Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 19 >> 

1आकाशे देवाचे गौरव जाहीर करतात, आणि अंतराळ त्याच्या हाताचे कृत्य दाखविते.

2दिवस दिवसाशी बोलतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते.

3संभाषण नाही, बोललेले शद्बही नाही, त्यांचा आवाजही ऐकू येत नाही.

4तरीहि त्यांचे शद्ब सर्व पृथ्वीत बाहेर जातात. आणि त्यांचे बोलणे जगाच्या शवटापर्यंत जातात. त्याने सुर्यासाठी त्यांच्यामध्ये मंडप उभरला आहे.

5सूर्य नवऱ्या मुलासारखा आपल्या मांडवातून बाहेर येतो. आणि सामर्थवान पुरुषाप्रमाणे तो आपली धाव धावण्यात आनंद करतो.

6सूर्य एक क्षितीज पासून उदय होतो, आणि दुसऱ्या क्षतिजापर्यंत आकाशात पार जातो. त्याच्या उष्णतेपासून कोणीचीही सुटका होत नाही.

7परमेश्वराचे शास्र परिपूर्ण आहे. ते जीवाला पुनर्संचयित करणारे आहे. परमेश्वराचे नियम विश्वसनीय आहे, ज्यांना अनुभव नाही त्यांना शाहानपण देणारे आहे.

8परमेश्वराच्या सूचना खऱ्या आहेत. जे हृदयाला हर्षीत करतात. परमेश्वराच्या करारचे नियम शुद्ध आहेत, ते डोळे प्रकाशविणारी आहे.

9परमेश्वराची भीती शुध्द आहे. ते सर्वकाळ टिकणारे आहे, परमेश्वराचे नियम खरे आहेत, आणि सर्व न्यायी आहेत.

10ते सोन्यापेक्षा ही मोल्यवान आहेत. अती उत्तम सोन्यापेक्षाही ते शुद्ध आहे. ती मधाच्या पोळ्यातून गळणाऱ्या, मधापेक्षाही गोड आहेत.

11होय, त्याकडून तुझ्या सेवकाला चेतावनी मिळते. ते परमेश्वराच्या शिकवणी नेत्याच्या सेवकाला इशारा दिला. ते पाळ्यात उत्तम प्रतिफळ आहे.

12आपल्या स्वत:च्या चुका कोण ओळखू शकते? दिसू शकत नाहीत. लपलेल्या पापांपासून मला शुद्ध कर.

13तुझ्या सेवकाला गर्विष्ठ पापांरासून राख; ती माझ्यावर राज्य न गाजवोत. तेव्हा मी परिपुर्ण होईल आणि माझ्या पुष्कळ अपराधांपासून निर्दोष राहीन.

14माझ्या तोंडचे शब्द आणि माझ्या हृदयाचे विचार तुझ्यासमोर मान्य असोत. परमेश्वरा, तू माझा खडक आहेस. मला तरणारा तूच आहेस.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Psalms 19 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran