Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 90 >> 

1हे प्रभु, तू सर्व पिढ्यानपिढ्या आमचे निवासस्थान आहेस.

2पर्वत अस्तित्वात येण्यापूर्वी किंवा पृथ्वी व जग निर्माण होण्याआधीच अनादिकाळापासून ते अनंतकाळापर्यत तूच देव आहेस.

3तू मनुष्याला पुन्हा मातीस मिळवतोस आणि तू म्हणतोस,अहो मनुष्याच्या वंशजांनो परत या.

4कारण हजारो वर्षे तुझ्या दृष्टीने, कालच्या गेलेल्या दिवसासारखी, रात्रीच्या प्रहरासारखी आहेत.

5पुराप्रमाणे तू त्यांना झाडून दूर नेतोस आणि ते निद्रेप्रमाणे क्षणिक आहेत, सकाळी उगवणाऱ्या गवतासारखे ते आहेत.

6सकाळी ते उगवते आणि वाढते; संध्याकाळी ते निस्तेज होते व वाळून जाते.

7खरोखर, आम्ही तुझ्या रागाने नष्ट होतो, आणि तुझ्या कोपाने आम्ही घाबरून जातो.

8तू आमचे अपराध आपल्यापुढे ठेवले आहेत. आमचे गुप्त पाप तुझ्या प्रकाशाच्या समक्ष ठेवले आहे.

9तुझ्या क्रोधाखालून आमचे आयुष्य निघून जाते; आमची वर्षे उसाशाप्रमाणे त्वरेने संपून जातात.

10आमचे आयुष्य सत्तर वर्षे आहे किंवा जर आम्ही निरोगी असलो तर ऐंशी वर्षेही आहे; पण तरी आमच्या आयुष्यातील उत्तम वर्षे समस्या आणि दु:ख यांच्या निशाणीने भरलेले आहे. होय,ते लवकर सरते आणि दूर आम्ही उडून जातो.

11तुझ्या क्रोधाची तीव्रता कोणाला माहित आहे; तुझी भीती बाळगण्याइतका तुझा क्रोध कोण जाणतो?

12म्हणून आम्हाला आमचे आयुष्य असे ते मोजण्यास शिकव की आम्ही ज्ञानाने जगण्यास शिकू.

13हे परमेश्वरा, परत फीर, किती वेळ तू उशीर करशील? तुझ्या सेवकावर दया कर.

14तू आपल्या दयेने आम्हाला सकाळी तृप्त कर म्हणजे आम्ही आपले सर्व दिवस हर्षाने आणि आनंदाने घालवू.

15जितके दिवस तू आम्हाला पीडले त्या दिवसाच्या मानाने आणि जितकी वर्षे आम्ही समस्येचा अनुभव घेतला त्या वर्षाच्या मानाने आम्हांला आनंदित कर.

16तुझी कृती तुझ्या सेवकांना, तुझे वैभव त्यांच्या मुलांना बघू दे.

17प्रभु, आमचा देव याची कृपा आम्हांवर असो. आमच्या हातच्या कामाला उन्नती दे; खरोखर,आमच्या हातच्या कामाला उन्नती दे.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Psalms 90 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran