Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 2 >> 

1राष्ट्रे का बंडखोर झाली आहेत, आणि लोक व्यर्थच का कट रचत आहेत?

2पृथ्वीचे राजे परमेश्वराविरुध्द व त्याच्या मशीहाविरुद्ध उभे राहतात, आणि राज्यकर्ते एकत्र मिळून कट करतात, ते म्हणतात.

3त्यांनी आपणावर लादलेल्या बेड्या आपण तोडून टाकू, आणि त्यांचे साखळदंड फेकून देऊ.

4तो जो आकाशांत बसलेला आहे तो हसेल, प्रभू त्यांचा उपहास करणार.

5त्यानंंतर तो आपल्या रागात त्यांच्याशी बोलेल आणि आपल्या संतापाने त्यांना घाबरे करीन.”

6मी माझ्या पवित्र डोंगरावर, सीयोनावर, माझ्या राज्याला अभिषेक केला आहे.

7मी परमेश्वराची फरमान घोषीत करीन, तो मला म्हणाला, “तू माझा पूत्र आहेस.” या दिवशी मी तुझा बाप झालो आहे.

8मला माग, आणि मी तुला राष्ट्रे तुझे वतन आणि पृथ्वीच्या सीमा तुझ्या ताब्यात देईल.

9लोखंडी दंडाने तू त्यांना तोडशील, कुंभारच्या भांड्यासारखा तू त्यांना फोडशील.

10म्हणून आता, अहो राजांनो, सावध व्हा; पृथ्वीच्या राज्यकर्त्यांनो, चूक दुरुस्त करा.

11भय धरून परमेश्वराची स्तुती करा आणि थरथर कापून हर्ष करा.

12त्याचा क्रोध अचानक पेटेल तेव्हा, त्याच्या पुत्रास खरी निष्ठा द्या, म्हणजे तो तुम्हांवर रागवनार नाही, म्हणजे तुम्ही मारले जाणार नाही. जे सर्व त्याच्याठायी आश्रय घेतात ते आशिर्वादीत आहेत.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Psalms 2 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran