Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 18 >> 

1“हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो.”

2परमेश्वर माझा खडक माझा गढ आहे, जो माला सुरक्षा आणतो, तो माझा देव, माझा खडक आहे, त्याच्यात मी आश्रय घेतो. तो माझी ढाल आहे, माझ्या तारणाचे शिंग आणि माझा बळकट दुर्ग आहे.

3जो स्तुतीच्या योग्य आहे, त्या परमेश्वराला मी हाक मारीन, आणि मी माझ्या शत्रूंपासून वाचवला जाईल.

4मृत्यूच्या दोऱ्यांनी मला घेरले, आणि निर्थकतेचा पुर माझ्या डोईवरुन वाहत आहे.

5थडग्याच्या दोऱ्यांनी मला घेरले, माझ्या भोवती होत्या. मृत्यूच्या सापळ्याने मला अडकवले.

6मी संकटात असता, मी परमेश्वराला हाक मारली; मी देवाला माझ्या मदतीसाठी हाक मारली. त्याने त्याच्या पवित्र मंदिरातून माझी वाणी ऐकली.

7तेव्हा पृथ्वी हादरली आणि कंपित झाली. डोंगरांचे पाये थरथर कापले आणि हादरले, कारण देव क्रोधित झाला होता.

8त्याच्या नाकातून धूर वर चढला, आणि त्याच्या तोंडातून अग्नीच्या ज्वाळा निघाल्या. ज्याने कोळसे पेटल्या गेले.

9त्याने आकाश उघडले आणि तो खाली आला, आणि निबीड अंधार त्याच्या पाया खाली होता.

10करुबावर स्वार उडाला आणि वाऱ्याच्या पंखावर तो वर उडत गेला.

11त्याने त्याच्याभोवती काळोखास तंबू असे केले, मोठे पावसाचे मेघ असे.

12त्याच्या समोरील वीजांमुळे, गारा आणि जळते कोळसे पडले.

13परमेश्वराने आकाशात गडगडाट केला! परात्पराने आवाज उंच केला आणि गारा आणि वीजा पाठवल्या.

14परमेश्वराने त्याचे बाण सोडले आणि शत्रूची दाणादाण उडाली, पुष्कळ वीजांनी त्यांना छेदून टाकले.

15तेव्हा पाण्याचे प्रवाह दिसू लागले, तुझ्या युद्धाच्या गदारोळाने आणि तुझ्या नाकपुड्याच्या श्वासाच्या धमाक्याने जगाचे पाये उघड पडले.

16तो उंचावरुन खाली आला आणि त्याने मला पकडले! त्याने मला उसळत्या पाण्यातून बाहेर काढले.

17माझ्या शक्तीशाली शत्रूंपासून आणि माझा तिरस्कार करणाऱ्यांपासून त्याने सोडवले. कारण ते माझ्यापेक्षा अधिक बलवान होते.

18माझ्या दु:खाच्या दिवशी ते माझ्याविरुद्ध आले. परंतू परमेश्वर मला उचलून धरणारा होता.

19त्याने मला विस्तृत खुल्या जागेमध्ये मोकळे केले! त्याने मला तारले कारण तो माझ्यामुळे संतुष्ट होता.

20माझ्या न्यायीपणाप्रमाणे परमेश्वराने मला पुरस्कृत केले आहे, त्याने मला पुनर्संचयित केले कारण माझे हात निर्मळ होते.

21कारण मी परमेश्वराच्या मार्गात राहलो आणि दुष्टाईने देवापासून दुर फिरलो नाही.

22कारण त्याचे धार्मिक नियम माझ्यापुढे होते आणि त्याचे नियम मी आपणापासून दूर केले नाहीत.

23मी त्याच्यासमोर निर्दोष असा होतो, आणि मी स्वत:ला पापापासून मला राखले.

24माझ्या न्यायीपणाप्रमाणे परमेश्वराने पुनर्संचयित केले. कारण त्याच्या डोळ्यासमोर हात निर्मळ होते.

25जो विश्वासयोग्य आहे, त्याच्याशी तू विश्वास दाखवतो, निर्दोष मनुष्याशी तू निर्दोष वागतो.

26जे शुध्द असतात त्यांच्याशी तू शुध्द असतोस, परंतु जे नीच त्यांना तू हेकट असा आहेस.

27कारण तू पीडित लोकांना वाचवीले आहे. परंतू गर्वाने उंचावलेल्या डोळ्यांना तू खाली करतोस.

28कारण तू माझा दिवा लावशील, परमेश्वर माझा देव माझ्या अंधाराचा प्रकाश करीन.

29कारण तुझ्या योगे मी अडथळ्यांवर धावू शकतो, माझ्या देवाच्या योगे मी भींतीवरुन उडी मारतो.

30देवाचा मार्ग परिपूर्ण आहे. परमेश्वराचे वचन शुद्ध आहे. जे त्याच्यात आश्रय घेतात, त्यांच्यासाठी तो ढाल असा आहे.

31कारण परमेश्वराखेरीज कोण देव आहे? आमच्या देवाशीवाय कोण खडक आहे?

32तोच देव बलाने माझी कंबर बांधतो, जो आपल्या मार्गावर निर्दोष व्यक्तीस ठेवतो.

33तो माझे पाय हरणासारखे करतो आणि मला डोंगरावर स्थापीतो!

34तो माझे हात युध्दात चालवायला शिकवतो आणि माझे भुज पितळी धनुष्य वाकवीण्यासाठी तयार करतो.

35तू मला तुझ्या तारणाची ढाल दिलीस. तुझा उजवा हात मला आधार देतो आणि तुझ्या अनुग्रहाने मला थोर केले आहे.

36तू माझ्या पायांखाली विस्तीर्ण असे स्थान केले आहे. म्हणजे माझा पाय कधी घसरणार नाही.

37मी माझ्या शत्रूंचा पाठलाग करीन आणि त्यांना पकडीन. ते नाश होईपर्यंत मी मागे फिरणार नाही.

38मी माझ्या त्यांना असे मारीन की, ते पुन्हा उभे राहू शकणार नाहीत. ते सगळे माझ्या पायाखाली असतील.

39कारण युध्दाकरता तू सामर्थ्याने माझी कंबर बांधली आहे, जे माझ्याविरुद्ध उठले होते त्यांना तू खाली पाडले आहे.

40तू मला माझ्या शत्रूंनाही त्यांची पाठ फिरवायला लावली आहे. ज्यांनी माझा द्वेष केला, त्यांचा मी नाश केला.

41ते मदतीसाठी ओरडले, पण कोणीही त्यांना वाचवले नाही, त्यांनी परमेश्वराला आरोळी केली, पण त्याने उत्तर दिले नाही.

42मी माझ्या शत्रूचे मारुन तुकडे केले. त्यांची अवस्था वाऱ्यावर उडणाऱ्या धुळीप्रमाणे झाली मी त्यांचे लहान लहान तुकडे केले.

43मी त्यांना असे मारले की धुळीसारखा त्यांचा भुगा केला. तू मला राष्ट्रांवर मस्तक असे केले आहे. जे लोक मला माहीत नाहीत ते माझी सेवा करतील.

44ते लोक माझ्याविषयी ऐकतील आणि लगेच माझ्या आज्ञांचे पालन करतील. ते परदेशी माझ्यापुढे शरण येतील.

45ते परदेशी त्यांच्या लपण्याच्या जागेतून भीतीने थरथर कापत बाहेर येतील.

46परमेश्वर जिवंत आहे, माझा खडक धन्यवादित असो. माझ्या तारणाचा देव उंचावला जावो.

47हाच तो देव आहे जो माझ्यासाठी सूड घेतो, त्याने त्या राष्ट्रांना माझ्या सत्तेखाली देतो.

48मी माझ्या शत्रूंपासून मुक्त झालो आहे, खचित, जे माझ्याविरुद्ध उठले आहेत, त्यांच्यावर तू मला उंच केले आहे. तू मला क्रूर माणसांपासून वाचवले.

49यास्तव परमेश्वरा, राष्ट्रांमध्ये मी तुला धन्यवाद देईल, मी तुझ्या नावाची स्तुती गाईन.

50देव आपल्या राजाला मोठा विजय देतो, आणि तो आपल्या अभिषिक्तावर, दाविदावर व त्याच्या संतानावर सदासर्वकाल कृपा करतो.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Psalms 18 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran