Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 1 >> 

1आशिर्वादीत आहे तो मनुष्य, जो दुष्टांच्या सल्ल्याने चालत नाही, किंवा पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, आणि थट्टा करणाऱ्यांच्या सभेत बसत नाही.

2परंतू परमेश्वराच्या शास्त्रात त्याचा आनंद आहे, आणि त्याच्या नियमशास्त्रावर तो रात्रंदिवस ध्यान लावतो.

3पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडासारखा तो असेल, जे आपल्या ऋतुत फळ देते, ज्याचे पाने कधी कोमेजत नाही, तो जे काही करेल ते यशस्वी होईल.

4परंतु वाईट लोक असे नसतात ते वाऱ्यावर उडून जाणाऱ्या फोलपटासारखे असतात.

5म्हणून दुष्ट न्यायांत व पापी न्यायींच्या सभेत उभे राहणार नाही.

6कारण परमेश्वर न्यायींच्या मार्गाला मंजूरी देतो. परंतू दुष्टांचा मार्ग नष्ट होईल.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Psalms 1 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran