Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Nehemiah 10 >> 

1त्या मोहरबंद करारातील नावे पुढीलप्रमाणे: प्रांताधिपती नहेम्या. हा हखल्याचा पुत्र. सिदकीया,

2सराया, अजऱ्या, यिर्मया,

3पशहूर, अमऱ्या, मल्खीया,

4हत्तूश, शबन्या, मल्लूख,

5हारीम, मरेमोथ, ओबद्या,

6दानीएल, गिन्नथोन, बारुख,

7मशुल्लाम, अबीया, मियामीन,

8माज्या, बिल्गई, आणि शमया. ज्यांनी त्या करारावर आपल्या नावाची मुद्रा उठवली त्यापैकी ही याजकांची नावे झाली.

9आणि लेवी: अजन्याचा पुत्र येशूवा, हेनादादच्या घराण्यातला बिन्नइ, कदमीएल,

10आणि त्यांचे भाऊ:शबन्या, होदीया, कलीता, पलाया, हानान,

11मीखा, रहोब, हशब्या,

12जक्कूर, शेरेब्या, शबन्या,

13होदीया, बानी, बनीनू.

14लोकांचे नेते: परोश, पहथ-मवाब, एलाम, जातू, बानी,

15बुन्नी, अजगाद, बेबाई,

16अदोनीया, बिग्वाई, आदीन,

17आटेर, हिज्कीया, अज्जूर,

18होदीया, हाशूम, बेसाई,

19हारिफ, अनाथोथ, नोबाई,

20मप्पीयाश, मशुल्लाम, हेजीर,

21मशेजबेल, सादोक, यद्दूवा,

22पलट्या, हानान, अनया,

23होशेया, हनन्या, हश्शूब.

24हल्लोहेश, पिल्हा शोबेक,

25रहूम, हश्बना, मासेया,

26अहीया, हानान, अनान,

27मल्लूख, हारीम आणि बाना.

28अवशिष्ट लोकांनी म्हणजे याजक, लेवी व्दारपाळ गायक व मंदिराते काम करणारे लोक आणि देवाचे नियमशास्त्र पाळायची शपथ घेऊन देशोदेशीच्या लोकांतून जे वेगळे झाले होते त्या सर्वांना ज्यास अक्कल व समजूत होती अशा स्रियां, पुत्र व कन्या टयासह वेगळे झाले.

29त्याचबरोबर त्यांच्या सर्व स्त्रिया, आणि सावधानपणे ऐकू शकतील आणि समजू शकतील असे त्यांचे सर्व पुत्र आणि कन्या. या सर्व लोकांनी आपले बांधव आणि महत्वाच्या व्यक्तीसमवेत देवाचे जे नियमशास्त्र देवाचा सेवक मोशे याच्याकडून दिले होते ते पाळण्याची शपथ घेतली. आणि जर आपण देवाचे हे नियमशास्त्र पाळले नाहीतर आपल्यावर अरिष्टे कोसळण्यासबंधीचा शापही त्यांनी स्वीकारला.

30आमच्या भोवतींच्या प्रदेशातील लोकांमध्ये आम्ही आमच्या कन्यांची विवाह होऊ देणार नाही तसेच त्यांच्या कन्याहि आमच्या पुत्रांसाठी करून घेणार नाही असे आम्ही वचन देतो.

31शब्बाथ दिवशी आम्ही काम करणार नाही. शब्बाथ दिवशी किंवा दुसऱ्या कोणत्याही पवित्र दिवशी आमच्या भोवतीच्या प्रदेशातील लोकांनी धान्य किंवा इतर काही वस्तू विकायला आणल्या तर त्यांची खरेदी आम्ही करणार नाही. दर सातव्या वर्षी आम्ही जमीन पडीक ठेवू. तिची मशागत करणार नाही. तसेच त्यावर्षी सर्व देणेकऱ्यांना आम्ही ऋणातून मुक्त करु.

32मंदिराच्या सेवेच्या सर्व आज्ञा पाळायची जबाबदारी आम्ही घेत आहोत. देवाच्या मंदिराची काळजी घेण्यासाठी म्हणून एकतृतीयांश शेकेल आम्ही दरवर्षी देऊ.

33मंदिरातील मेजावर याजकांनी ठेवायच्या अन्नार्पणाची समर्पित भाकर, रोजचे अन्नार्पण आणि होमार्पण, शब्बाथ, चंद्रदर्शन आणि नेमलेले सण यादिवशी करायची अर्पणे, इस्राएलींच्या प्रायश्चितासाठी करायची पवित्रार्पणे आणि पापार्पणे, देवाच्या मंदिराच्या कामी येणारा खर्च या पैशातून द्यावा.

34दरवर्षी नेमलेल्या वेळी मंदिरात लाकडाची अर्पणे आणावी म्हणून आम्ही सर्वांनी याजक, लेवी व सर्व लोक यांनी चिठ्या टाकल्या आहेत. त्या चिठ्ठ्यांनुसार प्रत्येक कुटुंबाने परमेश्वर देवाच्या वेदीवर जाळण्यासाठी लाकूड आणायचे आहे. नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे आपल्याला हे करायलाच हवे.

35आमच्या शेतातले पहिले पीक आणि निरनिराळ्या फळझाडांची प्रथमफळे दरवर्षी परमेश्वराच्या मंदिरात आणायची आमची जबाबदारी आहे हे आम्ही कबूल करतो.

36नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे आम्ही पुढील गोष्टीही करु: आमचा प्रथम पुत्र आणि आमची गुरेढोरे, शेळया मेंढ्या यांचे प्रथम पिलू यांना आम्ही आमच्या देवाच्या मंदिरात सेवेला असलेल्या याजकांकडे आणू.

37तसेच परमेश्वराच्या मंदिरातील कोठारांसाठी याजकांकडे पुढील गोष्टी आणू: पिठाचा पहिला उंडा. धान्यार्पणाचा पहिला भाग, आमच्या सर्व वृक्षांच्या फळांचा पहिला बहार, नवीन काढलेला द्राक्षारस आणि तेल यांचा पहिला भाग, या गोष्टी. तसेच लेवीना आमच्या पिकातला एक दशांश भाग देऊ. कारण ते सर्व नगरांतून आमच्या उत्पन्नाचा दहावा भाग घेतात.

38लेवी या धान्याचा स्वीकार करतील तेव्हा अहरोनाच्या वंशातील एखादा याजक त्यांच्याबरोबर असावा. मग लेवीनी ते धान्या देवाच्या, मंदिरात आणावे व मंदिराच्या कोठारांमध्ये जमा करावे.

39इस्राएल लोक आणि लेवी यांनी धान्य, नवीन द्राक्षरस आणि तेल यांची अर्पणे कोठारामध्ये आणावीत. मंदिरासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तेथे असतात तसेच सेवा करणारे याजक, गायक आणि द्वारपाल यांचेही वास्तव्य तिथे असते.“देवाच्या मंदिराची आम्ही नीट जपवणूक करु असे आम्ही वचन देतो.”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Nehemiah 10 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran