळेल. तुम्ही जे काम हाती घ्याल त्यात तुम्हांला यश मिळेल.

11गरीब लोक तर देशात नेहमीच असणार म्हणून मी म्हणतो की त्यांना मदत करायला तयार राहा. आपल्या देशातील गरजवंतांना सढळ हाताने मदत करा.

12एखादी इब्री बाई किंवा पुरुष तुम्ही दास म्हणून विकत घेतलेला असेल तर सहा वर्षे चाकरी झाल्यावर, सातव्या वर्षी त्याला मुक्त करा.

13पण त्याला रिक्त हाताने जाऊ देऊ नका.

14तर तुझी गुर, खळे, द्राक्षाकुंड यातुन उदार हाताने दे. तुमचा देव परमेश्वर याच्या आशीर्वादाने तुम्हाला भरभरुन मिळाले आहे. त्या प्रमाणात त्याला दे.

15आपण मिसरमध्ये दास होतो व तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला मुक्त केले हे लक्षात ठेवा. त्यासाठीच मी तुम्हाला आज ही आज्ञा देत आहे.

16असे घडेल तो तुम्हाला म्हणेल, मी तुमच्यापासुन दुर जाणार नाही, कारण तुमच्यावर व कुटुंबावर प्रीती करीत असेल आणि आनंदात असल्यामुळे तो तुम्हाला सोडून जायला तयार होणार नाही.

17तेव्हा दरवाजाजवळ धरुन अरीने त्याचा कान टोचा. तो तुमचा कायमचा दास आहे हे त्यावरुन कळेल. दासीच्या बाबतीतही असेच करा.

18दासांना मुक्त करून जाऊ देताना तुम्हाला जड वाटू नये. पगारी नोकराला तुम्हाला द्यावे लागले असते त्याच्या निम्म्या पैशातच याने तुमची सेवा केली आहे हे लक्षांत ठेवा. असे केलेत तर तुम्ही जे जे कराल त्यात देव तुम्हाला आशीर्वाद देईल.

19तुमच्या कळपातील सर्व जनावरांचा पहिला गोऱ्हा पवित्र मानून तो परमेश्वराला अर्पण करा. पहिल्या गोऱ्हाला कामाला जुंप नका. पहिल्या मेंढराची लोकर कातरु नका.

20दरवर्षी या सगळ्या गोऱ्हांना तुमचा देव परमेश्वर याने निवडलेल्या जागी घेऊन जा. तेथे सर्व कुटुंबियां समवेत परमेश्वरासमोर त्याचे मांस खा.

21पण यापैकी एखाद्या जनावरात लंगडेपणा, आंधळेपणा असे काही व्यंग असेल तर तुमचा देव परमेश्वर ह्याला त्याचा बळी देऊ नका.

22वाटल्यास घरीच त्याचे मांस खा. हरीणाचे किंवा सांबराचे मांस खातात त्याप्रमाणे अशुद्ध व शुद्ध कोणीही ते खावे.

23फक्त त्याचे रक्तसेवन करु नये. ते तेवढे पाण्याप्रमाणे जमिनीवर ओतून द्यावे.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Deuteronomy 15 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran